मराठा आरक्षण: संभाजीराजेंनी दिल्लीत बोलावली सर्व खासदारांची बैठक, पवार, गडकरी, राणे उपस्थित राहणार का?
मराठा आरक्षणाच्या संदर्भात संभाजीराजे छत्रपती (Sambhajiraje Chhatrapati) यांनी दिल्ली येथे राज्यातील सर्व लोकसभा आणि राज्यसभा खासदारांची संयुक्त बैठक आयोजित केली आहे.
Maratha Reservation : सध्या मराठा आरक्षणाच्या (Maratha Reservation) मुद्यावरुन राजकारण चांगलच तापलं आहे. या मुद्यावरुन राजकीय नेते ऐकमेकांवर आरोप प्रत्यारोप करत आहेत. दरम्यान, मराठा आरक्षणाच्या संदर्भात महाराष्ट्रातील सर्व खासदारांनी (Maharashtra MP) एकमताने संसदेत आवाज उठवावा, यासाठी संभाजीराजे छत्रपती (Sambhajiraje Chhatrapati) यांनी दिल्ली येथे राज्यातील सर्व लोकसभा आणि राज्यसभा खासदारांची संयुक्त बैठक आयोजित केली आहे. या बैठकीसाठी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, राष्ट्रवादी काँग्रसचे अध्यक्ष शरद पवार, केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनाही निमंत्रण देण्यात आलं आहे.
18 डिसेंबर रोजी महाराष्ट्र सदन,नवी दिल्ली येथे होणाऱ्या या बैठकीस संभाजीराजे छत्रपती यांच्याकडून राज्यातील सर्व लोकसभा आणि राज्यसभा खासदारांना निमंत्रन देण्यात आलं आहे. मात्र, या बैठकीला शरद पवार, नितीन गडकरी, नारायण राणे, रामदास आठवले, सुप्रिया सुळे यांच्यासारखे बडे खासदार उपस्थित राहणार का? हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे. दम्यान, सध्या संसदेचं गिवाळी अधिवशन सुरु आहे. त्यामुळं महाराष्ट्रातील सर्व खासदार हे दिल्लीत उपस्थित आहेत. त्यामुळं आता यामधील कोणकोणते खासदार संभाजीराजे यांनी बोलावलेल्या बैठकीला उपस्थित राहणार हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.
मनोज जरांगे पटलांचा 24 डिसेंबरपर्यंत सरकारला अल्टिमेटम
मराठा समाजाला 24 डिसेंबरपर्यंत आरक्षण द्यावे,अन्यथा सरकारला पुढील आंदोलन जड जाईल असा इशारा मनोज जरांगे (Manoj Jarange) यांनी दिला आहे. त्यामुळे, 24 डिसेंबरनंतरचे आंदोलन कसे असणार याबाबत वेगवेगळ्या चर्चा सुरु आहे. अशातच 24 डिसेंबरनंतर मुंबईत जरांगेंचा ट्रॅक्टर मोर्चा (Tractor March) धडकणार असल्याची चर्चा सुरु आहे. विशेष म्हणजे, गावागावात मराठा आंदोलकांकडून ट्रॅक्टर्स आणि कार्यकर्ते घेऊन मुंबईत जाण्याची तयारी करण्यात येत आहे. विशेष म्हणजे सोशल मीडियातून ट्रॅक्टर मोर्च्याच्या निमित्ताने जोरदार वातावरण निर्मिती करण्यात येत असल्याचे देखील दिसत आहे. 24 डिसेंबरपर्यंत आरक्षण मिळालं नाहीतर मुंबईतील (Mumbai) मंत्रालयावर मोर्चा धडकणार असल्याचे सांगितले जात आहे.
ओबीसीतून मराठा आरक्षणावर जरांगे पाटील ठाम
मनोज जरांगे पाटील ओबीसीतून आरक्षणावर ठाम आहेत. तर, सरकार स्वतंत्र आरक्षणासाठी प्रयत्न करत असल्याचे सांगत आहेत. त्यामुळे दोघांच्या भूमिकेतील अंतर अजून तरी कमी झालेले नाही. त्यामुळे खरोखरच 24 तारखेपर्यंत हा प्रश्न मार्गी लागेल का? यावर प्रश्नचिन्ह आहे. सोबतच 17 डिसेंबर रोजी होणाऱ्या बैठकीत काय निर्णय होणार आणि खरचं मुंबईत ट्रॅक्टर मोर्चा काढण्याची घोषणा होणार का? हे पाहणं महत्वाचे ठरणार आहे.
महत्त्वाच्या बातम्या: