एक्स्प्लोर

CM Speech Highlights : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या भाषणातील महत्त्वाचे दहा मुद्दे!

मुख्यमंत्री आजच्या संवादात अनेक महत्त्वाचे निर्णय घेतले. जाणून घेऊया मुख्यमंत्र्याच्या संवादातील महत्त्वाचे मुद्दे कोणते आहेत 

मुंबई : राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज पुन्हा जनतेशी संवाद यांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून जनतेशी संवाद साधला.  मुख्यमंत्री नेमकं कोणत्या मुद्द्यावर बोलतील याची उत्सुकता सर्वांना होती. मुख्यमंत्री आजच्या संवादात अनेक महत्त्वाचे निर्णय घेतले. जाणून घेऊया मुख्यमंत्र्याच्या संवादातील महत्त्वाचे मुद्दे कोणते आहेत 

मुख्यमंत्र्याच्या संवादातील महत्त्वाचे मुद्दे खालीलप्रमाणे

  • लसीचे दोन डोस घेतलेल्या प्रवाशांना 15 ऑगस्टपासून लोकल प्रवास

ज्या प्रवाशांनी लसीचे दोन्ही डोस घेतले असतील तसेच दुसरी लस घेऊन 14 दिवस झाले असतील त्यांना आपण 15 ऑगस्टपासून लोकलमधून प्रवास करण्याची मुभा देण्यात आली आहे.

  • आरक्षणाची 50 टक्क्यांची मर्यादा काढावी 

मराठा आरक्षण आणि ओबीसी आरक्षणा संदर्भात पंतप्रधान मोदी यांच्याशी चर्चा केली. यावेळी राज्यांना आरक्षण देण्याचा अधिकार देण्याची विनंती केली होती. त्याप्रमाणे त्यांनी हा अट काढली आहे. मात्र, आरक्षणाला 50 टक्क्यांची मर्यादा आहे. ही अट काढली नाही तर राज्यांना आरक्षण देण्याचा अधिकार देऊन काहीही उपयोग नाही. त्यामुळे ही अटही केंद्र सरकार काढतील अशी आमची अपेक्षा आहे.

  •  हॉटेल रेस्टॉरंटबाबतचा निर्णय उद्या जाहीर 

 हॉटेल रेस्टॉरंटबाबतचा निर्णय उद्या जाहीर करणार आहे. उद्या टास्क फोर्सच्या बैठकीनंतर हॉटेलबाबतचा निर्णय घेतला जाणार आहे

  •  सिंधुदुर्ग रत्नागिरी, रायगड, कोल्हापूर, सातारा, अहमदनगर, बीड, पुणे, सांगली  प्रादुर्भाव कायम

सिंधुदुर्ग रत्नागिरी, रायगड, कोल्हापूर, सातारा, अहमदनगर, बीड, पुणे, सांगली अशा काही  जिल्ह्यात अजून कोरोना प्रादुर्भाव अद्याप कमी झाला नाही.  ते जिल्हे सोडून उर्वरित ठिकाणी काही निर्बंध शिथील केले आहेत.

  • मंदिरे, प्रार्थनास्थळांबाबत अद्याप निर्णय नाही

मंदिरे, प्रार्थनास्थळांबाबत  टास्कफोर्सशी चर्चा करून निर्णय घेण्यात येणार असल्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे म्हणाले.

  • नीरज चोप्राचे मुख्यमंत्र्यांकडून कौतुक

टोकियो ऑलिम्पिकमध्ये सुवर्णफेक करत भारताला पहिलं सुवर्ण पदक मिळवून देणाऱ्या नीरज चोप्राचे मुख्यमंत्र्यांनी कौतुक केले. नीरजनं इतिहास रचत चमकदार कामगिरी नीरजने 87.88 मीटर भाला फेकत सुवर्ण पदकाला गवसणी घातली. तब्बल 13 वर्षानंतर  म्हणजे 2008 बीजिंग ऑलिम्पिकनंतरचं हे पहिलं सुवर्ण पदक आहे. 

  • कार्यालयीन वेळेची विभागणी करा

राज्यातील कार्यालयांनी आपल्या कार्यालयीन वेळेची विभागणी करा. आपल्याला काम बंद करायचं नाही. त्यामुळे आपले सर्व कारभार 24 तास उघडे ठेवू. पण कामाच्या वेळा, त्यांची विभागणी करु. गर्दी टाळा. 

  • कोरोनाचे नियम पाळणे गरजेचे

निर्बंध शिथिल केले तरी कोरोनाचे नियम पाळणे गरजेचे आहे.  मास्क घालणं, वेळोवेळी हात धुणं आणि सोशल डिस्टन्स ठेवणं गरजेचं आहे.

  • संयम तुटू देऊ नका

 राज्यातील सर्व सेवा  टप्प्याने सुरु करणार आहोत. मात्र, यासाठी पुढचे आठ ते दहा दिवस लागणार आहेत. सगळ्यांचा संयम आता थोडा-थोडा तुटत आला आहे.  पण संयम तुटू देऊ नका. कारण हा  धोक्याचा क्षण असतो. कारण ज्यावेळी आपल्याला वाटतं आता कोरोना गेला त्याचवेळी जास्त धोका असतो.

  • जिनोम सिक्वेन्सींग लॅब 

कोरोनाचा विषाणू वेगाने  बदलत आहे. हे लक्षात घेता नागरिकांनी वेळेत उपचार मिळावे यासाठी मुंबई महापालिकेने जिनोम सिक्वेन्सींग लॅब सुरु केली आहे. या लॅबचा उपयोग  राज्याला देखील होणार आहे.

महत्त्वाच्या बातम्या

Nashik Earthquake Marathi News: नाशिकमध्ये 4.3 रिश्टर स्केल तीव्रतेचा भूंकप, अनेकांच्या घराच्या भिंतीला तडे; रात्री 10 वाजता जमीन थरथरली, नेमकं काय घडलं?
नाशिकमध्ये 4.3 रिश्टर स्केल तीव्रतेचा भूंकप, अनेकांच्या घराच्या भिंतीला तडे; रात्री 10 वाजता जमीन थरथरली, नेमकं काय घडलं?
तुकाराम मुंढे आता दारू आणि बिअरमधील भेसळ रोखणार; दारुच्या चवी संदर्भात मद्यपींचा मध्यरात्री FDA ला कॉल
तुकाराम मुंढे आता दारू आणि बिअरमधील भेसळ रोखणार; दारुच्या चवी संदर्भात मद्यपींचा मध्यरात्री FDA ला कॉल
डॉक्टरांना मारहाण करणाऱ्या नगरसेवक रमेश म्हात्रेंची सुटका, पण तुरुंगातून बाहेर येताच थेट गोव्याला रवाना
डॉक्टरांना मारहाण करणाऱ्या नगरसेवक रमेश म्हात्रेंची सुटका, पण तुरुंगातून बाहेर येताच थेट गोव्याला रवाना
व्यापाऱ्याचं कुटुंब संपवण्याचा प्लॅन, घरातील नोकरानेच कट रचला, पण चांगलाच फसला; इमारतीतील सुरक्षा रक्षकाची हत्येत चौघांना अटक
व्यापाऱ्याचं कुटुंब संपवण्याचा प्लॅन, घरातील नोकरानेच कट रचला, पण चांगलाच फसला; इमारतीतील सुरक्षा रक्षकाची हत्येत चौघांना अटक

व्हिडीओ

Special Report Milk Rate Increased : दुधाच्या विक्री दरात दोन रुपयांची वाढ;११ ऑगस्टपासून नवे दर लागू
Sunil Tatkare vs Prashant Kishor Sunetra Pawar ; 'पीकें'ची अट राष्ट्रवादीत 'तट'? Special Report
Eknath Shinde and Shiv Sena MP Meet PM Modi :फुटीरांची ओळख परेड,दरे ते दिल्ली A टू Z Special Report
Devendra Fadnavis On Karjmafi : 6 लाख 22 हजार शेतकऱ्यांचं कर्ज माफ; देवेंद्र फडणवीस काय म्हणाले?
Sunil Tatkare on Prashant Kishor : प्रशांत किशोर आमच्या पक्षासाठी काम करतात हेच माहिती नाही

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
EPFO : ईपीएफओकडून पीएफच्या 8 नियमांमध्ये बदल, नोकरी सोडल्यानंतर पीएफ खात्यातील पूर्ण रक्कम कधी काढता येणार?
ईपीएफओकडून पीएफच्या 8 नियमांमध्ये बदल, नोकरी सोडल्यानंतर पीएफ खात्यातील पूर्ण रक्कम कधी काढता येणार?
FDA : महाराष्ट्रातील तुकाराम मुंढेंच्या कारवाईचा पॅटर्न कर्नाटकात पोहोचला, एफडीएचा 5 पंचतारांकित हॉटेलला दणका
महाराष्ट्रातील तुकाराम मुंढेंच्या कारवाईचा पॅटर्न कर्नाटकात पोहोचला, एफडीएचा 5 पंचतारांकित हॉटेलला दणका
Manoj Jarange Patil : देवेंद्र फडणवीस, एकनाथ शिंदेंना कितीही वळवळ करु द्या त्यांचा माज मोडल्याशिवाय गप्प बसणार नाही : मनोज जरांगे
देवेंद्र फडणवीस, एकनाथ शिंदेंना कितीही वळवळ करु द्या त्यांचा माज मोडल्याशिवाय गप्प बसणार नाही : मनोज जरांगे
तुकाराम मुंढे आता दारू आणि बिअरमधील भेसळ रोखणार; दारुच्या चवी संदर्भात मद्यपींचा मध्यरात्री FDA ला कॉल
तुकाराम मुंढे आता दारू आणि बिअरमधील भेसळ रोखणार; दारुच्या चवी संदर्भात मद्यपींचा मध्यरात्री FDA ला कॉल
डॉक्टरांना मारहाण करणाऱ्या नगरसेवक रमेश म्हात्रेंची सुटका, पण तुरुंगातून बाहेर येताच थेट गोव्याला रवाना
डॉक्टरांना मारहाण करणाऱ्या नगरसेवक रमेश म्हात्रेंची सुटका, पण तुरुंगातून बाहेर येताच थेट गोव्याला रवाना
व्यापाऱ्याचं कुटुंब संपवण्याचा प्लॅन, घरातील नोकरानेच कट रचला, पण चांगलाच फसला; इमारतीतील सुरक्षा रक्षकाची हत्येत चौघांना अटक
व्यापाऱ्याचं कुटुंब संपवण्याचा प्लॅन, घरातील नोकरानेच कट रचला, पण चांगलाच फसला; इमारतीतील सुरक्षा रक्षकाची हत्येत चौघांना अटक
झारखंड सरकारसोबत विद्यार्थ्यांची चर्चा निष्फळ, सूचनांसाठी ईमेल आणि फीडबॅक नंबर जाहीर; पीएससी रद्द करण्याच्या मागणीसाठी 6 विद्यार्थ्यांचे उपोषण
झारखंड सरकारसोबत विद्यार्थ्यांची चर्चा निष्फळ, सूचनांसाठी ईमेल आणि फीडबॅक नंबर जाहीर; पीएससी रद्द करण्याच्या मागणीसाठी 6 विद्यार्थ्यांचे उपोषण
मनोज जरांगेंनंतर आता नरेंद्र पाटीलही आक्रमक; मराठा युवकांच्या जात प्रमाणपत्रावरुन अधिकाऱ्यांवर संताप
मनोज जरांगेंनंतर आता नरेंद्र पाटीलही आक्रमक; मराठा युवकांच्या जात प्रमाणपत्रावरुन अधिकाऱ्यांवर संताप
Embed widget