एक्स्प्लोर
भुजबळांच्या व्हायरल फोटोमागील सत्य उघड !
मुंबई: पैशांच्या गैरव्यवहाराप्रकरणात कैदेत असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते छगन भुजबळ यांच्या व्हायरल फोटोमागील सत्य उघड झालं आहे. सोशल मीडियावर भुजबळांच्या नावे फिरणारा फोटो हा छगन भुजबळांचाच असल्याचं समोर आलं आहे.
खरं तर पहिल्यांदा पाहिल्यावर हे भुजबळच आहेत, असं अऩेकांना पटणारही नाही. रुग्णालयातून जेव्हा भुजबळ बाहेर पडले तेव्हा वाढलेली दाढी, सोबतीला व्हिलचेअर त्यांच्याकडे होती.
मुंबईतल्या सेंट जॉर्ज रुग्णालयात त्यांना भर्ती केलं होतं. त्यानंतर त्यांना आज डिस्चार्ज मिळाल्यानं त्यांची रवानगी पुन्हा आर्थर रोड कारागृहात करण्यात आली.
महाराष्ट्र सदन बांधकामात गैरव्यवहार करणं, त्यातून आलेला पैसा पांढरा करणं., असे अनेक आरोप छगन भुजबळ आणि त्यांचा पुतण्या समीर भुजबळ आणि मुलगा पंकज भुजबळ यांच्यावर लावण्यात आलेले आहेत.
याप्रकरणी ईडी अर्थात अंमलबजावणी संचालनायकडून त्यांची चौकशी सुरु आहे. 14 मार्च 2016 ला भुजबळांना अटक झाली आहे. त्यानंतर त्यांच्या कोठडीत वाढ होत आहे.
दिल्लीत महाराष्ट्र सदन बांधकाम कंत्राटात अफरातफर केल्याचा आरोप छगन भुजबळ, त्यांचा मुलगा पंकज आणि पुतण्या समीरवर आहे. याशिवाय मुंबईतील कलिना विद्यापीठ भूखंड घोटाळा, अंधेरी आरटीओ, मुंबई-नाशिक टोल रोड, नवी मुंबईतील हेक्स वर्ल्ड हौसिंग प्रकल्पसारखे 9 विविध प्रकल्पात आपल्या जवळच्या नातेवाईकांना कंत्राट देऊन सुमारे 870 कोटींचा घोटाळा झाल्याचा आरोप आहे.
महाराष्ट्र सदन घोटाळ्याप्रकरणी भुजबळ यांच्यावर हवाला आणि मनी लाँडरिंग कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे .
भाजप नेते आणि खासदार किरीट सोमय्या, आपच्या माजी नेत्या अंजली दमानिया यांनीही भुजबळांवर भ्रष्टाचाराचे आरोप करत हायकोर्टात याचिका दाखल केल्या होत्या. त्यानंतर कोर्टाने एसीबीला चौकशीचे आदेश दिले होते.
त्यानंतर भुजबळांना 14 मार्चला रात्री उशिरा अटक झाली होती.
संबंधित बातम्या
छगन भुजबळांना नेमकी कोणत्या प्रकरणात अटक?
भुजबळांची अटक राजकीय हेतूनं प्रेरित: शरद पवार
छगन भुजबळ यांना दोन दिवसांची ईडीची कोठडी
पुढील दोन-चार वर्ष भुजबळ जेलबाहेर येणार नाही: किरीट सोमय्या
भुजबळांना अटक हा माझ्यासाठी अतिशय आनंदाचा दिवस: अंजली दमानिया
राष्ट्रवादीचे नेते छगन भुजबळ यांना अटक
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
राजकारण
नाशिक
क्राईम
राजकारण
Advertisement