CM Eknath Shinde : मुख्यमंत्री म्हणजे शेतात राबणारा एक 'रांगडा' गडी! एकनाथ शिंदेंचे गावातील पैलू
एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी नुकतीच महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली आहे. त्यानंतर त्यांचे विविध पैलू समोर येत आहे.
CM Eknath Shinde Exclusive : महाराष्ट्रात घडलेल्या नाट्यमय राजकीय घडामोडीनंतर अखेर एकनाथ शिंदे (Eknath Shinde) हे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री झाले आहेत. गुरुवारी (30 जूनला) त्यांनी मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. तर देवेंद्र फडणवीस यांनी उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली. मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतल्यानंतर एकनाथ शिंदे यांचे मूळ गावातील अनेक पैलू सध्या बाहेर येत आहेत. शिंदे ज्यावेळी आपल्या सातारा जिल्ह्यातील दरे या गावी येतात तेव्हा ते स्वस्थ बसत नाहीत. ते गावी आल्यानंतर आपल्या शेतात राबताना दिसतात. त्यांचा शेतीतला रांगडा गडी बाहेर येतो.
शेतात राबणारा मंत्री
एकनाथ शिंदे यांनी नुकतीच महाराष्ट्राचे मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली. त्यानंतर त्यांचे विविध पैलू समोर आले आहेत. त्यांच्यात असणारा शेतकऱ्याचा पैलू आपल्याला पाहायला मिळत आहे. एकनाथ शिंदे ज्यावेळी साताऱ्यातील आपल्या मुळ दरे या गावी येतात, त्यावेळी शेतात काम करताना दिसतात. ते स्वस्थ बसत नाहीत. सकाळी लवकर उठने आणि आपल्या शेतात सुरु असलेल्या कामात हातभार लावणं हे त्यांचे कायमचेच गणित. ते सत्तेत नसतानाही आणि असतानाही. नगरविकास मंत्री असतानाही एकनाथ शिंदे हे गावी आल्यानंतर शेतातील कामात मग्न असायचे. कधी स्वत: शेतात भांगलनी करायचे तर कधी कुळपनी करत होते. तर कधी भात पेरणीत हिरारीने भाग घ्यायचे. इतकच काय जंगल भागाशी निगडीत असलेले जंगली पशू पक्षी आल्यानंतरही ते त्यांना खाऊ घालायचे.
अनेकवेळा त्यांनी आपल्या क्रिकेटचा शौकही पुर्ण केला आहे. हातात बॅट आल्यावरही ते कायम षटकार चौकार मारुन गावाकडच्या कार्यकर्त्यांची दमछाक करायचे. याचा प्रत्येय त्यांनी राजकिय पटलावरही दाखवून दिला आहे.
शिवसेनाप्रुमख उध्दव ठाकरे यांच्यासह राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस यांची दमछाक करुन एकनाथ शिंदे हे स्वत: मुख्यमंत्री पदावर विराजमान झाले आहेत. त्यामुळं शेतीशी सल्लग्न असलेल्या एकनाथ शिंदे यांच्या या शेतीच्या आभ्यासावरुन ते शेतकऱ्यांच्या हिताचे चांगले निर्णय घेतील असं अपेक्षा अनेकांना वाटत आहे. सध्या त्यांचे सोशल मीडियावर शेतात काम करत असतानाचे फोटे व्हायरल होत आहेत. त्यांचे एक वेगळं शेतातील रुप जनतेला पाहायला मिळत आहे.
महत्वाच्या बातम्या: