Chitra wagh On Mahavikas Aghadi : "करेक्ट कार्यक्रम..." अकेला देवेंद्र क्या करेगा म्हणणाऱ्यांना चित्रा वाघांचं दणदणीत उत्तर….
'अकेला देवेंद्र क्या करेगा' असं म्हणणाऱ्यांना विजयानंतर 'करेक्ट कार्यक्रम' म्हणत त्यांनी उत्तर दिलं आहे. हा भाजपचा शानदार विजय आहे, असंही त्या म्हणाल्या.
Chitra wagh On Mahavikas Aghadi : राज्यसभेच्या निवडणुकीत भाजपचा दणदणीत विजय झाला आहे. भाजपचे तिनही उमेदवार विजयी झाल्यानंतर भाजप नेत्या चित्रा वाघ यांनी महाविकास आघाडीच्या नेत्यांवर सडकून टीका केली आहे. 'अकेला देवेंद्र क्या करेगा' असं वक्तव्य महाविकास आघाडीच्या नेत्यांनी निवडणुकीपुर्वी केली होती. यावर आता चित्रा वाघांनी सडेतोड उत्तर दिलं आहे.
'अकेला देवेंद्र क्या करेगा' असं म्हणणाऱ्यांना विजयानंतर करेक्ट कार्यक्रम म्हणत त्यांनी उत्तर दिलं आहे. हा भाजपचा शानदार विजय आहे, असंही त्या म्हणाल्या. पुण्याच्या पत्रकार परिषदेत त्या बोलत होत्या. भाजपचे तिनही उमेदवार विजयी झाले. अनिल बोंडे, धनंजय महाडिक आणि पीयुष गोयल हा देवेंद्र फडणवीस यांना चमत्कार आहे. त्यांच्याशिवाय हे शक्य नव्हतं, असंही त्या म्हणाल्या.
आघाडी सरकारसोबत असलेल्या आमदारापैकी काही आमदार फोडण्यात भाजपला यश आलं. भाजपच्या 106 मतांशिवाय अधिक 17 मतं मिळवणं कठिण होतं. त्यात भाजपला यश आलं, असं मत त्यांनी व्यक्त केलं आहे.
चित्रा वाघ यांनी ट्विटरवर देखील प्रतिक्रिया शेअर केली आहे. त्यात देवेंद्र फडणवीसांचा फोटो लावण्यात आला आहे. 'कोई काफी अकेला है, और अकेला ही काफी है'...जंग मे जीत के आने के लिए काफी है, वह जमाने के लिए अकेला ही काफी है, हमारी हकीकत को ख्वाब समझने वाले, वो हमारी निंद उडाने के लिए एक ही काफी है... असं त्यांनी शेअर केलेल्या पोस्टरवर लिहिलं आहे.
करेक्ट कार्यक्रम….अकेला देवेंद्र क्या करेगा म्हणणार्यांना दणदणीत उत्तर….💪💪👍👍@Dev_Fadnavis #DevendraFadnavis #bjp pic.twitter.com/TLyDJtZ8Lk
— Chitra Kishor Wagh (@ChitraKWagh) June 11, 2022">
'अकेला देवेंद्र क्या करेगा' त्यांनीच करुन दाखवलं
राज्यसभेच्या निकालानंतर सर्वत्र देवेंद्र फडणवीसांचं कौतुक होतंय. निवडणूक केवळ लढविण्यासाठी नाही,
तर जिंकण्यासाठी लढविली होती, अशा शब्दांत त्यांनी ट्विट करत आनंद व्यक्त केला आहे.
याबरोबरच राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवारांनी देखील फडणवीसांचं कौतुक केलं आहे. आमदार फोडण्यात फडणवीसांना यश आलं अशी प्रतिक्रिया शरद पवारांनी व्यक्त केली आहे. हाय होल्टेज ड्रामानंतर भाजपला मिळालेल्या या विजयाचा नेते आणि कार्यकर्त्यांकडून राज्यभरात जल्लोष साजरा केला जात आहे.