एक्स्प्लोर
कोल्हापूरच्या शिवाजी विद्यापीठाचं नामांतर करा : आमदार क्षीरसागर
नागपूर : मुंबईतील सीएसटी आणि एलफिन्स्टन रेल्वे स्टेशनच्या नामांतराच्या प्रस्तावानंतर, आता कोल्हापूरच्या शिवाजी विद्यापीठाच्या नामांतराचा प्रस्ताव सादर करण्यात आला आहे. कोल्हापूरच्या शिवाजी विद्यापीठाचं नामांतर ‘छत्रपती शिवाजी महाराज विद्यापीठ’ करा, अशी मागणी कोल्हापूरचे शिवसेना आमदार राजेश क्षीरसागर यांनी केली आहे. त्याबाबतचं निवेदन त्यांनी शिक्षणमंत्री विनोद तावडे यांना दिलं.
नुकतंच मुंबईतील ‘एलफिन्स्टन’ रेल्वे स्थानकाचं ‘प्रभादेवी’, ‘छत्रपती शिवाजी टर्मिनस’ (CST) रेल्वेस्थानकाच्या नावात ‘महाराज’ हे आदरार्थी संबोधन समाविष्ट करण्याचा प्रस्ताव मंजूर झाला आहे. याशिवाय छत्रपती शिवाजी आंतरराष्ट्रीय विमानतळाचं नाव आता ‘छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळ होण्याच्या तयारीत आहे. त्यामुळे राज्य सरकारने कोल्हापूर येथील ‘शिवाजी विद्यापीठा’चे नामांतर ‘छत्रपती शिवाजी महाराज विद्यापीठ’, असे करावे, अशी मागणी करणारे निवेदन शिवसेनेचे आमदार राजेश क्षीरसागर यांनी शिक्षणमंत्री विनोद तावडे यांना दिले.
नुकतंच मुंबईतील ‘एलफिन्स्टन’ रेल्वे स्थानकाचं ‘प्रभादेवी’, ‘छत्रपती शिवाजी टर्मिनस’ (CST) रेल्वेस्थानकाच्या नावात ‘महाराज’ हे आदरार्थी संबोधन समाविष्ट करण्याचा प्रस्ताव मंजूर झाला आहे. याशिवाय छत्रपती शिवाजी आंतरराष्ट्रीय विमानतळाचं नाव आता ‘छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळ होण्याच्या तयारीत आहे. त्यामुळे राज्य सरकारने कोल्हापूर येथील ‘शिवाजी विद्यापीठा’चे नामांतर ‘छत्रपती शिवाजी महाराज विद्यापीठ’, असे करावे, अशी मागणी करणारे निवेदन शिवसेनेचे आमदार राजेश क्षीरसागर यांनी शिक्षणमंत्री विनोद तावडे यांना दिले. संबंधित बातमी
सीएसटी, एल्फिन्स्टन रोड स्टेशनच्या नामांतराचा प्रस्ताव मंजूर
Before You Go
Jain Muni Nilesh Chandra : उद्धव ठाकरेंच्या रामरक्षा आंदोलनावर जैन मुनी निलेशचंद्रांनी डिवचलं; म्हणाले, 'त्यांना वाचता आलं नाही; कुराण द्यायला पाहिजे...'
महत्त्वाच्या बातम्या
महाराष्ट्र
महाराष्ट्र
महाराष्ट्र
महाराष्ट्र






















