एक्स्प्लोर
Advertisement
... तर पंकजा मुंडेंची चौकशी करु : मुख्यमंत्री
सॅनिटरी नॅपकिन खरेदीबाबत विधान परिषदेचे विरोधी पक्ष नेते धनंजय मुंडे यांनी पंकजा मुंडेंवर आरोप केले होते.
नागपूर : ग्रामविकास आणि महिला व बालकल्याण मंत्री पंकजा मुंडे यांच्यावर झालेल्या बचत गट आणि सॅनिटरी नॅपकीन खरेदीच्या आरोपांमध्ये तथ्य आढळलं तर चौकशी करू, असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट केलं.
सॅनिटरी नॅपकिन खरेदीबाबत विधान परिषदेचे विरोधी पक्ष नेते धनंजय मुंडे यांनी पंकजा मुंडेंवर आरोप केले होते. मात्र हे सर्व आरोप पंकजा मुंडे यांनी फेटाळून लावले होते. शिवाय अजून कोणलाही कंत्राट दिलेलं नाही, असंही त्यांनी स्पष्ट केलं होतं.
अंतिम आठवडा प्रस्तावाला उत्तर देताना पंकजा मुंडे बोलत होत्या. शासनाला एकही पैसा यात द्यावा लागणार नाही, एखाद्या व्यक्तीला फायदा व्हावा म्हणून हे केलेलं नाही, हा आरोप अन्यायकारक असल्याचं पंकजा मुंडे म्हणाल्या.
''महिला बचतगटांना फायदा व्हावा, तसंच ग्रामीण भागातल्या महिलांना सॅनिटरी नॅपकिन्स कमी किंमतीत उपलब्ध व्हाव्यात म्हणून नियमात राहून याबाबत निविदा काढण्यात आल्या. महिला बचत गट या नॅपकिन्सची खरेदी करून विक्री करतील, यात सरकारचा पैसा गुंतलेला नाही'', अशी माहिती पंकजा मुंडे यांनी दिली.
महिलांच्या सॅनिटरी नॅपकिन्सबाबत कोणी राजकारण करत असेल तर त्याला काय म्हणावं, असा सवालही त्यांनी केला. अस्मिता ब्रँड सुरू करणार असल्याची माहिती पंकजा मुंडे यांनी दिली. या ब्रँड च्या माध्यमातून बाजारपेठ निर्माण करून वेगवेगळ्या वस्तू ग्रामीण भागात स्वस्त दरात उपलब्ध करून दिल्या जातील, त्यामुळे महिला बचत गटांनाही फायदा होईल, असं त्यांनी सांगितलं.
उलट अशा योजनेबद्दल सरकारचं कौतुक केलं पाहिजे, टिशू पेपर पासून नॅपकिन्स बनवणं आता आउटडेटेड झालंय. यात कोणताही भ्रष्टाचार आणि कोणालाही झुकतं माप देण्याचा प्रयत्न झालेला नाही, असं स्पष्टीकरण त्यांनी आरोपांवर दिलं. मात्र यात काहीही तथ्य आढळलं तर चौकशी करु, असंही आता मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केलं आहे.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
क्राईम
ट्रेडिंग न्यूज
क्रिकेट
व्यापार-उद्योग
Advertisement