CM Eknath Shinde : आम्ही 50 थर लावले, पुन्हा गुवाहाटीला जाऊ; मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची कोपरखळी
CM Eknath Shinde : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या दहीहंडीसाठी टेंभीनाका येथे मोठी गर्दी झालेली पाहायला मिळत आहे. या दहीहंडीला अभिनेत्री श्रद्धा कपूरची विशेष उपस्थिती पाहायला मिळाली.
![CM Eknath Shinde : आम्ही 50 थर लावले, पुन्हा गुवाहाटीला जाऊ; मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची कोपरखळी CM Eknath Shinde We planted 50 human towers says Chief Minister Eknath Shinde marathi news updates CM Eknath Shinde : आम्ही 50 थर लावले, पुन्हा गुवाहाटीला जाऊ; मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची कोपरखळी](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/08/19/3aef7e56b5b42a9bb43cfdfb7c32a8301660900116152322_original.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=1200&height=675)
CM Eknath Shinde : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांनी सत्तांतरावरून शिवसेनेवर निशाणा साधला आहे. आम्ही 50 थर लावले, आपण जाऊया लवकरच गुवाहाटीला जाऊया असं म्हणत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी कोपरखळी दिली आहे. राज्यभरात दहीहंडीचा उत्साह पाहायला मिळत आहे. मुंबईसह ठाण्यातही मानाच्या दहीहंडी उत्सावाला सुरुवात झाली आहे. ठाण्यातील टेंभी नाका येथील शिवसेनेची दहीहंडी मोठी प्रतिष्ठेची मानली जाते. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या दहीहंडीसाठी टेंभीनाका येथे मोठी गर्दी झालेली पाहायला मिळत आहे. या दहीहंडीला अभिनेत्री श्रद्धा कपूरची विशेष उपस्थिती पाहायला मिळाली. यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे बोलत होते.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी म्हटलं आहे की, यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी नव्या सरकारने जाहीर केलेल्या नव्या घोषणा आणि योजनांचा पुनरुच्चार केला. त्यांनी सांगितलं की, दहीहंडीला आता साहसी खेळाचा दर्जा देण्यात आला आहे. पुढील वर्षीपासून प्रो गोविंदा स्पर्धेचं आयोजन करण्यात येणार आहे. तसेच जखमी गोविंदांवर शासकीय रुग्णालयांमध्ये मोफत उपचार करण्यात येणार आहेत.
जखमी गोविंदांवर शासकीय रुग्णालयांमध्ये मोफत उपचार
देशभरात गोपाळकालाचा उत्साह पाहायला मिळत आहे. दहीहंडीला खेळाचा दर्जा देण्यात आल्याची घोषणा करत सरकारी नोकऱ्यांमध्ये गोविंदांना पाच टक्के आरक्षणाचा लाभ देण्याची घोषणा केल्यानंतर सरकारनं आता पुन्हा एक महत्वाची घोषणा केली आहे. दहीहंडी कार्यक्रमादरम्यान कोणत्याही गोविंदास दुखापत झाल्यास शासकीय रुग्णालयांमध्ये त्यांना मोफत उपचार देण्यात यावेत, असे आदेश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिले आहेत.
गोविंदास दुखापत झाल्यास शासकीय रुग्णालयांमध्ये त्यांना मोफत उपचार
दहीहंडी कार्यक्रमादरम्यान कोणत्याही गोविंदास दुखापत झाल्यास शासकीय रुग्णालयांमध्ये त्यांना मोफत उपचार देण्यात यावेत अशी घोषणा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी काल विधानसभेत केली होती. त्यानुसार राज्यातील सर्व शासकीय दवाखाने, वैद्यकीय महाविद्यालये, महानगरपालिका, नगरपालिका, जिल्हापरिषदेचे दवाखाने यांना नि:शुल्क वैद्यकिय उपचार करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. यासंदर्भात काढण्यात आलेला शासन निर्णय हा स्थायी असून यावर्षी पासून दर वर्षासाठी लागू राहील.
मृत आणि जखमी गोविंदांसाठी मदत
यानुसार गोविंदा पथकातील खेळाडुचा दहीहंडीच्या थरावरुन पडून मृत्यू झाल्यास कायदेशीर वारसास 10 लाख रुपयाचे आर्थिक सहाय्य करण्यात येईल. दहीहंडी च्या थरावरुन प्रत्यक्ष पडून दोन्ही डोळे अथवा दोन्ही हात, दोन्ही पाय अथवा कोणतेही महत्त्वाचे दोन अवयव निकामी झाल्यास त्याला 7 लाख 50 हजार रुपये इतके आर्थिक सहाय्य करण्यात येईल. दहीहंडीच्या थरावरुन पडल्याने एक हात किंवा एक पाय किंवा कोणताही एक महत्त्वाचा अवयव निकामी झाल्यास किंवा गंभीर इजा झाल्यास त्याला 5 लाख इतके आर्थिक सहाय्य केले जाईल. हा आदेश केवळ या वर्षीसाठी (वर्ष 2022) लागू राहील.
राज्यभरात दहीहंडीचा उत्साह
महाराष्ट्रात दहीहंडीचं (Dahihandi) वेगळं आकर्षण आहे. राज्यात दहीहंडीचा विशेष उत्साह दिसत आहे. मुंबई, ठाण्यासह पुण्यात दहीहंडीचा मोठा उत्सव साजरा केला जातो. विविध मंडळांकडून दहीहंडी उत्सवात लाखोंच्या बक्षीस देण्यात येतात. गोविंदा पथकं अनेक महिने मानवी मनोरे लावण्यासाठी सराव करत असतात. कोरोना संकटामुळं यंदा तब्बल दोन वर्षांनी दहीहंडी साजरी होणार आहे. त्यामुळे मुंबई, पुण्यातील गोविंदा पथकं मनोरे रचायला सज्ज झाले आहेत. कोणताही अनुचित प्रकार घडू नये म्हणून पोलिसांकडून सुरक्षेची सर्वोतोपरी काळजी घेतली आहे.
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)