एक्स्प्लोर
कर्जमाफी : एकाच आधार क्रमांकाचे शेकडो लाभार्थी
थकीत कर्जदार शेतकऱ्यांकडून प्राप्त झालेले अर्ज आणि आणि बँकांच्या यादीत तफावत असल्याने कर्जमाफीला विलंब होत असल्याचं समोर आलं आहे.
![कर्जमाफी : एकाच आधार क्रमांकाचे शेकडो लाभार्थी Cm Fadnavis Called Urgent Meeting To Discucc On Farmer Laon Waiver Issue कर्जमाफी : एकाच आधार क्रमांकाचे शेकडो लाभार्थी](https://static.abplive.com/wp-content/uploads/sites/4/2017/09/29141516/Cm-meeting-580x395.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=1200&height=675)
मुंबई : कर्जमाफीसाठी केलेली घाई सरकारच्या अंगाशी येण्याची शक्यता आहे. कर्जमाफीची रक्कम खात्यात जमा होण्यासाठी शेतकऱ्यांना आणखी काही काळ वाट पाहावी लागणार आहे. बँकांकडून मिळालेल्या माहितीत प्रचंड घोळ असल्याने सरकार हतबल झालं आहे.
कर्जमाफी लाभार्थ्यांच्या यादीत तुमचं नाव आहे का? इथे चेक करा!
बँकांच्या यादीत एकाच खात्याचे किंवा आधार क्रमांकाचे शेकडो लाभार्थी आहेत. थकीत कर्जदार शेतकऱ्यांकडून प्राप्त झालेले अर्ज आणि आणि बँकांच्या यादीत तफावत असल्याने कर्जमाफीला विलंब होत असल्याचं समोर आलं आहे. कर्जमाफी उपसमितीच्या बैठकीत याबाबत आढावा घेण्यात आला.
कर्जमाफी लाभार्थ्यांच्या यादीत तुमचं नाव आहे का? इथे चेक करा!
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज (बुधवार) बँक प्रतिनिधी आणि सहकार विभागाची तातडीची बैठक बोलावली आहे. या बैठकीत या गोंधळावर सविस्तर चर्चा केली जाईल आणि पुढील आदेश दिले जातील.
आतापर्यंतची स्थिती काय?
- कर्जमाफीसाठी 56.59 लाख शेतकऱ्यांचे अर्ज
- बँकांकडून 26 लाख शेतकऱ्यांच्या खात्यांची माहिती सरकारला देण्यात आली
- 4 लाख खात्यांच्या माहितीत विसंगती आढळून आली
- 2 ते 2.5 लाख खात्यांच्या नावे अनेक लाभार्थी आणि आधार कार्ड नंबर आढळून आले.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
क्राईम
परभणी
राजकारण
राजकारण
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)