Chhatrapati Shivaji Maharaj Sword And Tiger Claws : शिवरायांची जगदंबा तलवार, वाघ नखे यावर्षीच महाराष्ट्रात येणार, पुढील काळात राजकारण होणार?
Chhatrapati Shivaji Maharaj Sword And Tiger Claws : छत्रपती शिवाजी महाराजांची लंडनमध्ये असलेली 'जगदंबा तलवार', वाघ नखे या वर्षीच महाराष्ट्रात येणार आहे. मंत्री सुधीर मुनगंटीवार आणि काही अधिकारी जून महिन्यात लंडनला जाणार आहेत.
Chhatrapati Shivaji Maharaj Sword And Tiger Claws : छत्रपती शिवाजी महाराज (Chhatrapati Shivaji Maharaj) यांची लंडनमध्ये (London) असलेली जगदंबा तलवार (Jagdamba Sword), वाघ नखे (Tiger Claws) आपल्या मायभूमीत परत यावीत याची सर्वजण आतुरतेने वाट पाहत आहेत. हीच जगदंबा तलवार, वाघ नखे पुन्हा महाराष्ट्रात (Maharashtra) आणण्यासाठी राज्य सरकारने ठोस पावलं उचलली आहेत. 350 वा शिवराज्याभिषेक सोहळा (Shivrajyabhishek Ceremony) आणि आगामी सर्वच निवडणुका पाहता यावर्षीच तलवार आणि वाघ नखे देशात राज्य सरकार आणणार आहे.
छत्रपती शिवाजी महाराजांची लंडनमध्ये असलेली 'जगदंबा तलवार', वाघ नखे या वर्षीच महाराष्ट्रात येणार आहे. सांस्कृतिक मंत्री सुधीर मुनगंटीवार (Sudhir Mungantiwar) आणि काही अधिकारी जून महिन्यात लंडनला जाणार आहेत. शिवराज्याभिषेकाला 2024 मध्ये साडेतीनशे वर्ष पूर्ण होत आहेत. त्यादृष्टीने राज्य सरकार एक आराखडा तयार करण्यात आला आहे. ब्रिटन सरकारजवळ या संदर्भात अंतिम टप्प्यात बोलणे सुरु आहे
ब्रिटन सरकार आणि राज्य सरकारमध्ये तलवार आणि वाघ नखे आणण्यासंदर्भात काय चर्चा सुरु आहे?
- महाराजांची जगदंबा तलवार आणि वाघ नखे काही काळासाठी भारतात पाठवण्यासंदर्भात चर्चा सुरु आहे
- यामध्ये वर्षभर वाघ नखे आणि तलवार देशात असतील
- राज्यातील सांस्कृतिक मंत्री सुधीर मुनगंटीवार आणि अधिकारी जून महिन्यात या संदर्भात चर्चा करण्यासाठी लंडनमध्ये जाणार आहेत
- तसेच सांस्कृतिक आदान प्रदानासाठी महाराष्ट्रातील कलाकार ब्रिटनमध्ये सादरीकरण करतील आणि ब्रिटनचे कलाकार महाराष्ट्रात येऊन आपल्या संस्कृतीचे दर्शन घडवतील.
- त्याचबरोबर महाराष्ट्राचे 25 विद्यार्थी ब्रिटनमध्ये अभ्यासासाठी जातील आणि ब्रिटनचे 25 विद्यार्थी महाराष्ट्रात येतील. या सांस्कृतिक आदानप्रदानासंदर्भात महाराष्ट्र शासन आणि ब्रिटीश सरकारमधे लवकरच सामंजस्य करार होणार आहे
निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिवरायांची तलवार राज्यात येणं महत्त्वाचं
राज्यात 2024 देशातील लोकसभा आणि अनेक राज्यातील निवडणुका देखील आहेत. या पार्श्वभूमीवर महाराजांची ही तलवार देशात राज्यात येणं ही फार महत्त्वाची बाब आहे. गेले काँग्रेस सरकार इतक्या वर्षात हे करु शकले नाही ते भाजप सरकार आणेल आणि याचे क्रेडिट हे सरकार घेईल.
पुढील काळात राजकारण होणार?
यंदा महाराजांच्या शिवराज्याभिषेक सोहळ्याचे देखील जय्यत तयारी राज्यात भाजप आणि शिवसेना सरकारकडून सध्या सुरु आहे. यामध्ये 350 व्या शिवराज्याभिषेक सोहळ्यानिमित्त छत्रपती शिवाजी महाराजांची तलवार आणि वाघ नखे देशात येणार याचा आनंद सर्वांनाच आहे. महाराजांची तलवार आणि वाघ नखे राज्यात आले तर ते देशात सर्वांना पाहता यावे यासाठी देशभर फिरवतील अशी देखील शक्यता आहे. त्यामुळे महाराजांची तलवार आणि वाघ नखे याच वर्षी देशात येतील खरं मात्र त्यावरुनही पुढील काळात राजकारण होण्याची शक्यता आहे