एक्स्प्लोर

लिफाफा पद्धत अजूनही सुरु, आता तरी सुधरा, अन्यथा... : बावनकुळे

राळेगणसिद्धी (अहमदनगर) : राज्य उत्पादन शुल्क मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी स्वत:च्याच खात्यातील भ्रष्टाचार करणाऱ्यांना निर्वाणीचा इशारा दिला आहे. सरकार बदललं आहे, मात्र अजूनही लिफाफा पद्धत बंद झाली नसल्याचा जाहीर आरोप करत भ्रष्टाचाऱ्यांना सुधारण्याचा इशारा दिला. राळेगणसिद्धीला ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांच्या भेटीनंतर ते बोलत होते. प्रायव्हेट व्हिजीलन्सकडून आम्ही अधिकाऱ्यांच्या मालमत्तेची माहिती घेतोय. नोकरीला लागल्यापासून आतापर्यंतच्या मालमत्तेची माहिती घेतली जात आहे. त्यामुळे पैसे घेणाऱ्यांनी लिफाफा बंद करण्याचं आवाहन त्यांनी केलं आहे. तुम्ही सुधारले नाही तर कायदा बदलून काहीच होणार नाही, असंही त्यांनी म्हटलं. पांगरमल घटना टाळण्याची गरज होती. मात्र यापुढे या घटनांची पुनरावृत्ती झाल्यास सर्वच वरिष्ठांना जबाबदार धरण्याचा इशारा त्यांनी दिला. त्यामुळे पैसे घेण्याचं त्वरीत थांबवण्याचं आवाहन त्यांनी केलं. यावेळी चंद्रशेखर बावनकुळे यांनी उत्पादन शुल्कच्या कर्मचाऱ्यांना बौद्धिक देऊन सज्जड दम भरला. हजार-दोन हजार रुपयांवर अवैध धंद्याला परवानगी दिली जाते. मात्र, एखाद्याचा बळी गेल्यावर तीन पिढ्या बरबाद होतात. त्यामुळे लिफाफा पद्धत बंद करण्याचं जाहीर आवाहन त्यांनी केलं. ग्रामरक्षक दलाच्या सुधारीत विधेयकाला मंजुरी यावेळी ग्रामरक्षक दलाच्या सुधारीत विधेयकाला मंजुरी देण्यात आली. त्यानुसार ग्रामरक्षक दलाला विशेष अधिकार देण्यात आले आहेत. तक्रारीनंतर बारा तासात कारवाई करण्यात येणार आहे. कारवाईत कामचुकार अधिकाऱ्यांवर प्रशासकीय कारवाई केली जाणार आहे. अण्णांच्या पुढाकारानं उत्पादन शुल्क खात्यात अमुलाग्र बदल झाल्याचं त्यांनी म्हटलं आहे. नगरला ग्रामरक्षक दलाचा पायलट प्रोजेक्ट राबवण्यात येणार आहे. 30 जूनपर्यंत जिल्ह्यात ग्रामरक्षक दल स्थापून 15 जूनला राळेगणला बैठक होणार आहे. दोन वर्षांत एकही जिल्हा ग्रामरक्षक दलाशिवाय राहणार नसल्याचं बावनकुळे यांनी म्हटलं. दरम्यान, ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी बावनकुळे यांच्या कामाचं कौतुक केलं. जनतेचं काम गावात जाऊन करणारा पहिला मंत्री असल्याचं अण्णांनी म्हटलं. सर्व मंत्र्यांनी बावनकुळे यांच्यासारखं शासन तुमच्या दारी हा उपक्रम राबवल्यास देशाला आणि राज्याला नवी दिशा देईल, असं अण्णांनी म्हटलं आहे.

महत्त्वाच्या बातम्या

NCP Sharad Pawar MP Meets Narendra Modi Delhi: देशाच्या राजकारणातील हायव्होल्टेज मिटिंग; सुळे, कोल्हे, लंकेंसह शरद पवारांचे सर्व 8 खासदार नरेंद्र मोदींची भेट घेणार; दिल्लीत काय घडतंय?
देशाच्या राजकारणातील हायव्होल्टेज मिटिंग; सुळे, कोल्हे, लंकेंसह शरद पवारांचे सर्व 8 खासदार नरेंद्र मोदींची भेट घेणार; दिल्लीत काय घडतंय?
...तर जरांगेंच्या आधी मीच अधिकाऱ्यांचा कार्यक्रम करणार, मंत्री राणेंचा इशारा, म्हणाले सडक्या आंब्यांना सोडणार नाही
...तर जरांगेंच्या आधी मीच अधिकाऱ्यांचा कार्यक्रम करणार, मंत्री राणेंचा इशारा, म्हणाले सडक्या आंब्यांना सोडणार नाही
एकाच भटक्या कुत्र्याचा उच्छाद, हल्ल्यात 150 नागरिक जखमी, कल्याणच्या खडकपाडा परिसरात थरार
एकाच भटक्या कुत्र्याचा उच्छाद, हल्ल्यात 150 नागरिक जखमी, कल्याणच्या खडकपाडा परिसरात थरार
बुलढाणा जिल्ह्याचे 'राजमाता जिजाऊनगर' असं नामकरण होणार, भाजप आमदार श्वेता महालेंचं मुख्यमंत्र्यांना पत्र, फडणवीसांकडून कार्यवाही करण्याचे निर्देश
बुलढाणा जिल्ह्याचे 'राजमाता जिजाऊनगर' असं नामकरण होणार, भाजप आमदार श्वेता महालेंचं मुख्यमंत्र्यांना पत्र, फडणवीसांकडून कार्यवाही करण्याचे निर्देश

व्हिडीओ

Raj Thackeray Special Report : मुंबई-गोवा महामार्गावरुन राज ठाकरेंचे सरकारला खडेसवाल : ABP Majha
Maharashtra Rain : महाराष्ट्रात पाऊस लय भारी... गाठली सरासरी Special Report
Sharad Pawar MP Will Meet Pm Modi : भेटीगाठींचा सिलसिला, पवारांचा काय फैसला? Special Report
Raj Thackeray PC : कोकणातले खड्डे, जमिनीची विक्री, कंत्राटदारते नितीन गडकरी, राज ठाकरेंची FULL PC
Prashant Damle Majha Katta : रंगभूमीवर महाविक्रम, कधीही न ऐकलेले किस्से, प्रशांत दामलेंचा ‘माझा कट्टा’

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Milk Alteration Racket : दूध भेसळ प्रकरणात आणखी दहा जण अटकेत, मंचर पोलिसांनी बेड्या ठोकल्या, अटकेचा आकडा 24 वर, राजकीय कनेक्शन असल्याची चर्चा!
दूध भेसळ प्रकरणात आणखी दहा जण अटकेत, मंचर पोलिसांनी बेड्या ठोकल्या, अटकेचा आकडा 24 वर
ED Chief Rahul Navin : ईडीचे प्रमुख राहुल नवीन यांचा कार्यकाळ एका वर्षानं वाढवला, मोदी सरकारचा मोठा निर्णय
ईडीचे प्रमुख राहुल नवीन यांचा कार्यकाळ एका वर्षानं वाढवला, मोदी सरकारचा मोठा निर्णय
मनोज जरांगे पाटलांची बावनकुळेंवर व्यंगात्मक टीका; म्हणाले, हडप्पा संस्कृती अन् अजंठा लेणीप्रमाणे दिसणारा प्राणी
मनोज जरांगे पाटलांची बावनकुळेंवर व्यंगात्मक टीका; म्हणाले, हडप्पा संस्कृती अन् अजंठा लेणीप्रमाणे दिसणारा प्राणी
Sarfaraz Khan: अखेर सरफराज खानसाठी टीम इंडियाची दारं पुन्हा उघडली, बीसीसीआयची मोठी घोषणा, साई सुदर्शनच्या जागी संधी
अखेर सरफराज खानसाठी टीम इंडियाची दारं पुन्हा उघडली, बीसीसीआयची मोठी घोषणा
IND vs SL XI : 6,6,6... सिराजचा सराव सामन्यात धमाका, विजयासाठी एका ओव्हरमध्ये 16 धावांची गरज असताना तीन षटकार मारले, श्रीलंकेच्या खेळाडूंनी थेट बॅट तपासली
6,6,6... सिराजचा सराव सामन्यात धमाका, विजयासाठी एका ओव्हरमध्ये 16 धावांची गरज असताना तीन षटकार मारले
जयंत पाटील अन् देवेंद्र फडणवीसांचा एकाच विमानातून प्रवास; काँग्रेसची पहिली प्रतिक्रिया, हर्षवर्धन सपकाळ स्पष्टच बोलले
जयंत पाटील अन् देवेंद्र फडणवीसांचा एकाच विमानातून प्रवास; काँग्रेसची पहिली प्रतिक्रिया, हर्षवर्धन सपकाळ स्पष्टच बोलले
नालासोपाऱ्यात कोयत्याने पिता-पुत्रावर जीवघेणा हल्ला; मुलाची प्रृकती गंभीर, वडिलही थोडक्यात बचावले रुग्णालयात उपचार
नालासोपाऱ्यात कोयत्याने पिता-पुत्रावर जीवघेणा हल्ला; मुलाची प्रृकती गंभीर, वडिलही थोडक्यात बचावले रुग्णालयात उपचार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 9 ऑगस्ट 2026 | मंगळवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 9 ऑगस्ट 2026 | मंगळवार
Embed widget