एक्स्प्लोर
Advertisement
मुख्याध्यापकांनी शाळेच्या हिशोबातील पैसे न दिल्याने क्लार्कची आत्महत्या
माणगाव (रायगड) : रायगड जिल्ह्यातील लोणेरे येथील शाळेतील क्लार्कने शाळेच्या कार्यालयातच आत्महत्या केल्याची दुर्दैवी घटना आहे. शाळेच्या मुख्याध्यापकांनी शाळेच्या हिशोबातील पैसे न दिल्याने आत्महत्या केल्याचा आरोप घटनास्थळावर सापडलेल्या सुसाईड नोटमध्ये म्हटले आहे.
माणगाव तालुक्यातील रापोली येथे राहणारे 34 वर्षीय मंगेश घाडगे हे लोणेरे येथील एस एस निकम विद्यालयात क्लार्कचे काम करीत होते. मंगेश घाडगे हे त्यांची पत्नी, 4 वर्षीय मुलगी आणि आई- वडिलांसोबत राहत होते. गेल्या 7 ते 8 वर्षांपासून तो लोणेरेच्या या शाळेत कार्यरत होते. दरम्यान , बुधवारी तो कामानिमित्त रोहा येथे जात असल्याचे सांगून घराबाहेर पडले आणि सायंकाळी उशिरापर्यंत ते घरी न परतल्याने शोधाशोध सुरु झाली.
यावेळेस शोधाशोध करताना मंगेश शाळेतील कार्यालयात असल्याची माहिती मिळाली आणि शहानिशा करता कार्यालयाचा दरवाजा हा आतून बंद असल्याचे आढळून आले. यामुळे तातडीने दरवाजा तोडण्यात आला आणि टेबलवर निपचित पडलेल्या मंगेश याने विषारी द्रव्य प्यायल्याचे दिसून आल्याने त्याला तातडीने रुग्णालयात नेण्यात आले. परंतु या दरम्यान त्याचा मृत्यू झाला, तर शाळेतील मंगेश यांच्या टेबलवर एक 'सुसाईड नोट' आढळून आली असून त्यामध्ये शाळेच्या मुख्याध्यापकांनी शाळेच्या हिशोबातील पैसे न दिल्याने आत्महत्या करीत असल्याचे नमूद करण्यात आले आहे.
यासंदर्भात गोरेगाव पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदवण्यात आला असून तपास सुरु करण्यात आला आहे. तर यादरम्यान पोलिसांनी घटनास्थळी सापडलेली सुसाईड नोट आणि इतर साहित्य ताब्यात घेतले आहे. तर मुख्याध्यापक यांच्या त्रासाला कंटाळून आत्महत्येस प्रवृत्त करणाऱ्या मंगेश याला न्याय मिळावा अशी मागणी त्याच्या नातेवाईकांनी केली आहे.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
क्रिकेट
भविष्य
क्रिकेट
सोलापूर
Advertisement