विझलेल्या मशालीचा उजेड पडत नाही, मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा ठाकरेंवर हल्लाबोल
रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग शिवसेनेची दोन फुफ्फुसं आहेत. सुरुवातीपासून कोकणी माणूस बाळासाहेब ठाकरे यांच्या पाठीशी उभा राहिला. सर्वसामान्यांना न्याय देणारं सरकार आहे. विघ्नसंतुष्ट लोकांचा नायनाट केल्याशिवाय राहणार नाही. खरी शिवसेना आपल्याकडे आहे. आम्ही सत्तेसाठी नाही, आम्ही तत्वासाठी लढाई केली.
Eknath Shinde Speech : विझलेल्या मशालीचा उजेड पडत नाही असा हल्लाबोल राजापुरातून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांनी केला. शिवसंकल्प अभियानासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आज रत्नागिरीच्या दौऱ्यावर आले होते. यावेळी बोलताना शिंदे यांनी उद्धव ठाकरेंवर टीकास्त्र सोडलं. गुवाहाटीला असताना दीपक केसरकर यांनी उत्तम भूमिका बजावल्याचं एकनाथ शिंदे यांनी सांगितलं.
रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग शिवसेनेची दोन फुफ्फुसं आहेत. सुरुवातीपासून कोकणी माणूस बाळासाहेब ठाकरे यांच्या पाठीशी उभा राहिला. सर्वसामान्यांना न्याय देणारं सरकार आहे. विघ्नसंतुष्ट लोकांचा नायनाट केल्याशिवाय राहणार नाही. खरी शिवसेना आपल्याकडे आहे. आम्ही सत्तेसाठी नाही, आम्ही तत्वासाठी लढाई केली.
आमची भूमिका चुकीची असते, तर जनतेने पाठ फिरवली असती. सत्ता येते, सत्ता जाते, पण सत्तेपेक्षा मोठं नाव असतं. ते जपायचं असतं. बाळासाहेब ठाकरेंचं विचार हीच आमची संपत्ती होय. बाळासाहेब ठाकरे यांचं नाव आणि विचार पुढे न्यायचं आहे. बाळासाहेबांचं विचार हीच आमची संपत्ती होय, असे एकनाथ शिंदे म्हणाले.
बाळासाहेबांचा धनुष्यबाण आपल्याकडे -
धनुष्यबाणचाचे खच्चीकरण होतं, सावरकरांचा अपमान होत होता. गुवाहटीला असताना केसरकरांनी उत्तम भुमिका बजावली. सुरुवातीपासून बाळासाहेबांच्या शिवसैनिकांनी एकनाथ शिंदेंना साथ दिली आणि सत्तांतर घडलं. हे सर्वसामान्यांना न्याय देणारे सरकार आहे. सर्वसामान्यांचा, बाळासाहेबांचा धनुष्यबाण आपल्याकडे आहे. खरी शिवसेना धनुष्यबाण चिन्ह आमच्याकडे आहे, असे एकनाथ शिंदे म्हणाले.
बाळासाहेबांचे विचार हीच आमची संपत्ती -
विझलेल्या मशालीचा उजेड पडत नाही. बाळासाहेब सांगायचे सत्ता येते सत्ता जाते नाव एकदा गेलं की पुन्हा येत नाही. त्यामुळे सत्तेपेक्षा विचार मोठे, पक्षाची विचारसरणी महत्वाची आहे. बाळासाहेबांच्या विचारांचे वारसदार आपण आहोत. बाळासाहेबांची संपत्ती नको.. बाळासाहेबांचे विचार हीच आमची संपत्ती आहे. 50 कोटींची मागणी केली, त्यांना बाळासाहेब नको.. त्यांना बाळासाहेबांचे विचार नको, त्यांना पैसे हवेत. मी क्षणाचाही विचार न करता द्या सांगितलं , असा हल्लाबोल एकनाथ शिंदे यांनी केला.
राम मंदिराच्या अस्तित्वावर प्रश्न -
22 जानेवारीला अयोध्येच्या राम मंदिराचे लोकार्पण होत आहे. बाळासाहेबांचं स्वप्न कोण पूर्ण करतंय. देशात प्रचंड उत्साह आहे. राम मंदिर हा विषय श्रद्धेचा अस्मितेचा विषय आहे.राजकारण कधी केलं नाही. बाळासाहेब असते तर मोदींची पाठ थोपटली असती. राम मंदिराच्या अस्तित्वावर प्रश्न चिन्ह उपस्थित केलं गेलं, असेही शिंदे म्हणाले.
एक रुपयांत पिक विमा देणारे पहिले राज्य -
अहंकारापोटी केंद्राकडे पैसे मागितले जात नव्हते. गरीबी हटाओचा नारा दिला गेला. मात्र गरीबी हटली नाही. या देशात उपाशी राहू नये, आपलं सरकार देणारं आहे, घेणारं नाही. शेतकऱ्यांना आता 12 हजार वर्षाला मिळणार आहेत. एक रुपयांत पिक विमा देणारे पहिले राज्य आहे. एसटीत 50 टक्के सवलतीचा निर्णय घेतला. कलेक्टर, एसपी सगळ्यांना कामाला लावून लाभर्थ्यांची नाव शोधून 22 शासन आपल्या दारी कार्यक्रमात 2 कोटी वीस लाख लोकांनी लाभ घेतला, असे शिंदे म्हणाले.
आणखी वाचा :
VIDEO : अरे किरण, काल किती फोन केले, उचलले नाहीत, मुख्यमंत्र्यांची किरण सामंतांना विचारणा!