एक्स्प्लोर

'तुम्ही पत्रकारांना जेलमध्ये टाकलं, सत्तेची मस्ती नसावी म्हणता, मग त्यावेळी कोणती मस्ती होती...!' मुख्यमंत्र्यांचा विरोधकांवर हल्लाबोल

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath shinde) यांनी आज हिवाळी अधिवेशनात (Nagpur Hiwali Adhiveshan) अंतिम आठवडा प्रस्तावावर बोलताना विरोधकांवर जोरदार हल्लाबोल केला.

CM Eknath Shinde at Maharashtra Winter Assembly Session: मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath shinde) यांनी आज हिवाळी अधिवेशनात (Nagpur Hiwali Adhiveshan) अंतिम आठवडा प्रस्तावावर बोलताना विरोधकांवर जोरदार हल्लाबोल केला. मुख्यमंत्री म्हणाले की, महाविकास आघाडीच्या सरकारच्या काळात आमदार हनुमान चालीसा वाचायला बसला तर त्याला तुम्ही जेलमध्ये टाकलं.त्यांच्या खासदार पत्नीलाही जेलमध्ये टाकलं. पत्रकार अर्णब गोस्वामी आणि राहुल कुलकर्णी यांना जेलमध्ये टाकलं. गिरीश महाजन यांचा पूर्ण कार्यक्रम केला होता. आमच्या सरसकट चौकशा लावण्याचं त्यावेळी पाप केलं होतं. दादा (अजित पवारांना उद्देशून) तुम्ही आम्हाला सांगता की, सत्तेची मस्ती नसावी मग त्यावेळी कोणती मस्ती होती, असंही मुख्यमंत्री म्हणाले. 

मुख्यमंत्री म्हणाले की, अडीच वर्षात तुम्ही विदर्भासाठी कोणता निर्णय घेतला. विदर्भातील शेतकरी चांगल्या  गाडीतून फिरला पाहिजे. विमानातून शेतकरी फिरला पाहिजे. तालुक्यांत विमानतळ सुरु करतोय. मुख्यमंत्री कसा हेलिकॉप्टरने शेतावर जातो म्हणून हिणवलं. दुसरा मुख्यमंत्री हेलिकॉप्टरने जाणारा दाखवा आणि बक्षिस मिळवा असं म्हटले. मी तर म्हणतो मागचे मुख्यमंत्री कधी घराबाहेर पडले हे दाखवा आणि बक्षिस मिळवा, असं ते म्हणाले. 

मुख्यमंत्री म्हणाले की, काही न करता तुम्ही लोकांना आतमध्ये टाकलं होतं. सूडबुद्धीने कोणतीही कारवाई हे सरकार करणार नाही. चर्चेमध्ये नक्षलवाद संदर्भात ही उल्लेख करण्यात आले.  तीन महिला नक्षल्यांना अटक केली.  गृहमंत्री स्वतः पालकमंत्री आहेत. आम्ही राज्यातून नक्षलवाद संपवून टाकणार आहोत, असं ते म्हणाले. 

महापुरुषांच्या अवमान करणाऱ्यांसंदर्भात गंभीर चर्चा केली 

मुख्यमंत्री म्हणाले की, महापुरुषांचा अपमान केला म्हणून तुम्ही आमच्यावर टीका केली.  मात्र शिवाजी महाराज यांच्या वंशजाकडे पुरावे कोणी मागितले.  महात्मा फुले आणि सावित्रीबाई फुले यांचे तैलचित्र तुम्ही लावू शकले नाही मात्र आम्ही ते लावले.  बाळासाहेब ठाकरे यांचंही तैलचित्र लावण्याचं काम आम्ही केलं. मुख्यमंत्री वैद्यकीय सहायता निधीमधून लोकांना मदत करत आहोत. महापुरुषांच्या अवमानासंदर्भात गंभीर चर्चा केली आहे.  कायद्यात काही सुधारणा करता येतील का या संदर्भात ही निर्णय घेतला जाईल.

मुख्यमंत्री म्हणाले की, एनआयटीचा घोटाळा काढला. कुठे बैठका झाल्या हे ही मला माहीत आहे. काय निघालं त्यात.सुतावरुन स्वर्ग गाठण्याचा प्रयत्न तुम्ही केला. मी हात दाखवायला कशाला जाईल. ज्याला हात दाखवायचा त्याला दाखवला आहे. हे सरकार आपली कालावधी पूर्ण करेल. आम्ही आणि भाजप एकत्र निवडणूक लढवू, असंही मुख्यमंत्री म्हणाले. मुख्यमंत्री म्हणाले की, जिल्हा पातळीवर आम्ही मुख्यमंत्री कार्यालय सुरु करत आहोत. शक्ती कायदा हा केंद्राकडे पाठवला आहे. त्यावर लवकर निर्णय होईल, असंही त्यांनी सांगितलं. 

ही बातमी देखील वाचा

'अडीच वर्ष बाहेर न पडणारा मुख्यमंत्री दाखवा अन् बक्षीस मिळवा; ठाकरेंवर मुख्यमंत्र्यांची टोलेबाजी, अधिवेशनाच्या शेवटच्या दिवशी मुख्यमंत्र्यांची फुल्ल बॅटिंग

महत्त्वाच्या बातम्या

ऑपरेशन टायगर फेल, आमचे सर्वच्या सर्व 9 खासदार आमच्यासोबत; ओमराजे निंबाळकरांबद्दही बोलले अरविंद सावंत
ऑपरेशन टायगर फेल, आमचे सर्वच्या सर्व 9 खासदार आमच्यासोबत; ओमराजे निंबाळकरांबद्दही बोलले अरविंद सावंत
Weather Update: जूनच्या तिसऱ्या आठवड्यातही मान्सूनने देशाचा बराचसा भाग व्यापलाच नाही; 723 जिल्ह्यांपैकी केवळ 103 जिल्ह्यांमध्ये सामान्य पाऊस, गेल्या सात दिवसांपासून तेलंगणात अडकला
जूनच्या तिसऱ्या आठवड्यातही मान्सूनने देशाचा बराचसा भाग व्यापलाच नाही; 723 जिल्ह्यांपैकी केवळ 103 जिल्ह्यांमध्ये सामान्य पाऊस, गेल्या सात दिवसांपासून तेलंगणात अडकला
प्रतिभा धानोरकरांचा विजय वडेट्टीवारांना 'दे धक्का'; चंद्रपूर काँग्रेसमध्ये राजकीय उलथापालथ
प्रतिभा धानोरकरांचा विजय वडेट्टीवारांना 'दे धक्का'; चंद्रपूर काँग्रेसमध्ये राजकीय उलथापालथ
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 17 जून 2026 | बुधवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 17 जून 2026 | बुधवार

व्हिडीओ

Arvind Sawant on Operation Tiger : ऑपरेशन टायगर फेल, सगळे खासदार ठाकरेंसोबत, सावंतांचा दावा
Sushma Andhare On Operation Tiger : ओमराजेंबद्दल गौप्यस्फोट, सुषमा अंधारेंची खळबळजनक पत्रकार परिषद
Ambadas Danve On Operation Tiger : दम असेल तर निवडून आणा, दुसऱ्यांची पोरं का लागतात
Nitin Deshmukh On Operation Tiger : फुटणाऱ्यांना लाज वाटू दे, मशालीवर निवडून आलात
Operation Tiger : ऑपरेशन टायगर - दिल्लीत हालचालींना वेग, एकनाथ शिंदे आणि UBT खासदार दिल्लीत

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
उद्धवजी, आदित्य आणि वहिनी हे तिघेच पक्षात राहणार, रामदास कदमांचा टोला, देखो आगे क्या होता है म्हणत दिला इशारा
उद्धवजी, आदित्य आणि वहिनी हे तिघेच पक्षात राहणार, रामदास कदमांचा टोला, देखो आगे क्या होता है म्हणत दिला इशारा
Shivsena : ऑपरेशन टायगर फुलप्रूफ, तांत्रिक बाबींमुळे पुरावे दिले नाहीत, ठाकरेंचे डावपेच बघूनच पुढचे पाऊल; शिंदेंच्या शिवसेनेचा दावा, सूत्रांची माहिती
ऑपरेशन टायगर फुलप्रूफ, तांत्रिक बाबींमुळे पुरावे दिले नाहीत, ठाकरेंचे डावपेच बघूनच पुढचे पाऊल; शिंदेंच्या शिवसेनेचा दावा, सूत्रांची माहिती
Prince Yadav: प्रिन्स यादव पदार्पणाच्या सामन्यातच दुर्दैवी ठरला, नको तेच घडलं; अशी चूक आयुष्यभर कधीच विसरणार नाही!
प्रिन्स यादव पदार्पणाच्या सामन्यातच दुर्दैवी ठरला, नको तेच घडलं; अशी चूक आयुष्यभर कधीच विसरणार नाही!
Weather Update: जूनच्या तिसऱ्या आठवड्यातही मान्सूनने देशाचा बराचसा भाग व्यापलाच नाही; 723 जिल्ह्यांपैकी केवळ 103 जिल्ह्यांमध्ये सामान्य पाऊस, गेल्या सात दिवसांपासून तेलंगणात अडकला
जूनच्या तिसऱ्या आठवड्यातही मान्सूनने देशाचा बराचसा भाग व्यापलाच नाही; 723 जिल्ह्यांपैकी केवळ 103 जिल्ह्यांमध्ये सामान्य पाऊस, गेल्या सात दिवसांपासून तेलंगणात अडकला
ऑपरेशन टायगर फेल, आमचे सर्वच्या सर्व 9 खासदार आमच्यासोबत; ओमराजे निंबाळकरांबद्दही बोलले अरविंद सावंत
ऑपरेशन टायगर फेल, आमचे सर्वच्या सर्व 9 खासदार आमच्यासोबत; ओमराजे निंबाळकरांबद्दही बोलले अरविंद सावंत
प्रतिभा धानोरकरांचा विजय वडेट्टीवारांना 'दे धक्का'; चंद्रपूर काँग्रेसमध्ये राजकीय उलथापालथ
प्रतिभा धानोरकरांचा विजय वडेट्टीवारांना 'दे धक्का'; चंद्रपूर काँग्रेसमध्ये राजकीय उलथापालथ
Meloni Viral Video: मेलोनी म्हणाल्या, 'मी गेल्या एक महिन्यापासून सिगरेट ओढत नाही, त्यामुळे आता झोप घालवण्यासाठी...' जी-7 मध्ये अनौपचारिक संभाषण मायक्रोफोनवर रेकॉर्ड!
मेलोनी म्हणाल्या, 'मी गेल्या एक महिन्यापासून सिगरेट ओढत नाही, त्यामुळे आता झोप घालवण्यासाठी...' जी-7 मध्ये अनौपचारिक संभाषण मायक्रोफोनवर रेकॉर्ड!
Iran War LIve Update: 'तर आम्ही त्यांच्यावर पुन्हा बॉम्बहल्ला करू..' इराण अमेरिका शांतता करारावर डोनाल्ड ट्रम्पचा पुन्हा सनसनाटी दावा
'तर आम्ही त्यांच्यावर पुन्हा बॉम्बहल्ला करू..' इराण अमेरिका शांतता करारावर डोनाल्ड ट्रम्पचा पुन्हा सनसनाटी दावा
Embed widget