एक्स्प्लोर
Advertisement
ताट हातात घेऊन रांगेत, नागपुरात मुख्यमंत्र्यांचं पोलिसांसोबत जेवण
त्यांनी रांगेत उभं राहून ताट हातात घेऊन जेवण वाढून घेतलं आणि पोलिसांसोबत जेवण केलं. पावसाळी अधिवेशनासाठी 15 जिल्ह्यातले पोलीस सध्या नागपुरात आहेत.
नागपूर : गृहमंत्री असलेल्या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नागपुरात पोलीस कॅम्पला भेट दिली आणि पोलिसांसोबत जेवण केलं. त्यांनी रांगेत उभं राहून ताट हातात घेऊन जेवण वाढून घेतलं आणि पोलिसांसोबत जेवण केलं.
पावसाळी अधिवेशनासाठी 15 जिल्ह्यातले पोलीस सध्या नागपुरात आहेत. पोलिसांसाठी पिकअप व्हॅन, ड्युटीवर असताना अन्नपुरवठा आणि कॉलवर रुग्णवाहिका अशा सुविधा उपलब्ध करुन देण्यात आलेल्या आहेत. पावसाळी अधिवेशन पहिल्यांदाच नागपुरात होत आहे.
अधिवेशन काळातील पोलिसांच्या कामगिरीबद्दल मुख्यमंत्र्यांनी सर्वांचं कौतुक केलं. शिवाय राज्य सरकारकडून पोलिसांसाठी करण्यात येत असलेल्या उपयायोजनांबद्दलही माहिती दिली.
पोलीस कुटुंबीयांसाठी अनेक कल्याणकारी योजना आणल्या असून नवीन 50 हजार घरांचं बांधकाम सुरु आहे, असं त्यांनी सांगितलं.
पाहा व्हिडीओ :
When CM @Dev_Fadnavis himself lines up in the queue and joins for dinner and interacts with police personnel at RPTS police camp at #Nagpur .#MonsoonSession pic.twitter.com/qAIsuUIrJy
— CMO Maharashtra (@CMOMaharashtra) July 13, 2018
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
सोलापूर
क्रीडा
भारत
बॉलीवूड
Advertisement