धक्कादायक! मित्राला भेटण्यासाठी हॉटेलमध्ये गेलेल्या महिलेवर तीन नराधमांनी केला अत्याचार, छत्रपती संभाजीनगर हादरलं
छत्रपती संभाजीनगरमध्ये (Chhatrapati Sambhajinagar) धक्कादायक घटना घडली आहे. मित्राला भेटण्यासाठी हॉटेलमध्ये गेलल्या महिलेवर तीन नराधमांनी अत्याचार केल्याची घटना घडली आहे.
Chhatrapati Sambhajinagar News : छत्रपती संभाजीनगरमध्ये (Chhatrapati Sambhajinagar) धक्कादायक घटना घडली आहे. मित्राला भेटण्यासाठी हॉटेलमध्ये गेल्यानंतर चुकून आरोपींच्या खोलीत गेलेल्या विवाहितेला दारु पीत बसलेल्या तीन नराधमांनी आत ओढून तिला बळजबरीने बिअर पाजून तिच्यावर सामूहिक अत्याचार केल्याची घटना घडली आहे. ही संतापजनक घटना बुधवारी रात्री 11 ते पहाटे 3 वाजण्याच्या दरम्यान रेल्वे स्टेशन भागातील एका हॉटेलमधील रुममध्ये घडली आहे. घटनेनंतर पळून गेलेल्या तिन्ही आरोपींच्या वेदांत नगर पोलिसांनी तीन तासात मुसक्या आवळल्या. घनश्याम भाऊलाल राठोड वय 27 ऋषिकेश तुळशीराम चव्हाण 25 आणि किरण लक्ष्मण राठोड 25 अशी अटकेतील आरोपींची नावे आहेत.
नेमकं काय घडलं?
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, 30 वर्षीय पीडिता ही विवाहित असून तिला एक बाळ आहे. पती पूर्वी काही काम करत नव्हता, सध्या तोही कामाला जातो. तर पीडिता एका खाजगी रुग्णालयात परिचारिका म्हणून काम करून कुटुंबाचा उदर्निवाह करते. तिला पैशाची गरज असल्याने तिने भोकरदन येथील मित्राला पैसे मागितले होते. ते घेण्यासाठी मित्राने तिला बुधवारी भेटण्यासाठी रेल्वे स्टेशन भागातील एका हॉटेलमध्ये बोलावले होते. तिच्या मित्राने तिथे 105 क्रमांकाची रुम बुक केलेली होती. दोघांनी रात्री बराच वेळ बसून मद्यप्राशन करून नंतर जेवण केले. रात्री अकराच्या सुमारास पीडिता फोनवर बोलत हॉटेलच्या बाहेर आली होती. काही वेळात ती परत हॉटेलमध्ये गेली. मात्र, तिने चुकून 105 ऐवजी खोली क्र 205 चा दरवाजा वाजवला. त्या रूममध्ये तिघेजण दारू पार्टी करत बसलेले होते. पीडितेने त्यांना मित्राचे नाव घेऊन तो कुठे आहे अशी विचारणा केली. त्यावर त्यांनी इथे नाही असे म्हटले. मात्र ती मागे फिरताच एकाने तुझा मित्र इथेच आत आहे असे सांगून तिला रूममध्ये घेतले. दार आतून लावून घेत तिला बळजबरीने बिअर पाजली. त्यानंतर तिघांनी तिच्यावर आळीपाळीने सामूहिक अत्याचार केला.
पहाटे तीन ते चार वाजण्याच्या दरम्यान पीडितेने आरोपींच्या तावडीतून सुटका करत पोलीस ठाणे गाठले
पहाटे तीन ते चार वाजण्याच्या दरम्यान पीडितेने आरोपींच्या तावडीतून सुटका करून घेत दरवाजा उघडून आरडाओरड केली. त्यानंतर तिने थेट वेदांत नगर पोलिस ठाणे गाठले. तोपर्यंत तिन्ही आरोपींनी हॉटेलमधून धूम ठोकली होती.
महत्वाच्या बातम्या:
Nanded Crime : गुंगीचे औषध दिलं, लैंगिक अत्याचार केला, व्हिडिओ व्हायरल करण्याची धमकी देत वारंवार संबंध अन् गर्भपात...शिक्षकाच्या कृत्याने नांदेड हादरलं
























