एक्स्प्लोर

मोठी बातमी! राज्यात 'मुख्यमंत्री तीर्थदर्शन योजना' सुरु, मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा मोठा निर्णय

राज्यात 'मुख्यमंत्री तीर्थदर्शन योजना' सुरु करु अशी माहिती मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली. याबाबतची मागणी आमदार प्रताप सरनाईक (MLA Pratap Sarnaik) यांनी केली आहे.

Maharashtra Monsoon Session : राज्यात 'मुख्यमंत्री तीर्थदर्शन योजना'  (Chief Minister Pilgrimage Scheme) सुरु करणार असल्याचे वक्तव्य राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली. विधानसभेत बोलत असताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ही घोषणा केली. याबाबतची मागणी शिवसेना शिंदे गटाचे आमदार प्रताप सरनाईक (MLA Pratap Sarnaik) यांनी केली होती. प्रताप सरनाईक यांनी लक्षवेधीद्वारे तिर्थदर्शन लक्षवेधी केली होती. यावर बोलताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे  (CM Eknath Shinde) म्हणाले की, महाराष्ट्र संताची भुमी आहे. पांडुरंगाची वारी सुरु आहे. आपण पहिल्यांदाच 20 हजार रुपये दिंडीला अनुदान देण्याचा निर्णय घेतल्याचे मुख्यमंत्री म्हणाले. 

मुख्यमंत्री तीर्थदर्शन योजनेबाबत नियम ठरवू

मुख्यमंत्री तीर्थदर्शन योजना याबाबात नियम ठरवू असे मुख्यमंत्री म्हणाले. दरवर्षी नियमावली करुन आपण किती लोकांना पाठवू शकतो हे ठरवू. बाय रोटेशनप्रमाणे 
ही योजना सुलभपणे राबवू असे मुख्यमंत्री म्हणाले. काही जणांची इच्छा असते पण ते लोक जाऊ शकत नाहीत. अशा ज्येष्ठांना नागरिकांनासाठी ही योजना लागू करु असे मुख्यमंत्री म्हणाले. या योजनेचा आशिर्वाद सरकारला मिळेल. आम्ही नवीन नवीन निर्णय घेऊ, असे मुख्यमंत्री म्हणाले. लाडकी बहिण योजना आपण सुरु केली आहे. तर काही लोक म्हणाले की आरे लाडका भाऊ कुठे गेला. तर आम्ही लाडक्या भावाचा देखील निर्णय घेतल्याचे एकनाथ शिंदे म्हणाले. 

शासनच्या माध्यमातून 5 हजार 10 हजार लोकांना तीर्थ दर्शन यात्रा घडवली जाईल

दरम्यान, प्रताप सरनाईक यांनी लक्षवेधी मांडली होती की जे जेष्ठ नागरिक तीर्थ क्षेत्रांना जाऊ इच्छितात, दर्शन घेऊ इच्छितात त्यांना तीर्थ यात्रा परवडणारी नाही. त्यांना याचा लाभ घेता यावा यासाठी मुख्यमंत्री देवदर्शन तीर्थ दर्शन योजना सुरु करावी अशी मागणी केली होती. त्याप्रमाण राज्यात मुख्यमंत्री देवदर्शन तीर्थ दर्शन योजना आम्ही आज सुरु करत असल्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितलं. यासाठी धोरण ठरवलं जाईल, शासनच्या माध्यमातून 5 हजार 10 हजार लोकांना तीर्थ दर्शन यात्रा घडवली जाईल असे मुख्यमंत्री म्हणाले. सर्व धर्मीय हिंदू, ईसाई, शीख, बौद्ध, जैन, ख्रिश्चन यांच्या धार्मिक स्थळांचा यामध्ये समावेश असेल. तर
हज यात्रा तर आधीपासून असल्याचे मुख्यमंत्री म्हणाले.  

दरम्यान, शरद पवार हे जेष्ठ नेते आहेत. पब आणि ड्रग्सला ते कधीच पाठींबा देणार नाहीत. पुणे नाही तर संपूर्ण राज्यभरात ड्रग्ज विकणाऱ्यांवर सरकार कठोर कारवाई करणार असल्याचे मुख्यमंत्री म्हणाले.

महत्वाच्या बातम्या:

प्रत्येक दिंडीला 20 हजार रुपये देण्याचा निर्णय सरकारनं मागे घ्यावा, विश्व वारकरी सेनेची मागणी

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

लोकसभेत हातावर लिहिले 3 'वाजे'ला मतदान करा, माझ्या पाठीत खंजीर खुपसला, हेमंत गोडसेंचा भुजबळांवर गंभीर आरोप
लोकसभेत हातावर लिहिले 3 'वाजे'ला मतदान करा, माझ्या पाठीत खंजीर खुपसला, हेमंत गोडसेंचा भुजबळांवर गंभीर आरोप
Numerology : अतिशय घाबरट असतात 'या' जन्मतारखेचे लोक; मनतील भावनाही धड करत नाहीत व्यक्त, लोक काय बोलतील याचा करतात अति विचार
अतिशय घाबरट असतात 'या' जन्मतारखेचे लोक; लोक काय बोलतील याचा करतात अति विचार, मनतील भावना व्यक्त करायलाही घाबरतात
नालासोपाऱ्यात हिंदी भाषिक टीसीची दादागिरी, दाम्पत्याकडून लिहून घेतलं
नालासोपाऱ्यात हिंदी भाषिक टीसीची दादागिरी, दाम्पत्याकडून लिहून घेतलं "मराठी बोलणार नाही"
मोठी बातमी! उत्तर प्रदेशच्या मदरसा कायद्याला सर्वोच्च न्यालयाची मान्यता, मदरशांना मोठा दिलासा 
मोठी बातमी! उत्तर प्रदेशच्या मदरसा कायद्याला सर्वोच्च न्यालयाची मान्यता, मदरशांना मोठा दिलासा 
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

नालासोपाऱ्यात दादागिरी करणाऱ्या टीसीचं निलंबन, 'माझा'च्या बातमीचा इम्पॅक्टABP Majha Marathi News Headlines 1PM TOP Headlines 1 PM 05 November 2024Uddhav Thackeray Kolhapur : उद्धव ठाकरे कोल्हापुरात अंबाबाईच्या दर्शनालाSharad pawar On Yugendra Pawar : ..म्हणून मी युगेंद्र पवारांची निवड केली, शरद पवारांनी कारण सांगितलं

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
लोकसभेत हातावर लिहिले 3 'वाजे'ला मतदान करा, माझ्या पाठीत खंजीर खुपसला, हेमंत गोडसेंचा भुजबळांवर गंभीर आरोप
लोकसभेत हातावर लिहिले 3 'वाजे'ला मतदान करा, माझ्या पाठीत खंजीर खुपसला, हेमंत गोडसेंचा भुजबळांवर गंभीर आरोप
Numerology : अतिशय घाबरट असतात 'या' जन्मतारखेचे लोक; मनतील भावनाही धड करत नाहीत व्यक्त, लोक काय बोलतील याचा करतात अति विचार
अतिशय घाबरट असतात 'या' जन्मतारखेचे लोक; लोक काय बोलतील याचा करतात अति विचार, मनतील भावना व्यक्त करायलाही घाबरतात
नालासोपाऱ्यात हिंदी भाषिक टीसीची दादागिरी, दाम्पत्याकडून लिहून घेतलं
नालासोपाऱ्यात हिंदी भाषिक टीसीची दादागिरी, दाम्पत्याकडून लिहून घेतलं "मराठी बोलणार नाही"
मोठी बातमी! उत्तर प्रदेशच्या मदरसा कायद्याला सर्वोच्च न्यालयाची मान्यता, मदरशांना मोठा दिलासा 
मोठी बातमी! उत्तर प्रदेशच्या मदरसा कायद्याला सर्वोच्च न्यालयाची मान्यता, मदरशांना मोठा दिलासा 
Uddhav Thackeray Kolhapur : उद्धव ठाकरे कोल्हापुरात अंबाबाईच्या दर्शनाला
Uddhav Thackeray Kolhapur : उद्धव ठाकरे कोल्हापुरात अंबाबाईच्या दर्शनाला
कॉमेडी किंग अजितदादांचा प्रचार करणार, सयाजी शिंदेंनंतर भाऊ कदमांची राष्ट्रवादीच्या घड्याळाला साथ
कॉमेडी किंग अजितदादांचा प्रचार करणार, सयाजी शिंदेंनंतर भाऊ कदमांची राष्ट्रवादीच्या घड्याळाला साथ
Sharad Pawar: संसदीय राजकारणातून निवृत्ती घेण्याचे शरद पवारांचे संकेत; बारामतीत बोलताना केलं मोठं वक्तव्य, नेमकं काय म्हणालेत?
संसदीय राजकारणातून निवृत्ती घेण्याचे शरद पवारांचे संकेत; बारामतीत बोलताना केलं मोठं वक्तव्य, नेमकं काय म्हणालेत?
Balasaheb Thorat : 'आम्ही इकडे आलो म्हणून चांगले वागतात, नाहीतर तुमचा कार्यक्रमच होता'; बाळासाहेब थोरातांचा विखे पिता-पुत्रांवर जोरदार हल्लाबोल
'आम्ही इकडे आलो म्हणून चांगले वागतात, नाहीतर तुमचा कार्यक्रमच होता'; बाळासाहेब थोरातांचा विखे पिता-पुत्रांवर जोरदार हल्लाबोल
Embed widget