एक्स्प्लोर

Chhagan Bhujbal : जरांगेंना भेटून सर सर म्हणणाऱ्या शिंदे समितीवर विश्वास नाही, भुजबळांनी स्वत:च्या सरकारविरुद्ध शड्डू ठोकला, मराठ्यांना OBC मधून आरक्षणाला विरोध!

Chhagan Bhujbal On Maratha Rerervation : मनोज जरांगे यांच्या पाया पडणाऱ्या शिंदे समितीवर आमचा विश्वास नाही असं वक्तव्य राज्याचे मंत्री छगन भुजबळ यांनी केलं आहे. भुजबळांच्या वक्तव्यावरून आता राज्य सरकारमधील वाद चव्हाट्यावर येण्याची शक्यता आहे.

मुंबई: ज्या समितीचे प्रमुख जालन्यात जाऊन मनोज जरांगेंना (Manoj Jarange) सर सर म्हणतात त्यांच्यावर आमचा विश्वास नाही अशी भूमिका घेत राज्याचे मंत्री छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) यांनी आपल्याच सरकारविरोधात शड्डू ठोकला आहे. मराठा आरक्षणाला (Maratha Reservation) विरोध नाही, पण त्यांना ओबीसीमधून आरक्षण (OBC Reservation) नको असंही ते म्हणाले. तसेच ज्याची कुणबी नोंद (Kunbi Certificate) सापडली आहे त्यालाच आरक्षण मिळावं, त्याच्या नातेवाईकांना नको अशी भूमिकाही त्यांनी घेतली. राज्याच्या एका मंत्र्यांनेच राज्य सरकारने नेमलेल्या समितीला विरोध केल्यामुळे अंतर्गत वाद चव्हाट्यावर येण्याची शक्यता आहे. 

मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर नेमण्यात आलेल्या शिंदे समितीला राज्याचे मंत्री छगन भुजबळ यांनी विरोध केला आहे. ते म्हणाले की, राज्याचे दोन माजी न्यायमूर्ती मनोज जरांगे यांच्या भेटीला गेले. समितीचे प्रमुख असलेले मनोज जरांगे यांच्या पाया पडतात, त्यांना सर सर म्हणतात. असल्या लोकांवर आमचा विश्वास नाही. 

त्या न्यायमूर्तींकडून न्याय कसा मिळेल? 

छगन भुजबळ म्हणाले की, "जरांगे यांच्या उपोषणाच्या वेळी लाठीचार्ज झाला. त्यामध्ये पोलीस जखमी झाले त्यांची बाजू पुढे आले नाही. 70 पोलीस जखमी झाल्यावर काय करणार? त्यांच्या आमच्या सरकारने बदल्या केल्या. पोलिसांवर कारवाई झाली म्हणून काय व्हायचे तर होऊ द्या हे त्यांनी ठरवलं असावं. पोलिसांवर हल्ला झाला त्याची कडक चौकशी झाली पाहिजे. मनोज जरांगे यांचे उपोषण सोडायला माजी न्यायमूर्ती जात असतील तर आम्हाला काय न्याय मिळणार? मंत्री जातात ते ठीक पण न्यायमूर्ती त्यांना सर म्हणतात, त्यांच्या पाया पडतात?"

नोंदी सापडलेल्यांच्या नातेवाईकांना कुणबी प्रमाणपत्र नको

मराठा आरक्षणाच्या विरोधात आपण नाही, पण त्यांना ओबीसीमधून आरक्षण नको अशी भूमिका छगन भुजबळ यांनी घेतली आहे. ते म्हणाले की, ज्या लोकांच्या कुणबी नोंदी मिळाल्या आहेत त्यांना कुणबी प्रमाणपत्र द्यावं, पण त्यामुळे त्यांच्या नातेवाईकाना कुणबी प्रमाणपत्र देणार असाल तर त्याला आपला विरोध असेल. राज्यातल्या ओबीसी समाजानेही एकत्र यावं आणि आपल्यावर जर अन्याय होत असेल तर लढावं. 

ही बातमी वाचा: 

 

 

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Solapur Crime : बेकायदा वाळू उपशामुळे चंद्रभागेच्या वाळवंटाची दैना, चंद्रभागा अक्षरशः ओरबाडून काढल्याचे विदारक चित्र
बेकायदा वाळू उपशामुळे चंद्रभागेच्या वाळवंटाची दैना, चंद्रभागा अक्षरशः ओरबाडून काढल्याचे विदारक चित्र
ST महामंडळ दरवर्षी 5000 नव्या लाल परी खरेदी करणार; परिवहन मंत्र्यांच्या बैठकीत पंचवार्षिक नियोजन
ST महामंडळ दरवर्षी 5000 नव्या लाल परी खरेदी करणार; परिवहन मंत्र्यांच्या बैठकीत पंचवार्षिक नियोजन
Video: सैफ अली खानला लीलावतीत नेणाऱ्या रिक्षावाल्यास किती पैसे मिळाले; मध्यरात्री भजनसिंगचा थरारक प्रवास
Video: सैफ अली खानला लीलावतीत नेणाऱ्या रिक्षावाल्यास किती पैसे मिळाले; मध्यरात्री भजनसिंगचा थरारक प्रवास
शिरसाट पदमुक्त होताच सिडकोचा 'दे धक्का'; 26,000 घरांच्या किंमती कमी होणार नाही, अर्जदारांची निराशा
शिरसाट पदमुक्त होताच सिडकोचा 'दे धक्का'; 26,000 घरांच्या किंमती कमी होणार नाही, अर्जदारांची निराशा
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

ABP Majha Marathi News Headlines 11PM TOP Headlines 11 PM 17 January 2025Baramati Father Killer Son : बापच उठला लेकराच्या जीवावर! 9 वर्षाच्या चिमुरड्याची बापाकडून हत्याWalmik Karad Special Report :कोट्याधीश कराड, पुण्यात घबाड; कराडच्या संपत्तीमुळे ईडीची एन्ट्री होणार?Saif Ali Khan Special Report : सैफ, सेफ आणि सवाल; सैफवरील हल्ल्याचंही राजकारण सुरु

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Solapur Crime : बेकायदा वाळू उपशामुळे चंद्रभागेच्या वाळवंटाची दैना, चंद्रभागा अक्षरशः ओरबाडून काढल्याचे विदारक चित्र
बेकायदा वाळू उपशामुळे चंद्रभागेच्या वाळवंटाची दैना, चंद्रभागा अक्षरशः ओरबाडून काढल्याचे विदारक चित्र
ST महामंडळ दरवर्षी 5000 नव्या लाल परी खरेदी करणार; परिवहन मंत्र्यांच्या बैठकीत पंचवार्षिक नियोजन
ST महामंडळ दरवर्षी 5000 नव्या लाल परी खरेदी करणार; परिवहन मंत्र्यांच्या बैठकीत पंचवार्षिक नियोजन
Video: सैफ अली खानला लीलावतीत नेणाऱ्या रिक्षावाल्यास किती पैसे मिळाले; मध्यरात्री भजनसिंगचा थरारक प्रवास
Video: सैफ अली खानला लीलावतीत नेणाऱ्या रिक्षावाल्यास किती पैसे मिळाले; मध्यरात्री भजनसिंगचा थरारक प्रवास
शिरसाट पदमुक्त होताच सिडकोचा 'दे धक्का'; 26,000 घरांच्या किंमती कमी होणार नाही, अर्जदारांची निराशा
शिरसाट पदमुक्त होताच सिडकोचा 'दे धक्का'; 26,000 घरांच्या किंमती कमी होणार नाही, अर्जदारांची निराशा
SSC Hall Ticket 2025 : मोठी बातमी ! 10 वीच्या विद्यार्थ्यांना दोन दिवसांत मिळणार हॉल तिकीट; SSC बोर्डाकडून तारीख जाहीर
मोठी बातमी! 10 वीच्या विद्यार्थ्यांना दोन दिवसांत मिळणार हॉल तिकीट; SSC बोर्डाकडून तारीख जाहीर
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 17 जानेवारी 2025 | शुक्रवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 17 जानेवारी 2025 | शुक्रवार
Rinku Singh: धुव्वाधार रिंकू सिंगच्या हाती लग्नाची बेडी; खासदारासोबत साखपुडा; यूपीच्या पठ्ठ्यानं MP पटवली
धुव्वाधार रिंकू सिंगच्या हाती लग्नाची बेडी; खासदारासोबत साखपुडा; यूपीच्या पठ्ठ्यानं MP पटवली
Bulletproof Glass : बुलेटप्रुफ काचेची किंमत किती, खरेदी करण्यासाठी कोणते नियम?
बुलेटप्रुफ काचेची किंमत किती, खरेदी करण्यासाठी कोणते नियम?
Embed widget