एक्स्प्लोर

चिंचपोकळीचा चिंतामणी यावर्षी मुर्ती घडवणार नाही, पारंपरिक चांदीच्या गणेशमूर्तीची होणार प्राणप्रतिष्ठापना

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर लालबागपाठोपाठ आता गिरणगावातला चिंचपोकळीचा चिंतामणी मूर्ती घडवणार नसून पारंपारिक चांदीच्या गणेशमूर्तीची प्राणप्रतिष्ठापणा करणार असल्याचा निर्णय मंडळाने घेतला आहे.

मुंबई : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी यंदाच्या वर्षीचा गणेशोत्सव साधेपणाने साजरा करण्याचे आवाहन सर्व सार्वजनीक गणेशोत्सव मंडळांना दिल्यानंतर प्रत्येकाने त्याला सकारात्मक प्रतिसाद देत निर्णय घेतले आहेत. यामध्ये गिरणगावातला चिंचपोकळीचा चिंतामणी मूर्ती घडवणार नसून पारंपारिक चांदीच्या गणेशमूर्तीची प्राणप्रतिष्ठापणा करणार असल्याचा निर्णय मंडळाने घेतला आहे. कोरोना विषाणू प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर मंडळाने प्रसिद्ध असलेला चिंतामणीचा आगमन सोहळा,पाटपूजन, सांस्कृतिक कार्यक्रम रद्द केल्याचे आधीच जाहीर केलेले आहे. मूर्तीच्या उंचीबाबत शासन निर्णयाच्या अधीन राहून निर्णय घेण्याचे मंडळाने आधीच जाहीर केलेले होते.

चिंचपोकळी सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाने गतवर्षी शतक महोत्सव जल्लोषात, आनंदात व भक्तिभावाने साजरा केला. यंदाचे मंडळाचे 101 वे वर्ष असून मंडळाने गत 100 वर्षात सामाजिक बांधिलकी जपून सामाजिक उपक्रम राबवून समाजसेवेच काम करत सामाजिक बांधिलकी जपली आहे. शिवाय, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मूर्तीची उंचीबाबत बोलताना मूर्तीची उंची नव्हे, भक्ती महत्वाची असे आवाहन केले. याला सकारात्मक प्रतिसाद देताना, सद्य परिस्थितीत धार्मिक बाब, चिंतामणी भक्त, शासन यंत्रणा, पोलीस यंत्रणा, जनतेचं आरोग्य या सर्व गोष्टींचा सर्वंकष विचार करून मंडळाच्या आदर्शवादी भूमिकेची जाण ठेवून मंडळाने यावर्षी गणेशोत्सवाची धार्मिक परंपरा खंडित होऊ न देता मंडळात पुजल्या जाणार्‍या पारंपरिक चांदीच्या गणेशमूर्तीची विधिवत प्राणप्रतिष्ठापना करण्यात येणार आहे, अशी माहिती मंडळाचे अध्यक्ष उमेश नाईक यांनी दिली आहे.

त्याचबरोबर मंडळाने हे वर्ष जनआरोग्य वर्ष म्हणून जाहीर करतांना गणेशोत्सव काळात रक्तदान शिबीर,आरोग्य चिकित्सा, रुग्णसाहित्य केंद, शासकीय रुग्णालयास वैद्यकीय उपकरण आणि 101 कोविड योद्धयांचा सन्मान आदी विविध आरोग्यविषयक उपकरण राबविण्यात येणार असल्याची माहिती मंडळाचे सचिव वासुदेव सावंत यांनी दिली आहे. मंडळ या वर्षी मंडपासमोर कृत्रिम तलाव बांधून तेथे विभागातील घरगुती गणेश मूर्तीना विसर्जनासाठी उपलब्ध करून देणार आहे. जनसेवा हीच ईश्वरसेवा या वाक्यानुसार मंडळ यावर्षी उत्सव साधेपणाने साजरा करून जनतेचे आरोग्य जपण्याचे आवाहन मंडळाने केले आहे.

संबंधित बातम्या :

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Sharad Pawar :  निवडणूक साधी समजू नका, राज्याचं हित न पाहणाऱ्यांच्या हातून सत्ता काढून घ्यावी लागेल, मविआच्या उमेदवारांना विजयी करा : शरद पवार
शेतकऱ्यांना कर्जमाफी, महिलांना महालक्ष्मी योजनेचे 3 हजार अन् मोफत एसटी प्रवास, शरद पवारांनी मुक्ताईनगरमध्ये मविआचा जाहीरनामा मांडला
एकनाथ शिंदे उद्या ठाकरे आडनाव लावून फिरतील; देवाच्या आळंदीतून आदित्य ठाकरेंचा घणाघात
एकनाथ शिंदे उद्या ठाकरे आडनाव लावून फिरतील; देवाच्या आळंदीतून आदित्य ठाकरेंचा घणाघात
विधानसभेची खडाजंगी: राखीव केज मतदारसंघात मुंदडांना पुन्हा संधी मिळणार की राष्ट्रवादीची तुतारी वाजणार? यंदा कोणाची बाजी
विधानसभेची खडाजंगी: राखीव केज मतदारसंघात मुंदडांना पुन्हा संधी मिळणार की राष्ट्रवादीची तुतारी वाजणार? यंदा कोणाची बाजी
नोकऱ्या अन् पगारवाढ देणारं देशातील 1 नंबरचं शहर बंगळुरू; मुंबई कितव्या स्थानी, सरकारी वेतन किती?
नोकऱ्या अन् पगारवाढ देणारं देशातील 1 नंबरचं शहर बंगळुरू; मुंबई कितव्या स्थानी, सरकारी वेतन किती?
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Nitin Gadkari Zero Hour : शरद पवार रिंगमास्टर, मविआ सर्कस; नितीन गडकरींची स्फोटक मुलाखत ABP MAJHARaj Thackeray Full Dindoshi | 'बाण' ते 'खान' दिंडोशींच्या सभेत राज ठाकरे उद्धव ठाकरेंवर कडाडले!ABP Majha Marathi News Headlines 8PM TOP Headlines 8 PM 11 November 2024Kishori Pednekar on Amit Thackeray | अमित ठाकरे हे आक्रमक नाही तर उद्धट, पेडणेकरांची टीका

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Sharad Pawar :  निवडणूक साधी समजू नका, राज्याचं हित न पाहणाऱ्यांच्या हातून सत्ता काढून घ्यावी लागेल, मविआच्या उमेदवारांना विजयी करा : शरद पवार
शेतकऱ्यांना कर्जमाफी, महिलांना महालक्ष्मी योजनेचे 3 हजार अन् मोफत एसटी प्रवास, शरद पवारांनी मुक्ताईनगरमध्ये मविआचा जाहीरनामा मांडला
एकनाथ शिंदे उद्या ठाकरे आडनाव लावून फिरतील; देवाच्या आळंदीतून आदित्य ठाकरेंचा घणाघात
एकनाथ शिंदे उद्या ठाकरे आडनाव लावून फिरतील; देवाच्या आळंदीतून आदित्य ठाकरेंचा घणाघात
विधानसभेची खडाजंगी: राखीव केज मतदारसंघात मुंदडांना पुन्हा संधी मिळणार की राष्ट्रवादीची तुतारी वाजणार? यंदा कोणाची बाजी
विधानसभेची खडाजंगी: राखीव केज मतदारसंघात मुंदडांना पुन्हा संधी मिळणार की राष्ट्रवादीची तुतारी वाजणार? यंदा कोणाची बाजी
नोकऱ्या अन् पगारवाढ देणारं देशातील 1 नंबरचं शहर बंगळुरू; मुंबई कितव्या स्थानी, सरकारी वेतन किती?
नोकऱ्या अन् पगारवाढ देणारं देशातील 1 नंबरचं शहर बंगळुरू; मुंबई कितव्या स्थानी, सरकारी वेतन किती?
चिंचवड मतदारसंघात मोठा ट्विस्ट; शिवसेना ठाकरेंचा नेता करतोय भाजपचा प्रचार,सांगितलं राज'कारण'
चिंचवड मतदारसंघात मोठा ट्विस्ट; शिवसेना ठाकरेंचा नेता करतोय भाजपचा प्रचार,सांगितलं राज'कारण'
Kolhapur News : कोल्हापूर दक्षिण, चंदगड, करवीर, हातकणंगले, अन् राधानगरीत दारुचा अक्षरश: महापूर! 10 मतदारसंघात आत्तापर्यंत 10 कोटी 71 लाखांचा अवैद्य मुद्देमाल जप्त
कोल्हापूर दक्षिण, चंदगड, करवीर, हातकणंगले, अन् राधानगरीत दारुचा अक्षरश: महापूर! 10 मतदारसंघात आत्तापर्यंत 10 कोटी 71 लाखांचा अवैद्य मुद्देमाल जप्त
मुंबईत 1 किलो 950 ग्रॅम सोन्याच्या बांगड्या जप्त; निवडणूक काळातच भरारी पथकाची मोठी कारवाई
मुंबईत 1 किलो 950 ग्रॅम सोन्याच्या बांगड्या जप्त; निवडणूक काळातच भरारी पथकाची मोठी कारवाई
Uddhav Thackeray Full Speech Vani : यवतमाळला बॅगा तपासल्यानंतर उद्धव ठाकरेंचं स्फोटक भाषण
Uddhav Thackeray Full Speech Vani : यवतमाळला बॅगा तपासल्यानंतर उद्धव ठाकरेंचं स्फोटक भाषण
Embed widget