एक्स्प्लोर

आयुष्यात कधी खोटं बोललो नाही, बोलणारही नाही! अजून खूप सत्य बाहेर येणं बाकी : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

Eknath Shinde : मी दिलेल्या मुलाखतीतील शब्द अन् शब्द हा खरा आहे. त्यातील बऱ्याचशा खऱ्या गोष्टी अजून बाहेर येणे बाकी असल्याचे सांगत मुख्यमंत्र्यांनी आज दिलेल्या मुलाखतीबाबत खुलासा केला आहे. 

Shirdi Lok Sabha Election : मी दिलेल्या मुलाखतीतील शब्दन् शब्द हा खरा आहे. त्यातील बऱ्याचशा खऱ्या गोष्टी अजूनही बाहेर येणे बाकी असून त्या एका ब्रेक नंतर बाहेर येतील. जेव्हा एका कार्यकर्ता एवढा मोठा निर्णय घेतो तेव्हा त्याच्या पाठीमागे हे घडणं अगदी स्वाभाविक आहे. मी आयुष्यात कधी खोटं बोललो नाही आणि बोलणारही नाही. माझे काही तत्व आहेत. माझ्यावर बाळासाहेबांचे, दिघे साहेबांचे संस्कार आहेत. त्यामुळे जिथे अन्याय तिथे न्यायासाठी लढणारा माझा स्वभाव असल्याचे सांगत मुख्यमंत्र्यांनी (CM Eknath Shinde)आज दिलेल्या मुलाखतीबाबत खुलासा केला आहे. 

शिर्डी लोकसभा मतदारसंघात (Shirdi Lok Sabha Constituency) महायुतीचे शिवसेना शिंदे गटाचे उमेदवार सदाशिव लोखंडे (Sadashiv Lokhande) यांचा उमेदवारी अर्ज दाखल करण्याकरीता आज जाहीर सभेचे आयोजन करण्यात आले होते. या सभेत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी चौफेर फटकेबाजी करत विरोधकांवर निशाणा साधला. ही सभा आटपून मुख्यमंत्र्यांनी साई मंदिरात जाऊन साई बाबांचे दर्शन घेतलं. त्यानंतर ते माध्यमांशी बोलत असतांना त्यांनी हे भाष्य केलंय. 

एवढ्या खालच्या स्तराचं राजकारण कधीही झालं नव्हतं 

राज्यात आज मोठ्या प्रमाणात विकासकामे होत आहेत. त्यामुळे आम्ही त्यात व्यस्त असून विरोधकांना कुठलेही काम उरले नसल्याने ते केवळ टीका करत आहेत. महाराष्ट्र हे सुसंस्कृत राज्य आहे. आजवर एवढ्या खालच्या स्तराचं राजकारण कधी झालं नव्हतं. कुटुंबावर, महिलांवर खालच्या पातळीवरती टीका करणे, ही आपली संस्कृती नाही. असे असताना महाराष्ट्राची जनता सुज्ञ आहे. अशा आरोपांना आम्ही उत्तर आमच्या कामातनं देऊ, असे म्हणत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी संजय राऊतांच्या वक्तव्याचा खरपूस समाचार घेत अप्रत्यक्षपणे निशाणा साधला आहे.

 त्यांच्यावर आपण न बोललेलं बरं

ज्यांनी शिवसेनेचे विचार विकले, बाळासाहेबांच्या तत्त्वांना मूठमाती दिली. खुर्ची आणि पदासाठी जी तडजोड केली, आम्ही ती कदापि सहन करणार नाही. त्यामुळे अंबादास दानवे हे त्यांच्या मनाविरुद्ध बोलले असतील. त्यांना आमच्याबद्दल बोलण्याचा कुठलाही अधिकार नाही, असेही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले. महाविकास आघाडी ही तीन तिघाडी, काम बिघाडी आहे. ते एकमेकांच्या तंगड्यात तंगडं घालून कोसळणार आहेत. त्यामुळे त्यांच्यावर आपण न बोललेलं बरं, असे म्हणत मुख्यमंत्र्यांनी सांगलीच्या जागेवरून सुरू असलेला घडामोडी बद्दल भाष्य केलंय. 

राहुल गांधी गरम झाले तर थंड व्हायला परदेशात जातात 

देशाच्या जनतेने मोदींना पंतप्रधान करण्याचे ठरवले आहे. दुसरीकडे राहुल गांधी गरम झाले तर थंड व्हायला परदेशात जात असतात. मात्र नरेंद्र मोदी ऊन, वारा, पाऊस कसलीही तमा न बाळगता अहोरात्र देशासाठी काम करत आहेत. त्यामुळे असा पंतप्रधान कोणाला नकोय? देशाची बदनामी करणारा पंतप्रधान हवा आहे, की देशाची उन्नती करणारा, हे देशातील जनतेने ठरवले आहे. त्यामुळे नरेंद्र मोदी हे तिसऱ्यांदा पंतप्रधानपदी विराजमान होतील असा विश्वासही मुख्यमंत्र्यांनी बोलताना व्यक्त केला.

इतर महत्वाच्या बातम्या 

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

Devendra Fadnaivs : मी आतापर्यंत संयम पाळलाय, त्यांचा संयम थोडा ढळलाय, अजित पवार 15 तारखेनंतर बोलणार नाहीत : देवेंद्र फडणवीस
देवाभाऊ काही म्हणत नाही, देवाभाऊचं काम बोलतं,अजित दादा बोलतात, माझं काम बोलतं : देवेंद्र फडणवीस
IND vs NZ 1st ODI : टीम इंडियाचा 2026 चा श्रीगणेशा! वडोदऱ्यात भारतीय वाघांची विजयी डरकाळी, किवींचा सुपडा साफ
टीम इंडियाचा 2026 चा श्रीगणेशा! वडोदऱ्यात भारतीय वाघांची विजयी डरकाळी, किवींचा सुपडा साफ
अदानी ते रसमलाई, ही आपली मुंबई; राज ठाकरेंचं घणाघाती भाषण, मराठी माणसांना त्वेषाने पेटून उठण्याचं आवाहन
अदानी ते रसमलाई, ही आपली मुंबई; राज ठाकरेंचं घणाघाती भाषण, मराठी माणसांना त्वेषाने पेटून उठण्याचं आवाहन
साडे तीनशे वर्षांपूर्वी आपल्या छत्रपती शिवाजी महाराजांनी सूरत लुटली त्याचा राग काहींच्या मनात आजही आहे हे विसरु नका : जयंत पाटील
मुंबईचा महापौर ठाकरे बंधू ठरवतील, ठाकरे बंधूंच्या संयुक्त सभेचं मैदान जयंत पाटील यांनी गाजवलं

व्हिडीओ

Aaditya Thackeray Speech ShivajiPark: भरसभेत फडणवीसांची मिमिक्री, कोस्टल रोडवरून हल्लाबोल
Praniti Shinde on BJP :  काँग्रेस खासदार प्रणिती शिंदेची देवेंद्र फडणवीस यांच्यावर सडकून टीका
Prakash Mahajan On Sanjay Raut Thane : संजय राऊत यांच्यावर टीका करताना प्रकाश महाजन यांची जीभ घसरली
Rupali Thombare Pune:Ajit Pawar यांचा एकेरी उल्लेख करणाऱ्या Mahesh Landgeयांच्यावर ठोंबरे संतापल्या
Sanjay Raut Mumbai: फडणवीसांना आव्हान, 11 लाखांचं बक्षीस; ठाकरें बंधूंच्या सभेआधी संजय राऊत काय काय म्हणाले?

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Devendra Fadnaivs : मी आतापर्यंत संयम पाळलाय, त्यांचा संयम थोडा ढळलाय, अजित पवार 15 तारखेनंतर बोलणार नाहीत : देवेंद्र फडणवीस
देवाभाऊ काही म्हणत नाही, देवाभाऊचं काम बोलतं,अजित दादा बोलतात, माझं काम बोलतं : देवेंद्र फडणवीस
IND vs NZ 1st ODI : टीम इंडियाचा 2026 चा श्रीगणेशा! वडोदऱ्यात भारतीय वाघांची विजयी डरकाळी, किवींचा सुपडा साफ
टीम इंडियाचा 2026 चा श्रीगणेशा! वडोदऱ्यात भारतीय वाघांची विजयी डरकाळी, किवींचा सुपडा साफ
अदानी ते रसमलाई, ही आपली मुंबई; राज ठाकरेंचं घणाघाती भाषण, मराठी माणसांना त्वेषाने पेटून उठण्याचं आवाहन
अदानी ते रसमलाई, ही आपली मुंबई; राज ठाकरेंचं घणाघाती भाषण, मराठी माणसांना त्वेषाने पेटून उठण्याचं आवाहन
साडे तीनशे वर्षांपूर्वी आपल्या छत्रपती शिवाजी महाराजांनी सूरत लुटली त्याचा राग काहींच्या मनात आजही आहे हे विसरु नका : जयंत पाटील
मुंबईचा महापौर ठाकरे बंधू ठरवतील, ठाकरे बंधूंच्या संयुक्त सभेचं मैदान जयंत पाटील यांनी गाजवलं
Raj Thackery Video: मुंबई वाचवायचीय, ही शेवटची लढाई, त्वेषाने लढा, आज हरलात तर संपून जाल; राज ठाकरे यांचा हल्लाबोल
Raj Thackery Video: मुंबई वाचवायचीय, ही शेवटची लढाई, त्वेषाने लढा, आज हरलात तर संपून जाल; राज ठाकरे यांचा हल्लाबोल
Gold Rate : 2025 मध्ये सोन्याचे दर 65 टक्क्यांनी वाढले, 2026 मध्ये काय घडणार? तज्ज्ञ अंदाज वर्तवत म्हणाले...
2025 मध्ये सोन्याचे दर 65 टक्क्यांनी वाढले, 2026 मध्ये काय घडणार? तज्ज्ञ अंदाज वर्तवत म्हणाले...
Video: आक्रमक भाषण, दाखव रे तो फोटो, फडणवीसांची दुसऱ्यांदा मिमिक्री; शिवाजी पार्कवर आदित्य ठाकरेंचीही तोफ धडाडली
Video: आक्रमक भाषण, दाखव रे तो फोटो, फडणवीसांची दुसऱ्यांदा मिमिक्री; शिवाजी पार्कवर आदित्य ठाकरेंचीही तोफ धडाडली
भाजप उमेदवारासाठी मतदारांना 3 हजारांचं पाकीट, शिवसेना कार्यकर्त्यांची धाड; डोंबिवलीतील धक्कादायक प्रकार
भाजप उमेदवारासाठी मतदारांना 3 हजारांचं पाकीट, शिवसेना कार्यकर्त्यांची धाड; डोंबिवलीतील धक्कादायक प्रकार
Embed widget