मोकाट कुत्रे मागे लागले, जीवाच्या भीतीनं सुसाट पळाला अन् खोल विहिरीत पडला, तब्बल 48 तास दोरीला लटकला, अखेर..
गावातील आडबाजूला असलेली खोल विहीर जिथे सहसा कोणाच लक्ष जात नाही अशा विहिरीत पडल्याने आरडाओरड करूनही बाहेर आवाज जाण्याची शक्यता कमीच.

Chhatrapati Sambhajinagar: छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात एक आगळीवेगळी आणि थरारक घटना घडली आहे. जालना जिल्ह्यातील 30 वर्षांचा एक तरुण नातेवाईकांच्या घरी गेला तेंव्हा त्याच्यावर चांगलाच प्रसंग ओढवला. मोकाट कुत्रे मागे लागले आणि पुढे त्याच्यासोबत जे काही घडलं ते भयंकर होतं. झालं असं की जालना जिल्ह्यातील वाढवण गावातील तरुण छत्रपती संभाजीनगरच्या पिशोर गावात आला होता. गावात आल्यावर त्याच्या पाठीमागे मोकाट कुत्रे लागले. या कुत्र्यांपासून बचाव करण्यासाठी पळत सुटलेला हा तरुण खोल विहिरीत पडला. तो विहिरीत पडलाय याचा कोणाला थांगपत्ता नव्हता. तब्बल दोन दिवस दोन रात्री या विहिरीतील दोरीला धरून त्याने स्वतःचा जीव वाचवला. अखेर तिसऱ्या दिवशी हा सगळा प्रकार लोकांच्या लक्षात आला. आजूबाजूचे लोक ग्रामस्थ पोलिसांच्या मदतीने अखेर या तरुणाला विहिरीतून सुखरूप बाहेर काढल्याने त्याचा जीव वाचला आहे. ही घटनेची परिसरात मोठी चर्चा आहे. हा तरुण एवढ्या खोल विहिरीत पडला होता की त्याचा आवाजही बाहेर ऐकू जात नव्हता. पण अखेर 48 तासांची या तरुणाची जीव वाचवण्याची धडपड चर्चेचा विषय ठरली आहे. (Chhatrapati Sambhajinagar News)
मोकाट कुत्र्याचा भीतीने धावला, अन ओढावला भयाण प्रसंग
छत्रपती संभाजीनगरच्या पिशोर गावात जालना जिल्ह्यातून आलेल्या एका 30 वर्षीय तरुणासोबत भयानक प्रसंग घडला. नातेवाईकांच्या घरी जाताना मोकाट कुत्रे मागे लागले. या मोकाट कुत्र्यांपासून वाचण्यासाठी जीवाच्या भीतीने पळाला आणि थेट खोल विहिरीत जाऊन पडला. गावातील आडबाजूला असलेली खोल विहीर जिथे सहसा कोणाच लक्ष जात नाही अशा विहिरीत पडल्याने आरडाओरड करूनही बाहेर आवाज जाण्याची शक्यता कमीच. शेवटी विहिरीत लटकत असलेल्या दोरीला धरून तब्बल दोन दिवस दोन रात्र हा तरुण आपला जीव वाचवण्याचा प्रयत्न करत होता. अखेर तिसऱ्या दिवशी ग्रामस्थांचे या सगळ्या प्रकाराकडे लक्ष गेलं. विहिरीत कुणीतरी अडकलाच कळताच स्थानिकांनी तातडीने पोलिसांना माहिती दिली. ग्रामस्थ आणि पोलिसांच्या आर्थिक प्रयत्नानंतर अखेर तरुणाला सुखरूप बाहेर काढण्यात आलं. सुदैवाने या घटनेत त्याचा जीव वाचला आहे त्याची प्रकृती ठीक असल्याचं सांगितलं जात आहे.
हेही वाचा:
























