एक्स्प्लोर
Advertisement
(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Chhatrapati Sambhaji Nagar : छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात दुसऱ्या दिवशी जोरदार पाऊस, नद्यांना आले पूर
Chhatrapati Sambhaji Nagar : पैठण, सिल्लोड, वैजापूर, गंगापूरसह सोयगाव तालुक्यात बुधवारी पाऊस झाला.
Chhatrapati Sambhaji Nagar Rainfall Update : मंगळवारी झालेल्या जोरदार पावसानंतर (Rain) बुधवारी दुसऱ्या दिवशीही छत्रपती संभाजीनगर (Chhatrapati Sambhaji Nagar) जिल्ह्यात दमदार पावसाने हजेरी लावली. पैठण, सिल्लोड, वैजापूर, गंगापूरसह सोयगाव तालुक्यात बुधवारी पाऊस झाला. अनेक ठिकाणी नद्या नाल्यांना पुर आला आहे. त्यामुळे काही प्रमाणात नुकसान झाले आहे. मात्र दुसरीकडे शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे. मंगळवारी आणि बुधवारी झालेल्या पावसामुळे पिकांना मोठा फायदा होणार आहे.
कोठे-कोठे पाऊस झाला?
- बुधवारी दुपारच्या सुमारास औरंगाबाद तालुक्यातील लाडसावंगी परिसरात एक तास दमदार पावसाने हजेरी लावली. महसूल विभागाकडे 30 मिमी पाऊस झाल्याची नोंद आहे. बुधवारी येथील आठवडी बाजार असल्याने व्यापारी व ग्रामस्थांची चांगलीच धावपळ झाली. या पावसामुळे आता रखडलेल्या खरीप पेरण्यांना वेग येणार आहे. तर मुरूमखेडा परिसरातही बुधवारी दुपारी जोरदार पाऊस झाला. त्यामुळे मुरूमखेडा गावच्या नाल्याला पहिल्याच पावसात पूर आला आहे.
- सिल्लोड तालुक्यातील घाटनांद्रा येथे बुधवारी सायंकाळी पाच वाजेच्या सुमारास जोरदार पावसाने हजेरी लावली. त्यामुळे शेतकऱ्यांचे दुबार पेरणीचे संकट टळले आहे. काही ठिकाणी शेतात पाणी साचले होते, तर गावातील रस्त्यांवरही पाणीच पाणी होते. मात्र पिकांना गरज असताना पाऊस झाल्याने शेतकऱ्यांमधून समाधान व्यक्त करण्यात येत आहे.
- फुलंब्री तालुक्यातील आळंद व परिसरात गेल्या महिनाभरापासून दडी मारलेल्या पावसाने बुधवारी दुपारी तासभर जोरदार हजेरी लावली. त्यामुळे खरिप पिकांना जीवदान मिळाले आहे. सुरुवातीपासूनच पावसाने दडी मारली होती. त्यामुळे शेतकरी संकटात सापडले होते. आठ दिवसांपूर्वी झालेल्या रिमझिम पावसावरच शेतकऱ्यांनी लागवड केली होती. पण दमदार पाऊस होत नसल्याने हे पिके धोक्यात आले होते. परंतु बुधवारी झालेल्या पावसामुळे पिकांना जीवनदान मिळाले आहे.
- वैजापूर तालुक्यात दुसऱ्या दिवशी मुसळधार पावसाने हजेरी लावली. त्यामुळे अनेक नद्या-नाल्यांना पुर आले होते. आतापर्यंत तालुक्यात, बोरसर मंडळात सर्वाधिक 147 मिमी पावसाची नोंद झाली असून, लासूरगाव मंडळात 146 मिमी, खंडाळा मंडळात 120 मिमी, शिऊर मंडळात 106मिमी, महालगाव मंडळात 86 मिमी, गारज मंडळात 74 मिमी, नागमठाण मंडळात 69 मिमी, घायगाव मंडळात 65 मिमी, वैजापूर मंडळात 63 मिमी, लोणी मंडळात 43 मिमी व बाबतरा मंडळात 40 मिमी पावसाची नोंद झाली आहे. जानेफळ मंडळात आतापर्यंत सर्वात कमी 12 मिमी पावसाची नोंद झाली आहे.
इतर महत्वाच्या बातम्या:
Jalna Rain Update : जालना जिल्ह्यात आज यलो अलर्ट जारी; वीजेच्या कडकडाटासह वादळी वारे, पावसाची शक्यता
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
व्यापार-उद्योग
भविष्य
निवडणूक
निवडणूक
Advertisement