...तर दसऱ्यापासून जिम सुरु करु; मुख्यमंत्र्यांचं जिम व्यायसायिकांना आश्वासन
ग्रंथालय सुरू करण्यास वाचन प्रेरणा दिवसाचा मुहूर्त साधला आता व्यायाम शाळांसाठी दसऱ्याचा मुहूर्त नक्की करा, अशी मागणी व्यायामशाळा व जिम मालकांनी मुख्यमंत्र्यांकडे या बैठकी दरम्यान केली. याला एकप्रकारे सकारात्मक प्रतिसाद मुख्यमंत्र्यांनी दिला आहे.
मुंबई : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची राज्यभरातील जिम व्यवसायिक, फिटनेस सेंटर आणि व्यायामशाळा प्रतिनिधीसोबत व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे चर्चा झाली. यामध्ये गेल्या 7 महिन्यापासून बंद असलेल्या जिम, व्यायामशाळा सुरू करण्याची मागणी व्यवसायिकांनी वारंवार केल्यानंतर दसऱ्यापासून जर सगळे मार्गदर्शक तत्वे काटेकोरपणे पाळले जाणार असतील तर राज्य सरकार जिम सुरू करण्यास परवानगी देईल असं आश्वासन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी जिम व्यवसायिकांना दिलं आहे. त्यामुळे अनेक दिवसांपासून बंद असलेल्या जिम सुरू करण्याची मागणी करणाऱ्यांना एक मोठा दिलासा मिळणार आहे.
सध्या राज्यभरात बार, हॉटेल्स, ग्रंथालय सुरू करण्यात आली आहेत. तर दुसरीकडे गेल्या सात महिन्यांपासून बंद असलेल्या व्यायाम शाळा कधी सुरू होणार? हा प्रश्न व्यायाम शाळा चालवणारे व्यवसायिक आणि त्यावर अवलंबून असलेल्या हजारो कर्मचाऱ्यांना पडला आहे. ग्रंथालय सुरू करण्यास वाचन प्रेरणा दिवसाचा मुहूर्त साधला आता व्यायाम शाळांसाठी दसऱ्याचा मुहूर्त नक्की करा, अशी मागणी व्यायामशाळा व जिम मालकांनी मुख्यमंत्र्यांकडे या बैठकी दरम्यान केली. याला एकप्रकारे सकारात्मक प्रतिसाद मुख्यमंत्र्यांनी दिला आहे.
व्यायाम शाळा सुरू करण्याबाबत सगळी तयारी झाली आहे. याबाबत व्यायाम शाळांच्या मालकांनी एक एसओपी देखील राज्य सरकारकडे सादर केली आहे. त्यामुळे आता तरी सरकार परवानगी देईल आणि राज्यभरातील व्यायामशाळा सुरू होतील म्हणून व्यायामशाळा चालवणारे व्यावसायिक गेली दोन महिने झाले नुसती वाट पाहत आहेत. मात्र, अजूनही राज्य शासनाने कसलाही निर्णय घेतलेला नव्हता त्यामुळे याबाबत ठोस आश्वासन कधी मिळणार याची वाट जिम व्यवसायिक पाहत होते. त्यामुळे या आश्वासनामुळे नक्कीच एक आनंदाच वातावरण जिम व्यवसायिकांमध्ये पाहायला मिळतंय.
आज संपूर्ण जिम व्यवसाय ठप्प असताना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासोबत जिम मालक, व्यायामशाळा प्रतिनिधी व काही डॉक्टर यांच्यासोबत अर्धा तास चर्चा झाली. यामध्ये जिम सुरू कराव्यात की नाही? याबाबत बोलताना अखेर मुख्यमंत्री म्हणाले राज्य सरकार ज्या गाईडलाइन्स तयार करेल त्याचं काटेकोरपणे तुम्ही पालन करत असाल तर दसऱ्यापासून आपण राज्यभरातील जिम सुरू करू. सोबतच या गाईडलाइन्स सर्व राज्यभरातील जिम मालकांना लवकरात लवकर देऊन तशी तयारी करून या जिम सुरू कराव्यात, असं आश्वासन दिल्यामुळे नक्कीच जिम व्यवसायिकांना एकप्रकरे मोठा आनंद झाला आहे', असं जिम व्यवसायिकांनी सांगितलं.
Navratri 2020 | तुळजापुरात आधार कार्डशिवाय प्रवेश नाही, नवरात्रोत्सवाच्या पार्श्वभूमीवर निर्णय