उद्धव ठाकरे देशातील लोकप्रिय मुख्यमंत्र्यांच्या यादीत, योगी आदित्यनाथ सर्वाधिक लोकप्रिय
उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी या यादीत अव्वल स्थान पटकावलं आहे. विशेष म्हणजे यादीत भाजप आणि काँग्रेस शासित राज्यांच्या मुख्यमंत्र्यांची लोकप्रियता जास्त दिसून आली आहे.
![उद्धव ठाकरे देशातील लोकप्रिय मुख्यमंत्र्यांच्या यादीत, योगी आदित्यनाथ सर्वाधिक लोकप्रिय CM uddhav Thackeray Popularity increase day by day, Uddhav thackeray on 7th position उद्धव ठाकरे देशातील लोकप्रिय मुख्यमंत्र्यांच्या यादीत, योगी आदित्यनाथ सर्वाधिक लोकप्रिय](https://static.abplive.com/wp-content/uploads/sites/4/2020/05/10213329/Uddhav-Thackeray-6.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=1200&height=675)
मुंबई : राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची मुख्यमंत्री म्हणून लोकप्रियता दिवसेंदिवस वाढत आहे. कोरोनाच्या संकटात उद्धव ठाकरे यांनी मोठ्या धैर्याने सामना केला. देशातील लोकप्रिय मुख्यमंत्र्यांच्या यादीत उद्धव ठाकरे यांनी पुन्हा एकदा स्थान मिळवलं आहे. इंडिया टुडे आणि कार्वी इनसाईट्सने (मुड ऑफ द नेशन सर्वे) केलेल्या सर्वेक्षणात ही माहिती समोर आली आहे. देशातील लोकप्रिय मुख्यमंत्र्यांच्या यादीत उद्धव ठाकरे यांनी सातवं स्थान पटकावलं आहे.
उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी या यादीत अव्वल स्थान पटकावलं आहे. विशेष म्हणजे यादीत भाजप आणि काँग्रेस शासित राज्यांच्या मुख्यमंत्र्यांची लोकप्रियता जास्त दिसून आली आहे. सर्वेक्षणातील पहिल्या सातपैकी सहा मुख्यमंत्री बिगर भाजप व काँग्रेसशासित राज्यांचे आहेत. दुसऱ्यांदा दिल्लीची धुरा सांभाळणारे अरविंद केजरीवाल या यादीत दुसऱ्या क्रमांकावर आहेत. आंध्रप्रदेशचे मुख्यमंत्री मंत्री जगनमोहन रेड्डी तिसऱ्या क्रमांकावर आहेत. तर पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी या यादीत चौथ्या क्रमांकावर आहेत.
उद्धव ठाकरे लोकप्रिय मुख्यमंत्र्यांच्या यादीत, आयएएनएस आणि सी व्होटर्सचा सर्व्हे
लोकप्रिय मुख्यमंत्र्यांची यादी
योगी आदित्यनाथ - उत्तर प्रदेश (24 टक्के) अरविंद केजरीवाल - दिल्ली (15 टक्के) जगनमोहन रेड्डी - आंध्रप्रदेश ( 11 टक्के) ममता बॅनर्जी- पश्चिम बंगाल (9 टक्के) अन्य- (8 टक्के) नितीश कुमार- बिहार (7 टक्के) उद्धव ठाकरे- महाराष्ट्र (7 टक्के) नवीन पटनायक - ओडिशा (6 टक्के) के चंद्रशेखर राव - तेलंगणा (3 टक्के) अशोक गेहलोत - राजस्थान (2 टक्के) बी एस येडुयुरप्पा - कर्नाटक (2 टक्के) भुपेस बघेल - छत्तीसगड(2 टक्के) शिवराज सिंह चौहान- मध्य प्रदेश (2 टक्के) विजय रुपानी - गुजरात (2 टक्के)
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)