एक्स्प्लोर

Chandrashekhar Bawankule : ओबीसींचा कळवळा दाखवणाऱ्या पटोले, वडेट्टीवारांनी राजीनामा द्यावा; भाजप प्रदेशाध्यक्षांचा काँग्रेसवर घणाघात

Chandrashekhar Bawankule : नाना पटोले आणि विजय वडेट्टीवार यांनी राहुल गांधींच्या विधानाचा निषेध करावा आणि आपल्या पदाचा राजीनामा द्यावा. असा हल्लाबोल भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी केला. 

Chandrashekhar Bawankule नागपुर : राहुल गांधी (Rahul Gandhi) संपूर्ण देशातील ओबीसी (OBC) समाजाचा वारंवार अपमान करताना त्यांच्याच पक्षातील ओबीसी नेते म्हणविणारे काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले (Nana Patole)आणि विधानसभेचे विरोधी पक्षनेते  विजय वडेट्टीवार (Vijay Wadettiwar) गप्पगार आहेत. त्यांनी राहुल गांधींच्या विधानाचा निषेध करावा आणि आपल्या पदाचा तत्काळ राजीनामा द्यावा, असा हल्लाबोल भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे (Chandrashekhar Bawankule) यांनी केला. 

काँग्रेसला करंट लावल्याशिवाय राहणार नाही 

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याविरुद्ध केलेल्या बेताल वक्तव्याविरोधात भाजपने राज्यभर तीव्र आंदोलन पुकारले आहे. राज्यभरातील सर्व जिल्हा मुख्यालय आणि महत्वाच्या शहरात भाजप तसेच ओबीसी मोर्चाच्या वतीने जोरदार आंदोलन सुरू आहे. प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्या नेतृत्त्वात नागपुरात देखील असेच एक जोरदार आंदोलन करण्यात आले. त्यावेळी त्यांनी दोन्ही विरोधीपक्षातील नेत्यांवर घणाघात करत टीका केली.

ते म्हणाले की, राहुल गांधी पंतप्रधान मोदी यांच्याबद्दल ज्या आकसाने बोलतात, त्यांच्या बोलण्याच्या पद्धतीवरून आणि आवेशातून त्यांच्या मनातील ओबीसी समाजाबद्दलची चिड दिसून येते. ओबीसी समाजाचा वारंवार होणार अपमान कधीही विसरता येणार नाही. संपूर्ण ओबीसी समाज काँग्रेसला करंट लावल्याशिवाय राहणार नसल्याचे बावनकुळे म्हणाले. सोबतच उद्या शनिवार,10 फेब्रुवारीला राज्यभरातील सर्व तालुक्याच्या ठिकाणी भाजप काँग्रेस विरुद्ध जोरदार आंदोलन पुकारणार असल्याचा इशारा देखील त्यांनी दिला आहे.

राहुल गांधी नेमकं काय म्हणाले? 

काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर निशाणा साधताना, त्यांच्या जातीचा उल्लेख केला. पंतप्रधान नरेंद्र मोदींचा हे जन्माने ओबीसी नाहीत, त्यांचा जन्म ओबीसीमध्ये झाला नाही. ते गुजरातमधील तेली समाजात जन्माला आले. भाजपने 2000 साली या समाजाला ओबीसीचा दर्जा दिला, असा दावा राहुल गांधी यांनी केला. राहुल गांधी यांची भारत जोडो यात्रा ओदिशामध्ये पोहोचली असतांना त्यांनी मोदींवर हल्लाबोल केला. 

पुढे राहुल गांधी म्हणाले, "सर्वात आधी मला हे सांगावं लागेल की पंतप्रधान नरेंद्र मोदी हे जन्मजात ओबीसी नाहीत. नरेंद्र मोदी हे गुजरातमधील तेली समाजात जन्मला आले. आपल्या सर्वांना भयंकर बेवकूफ, मूर्ख बनवलं जात आहे. तेली जातीला भाजपने 2000 साली ओबीसीमध्ये समाविष्ट केलं. त्यामुळे मोदी हे जन्माने ओबीसी नाहीत. तरीही ते खोटं बोलून आपण जन्मजात ओबीसी असल्याचं सांगत आहेत. मला सर्टिफेकटची काहीही गरज नाही. मला माहिती आहे ते ओबीसी नाहीत. ते कोणत्याही ओबीसीची गळाभेट घेत नाहीत. ते कोणत्याही शेतकऱ्याचा हात हातात घेत नाहीत, कोणत्या मजुराला हात लावत नाहीत. ते केवळ अदानींचा हात पकडतात. मोदी कधीही जातनिहाय गणना करु देणार नाहीत, हे मी लिहून देतो. जातीय गणना फक्त आणि फक्त राहुल गांधी आणि काँग्रेसच करु शकते" 

इतर महत्वाच्या बातम्या 

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Israel Vs Iran : इस्त्रायल-लेबननच्या संघर्षात इराणची एण्ट्री, इस्त्रायलवर केला 200 मिसाईल्सचा भडीमार
इस्त्रायल-लेबननच्या संघर्षात इराणची एण्ट्री, इस्त्रायलवर केला 200 मिसाईल्सचा भडीमार
'ती' घटना अत्यंत दुर्मिळ; कोल्हापुरातील हत्याप्रकरणात हायकोर्टाकडून आरोपीला फाशीची शिक्षा कायम
'ती' घटना अत्यंत दुर्मिळ; कोल्हापुरातील हत्याप्रकरणात हायकोर्टाकडून आरोपीला फाशीची शिक्षा कायम
बसमधील सुंदरीला आधी छत्री द्यावी लागेल;  आव्हाड म्हणाले, आधी भरत गोगावलेंचे पाय धरा
बसमधील सुंदरीला आधी छत्री द्यावी लागेल; आव्हाड म्हणाले, आधी भरत गोगावलेंचे पाय धरा
Pitru Paksha 2024 : उद्या सर्वपित्री अमावस्या आणि ग्रहण एकाच दिवशी; पित्र करावे की नाही?
सर्वपित्री अमावस्या आणि ग्रहण एकाच दिवशी; पित्र करावे की नाही?
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

ABP Majha Headlines : 11 PM : 1 ऑक्टोबर 2024 : Maharashtra News : एबीपी माझा हेडलाईन्सMahayuti vs MVA : निवडणुकीआधी वक्तव्यांचा 'जिहाद'? महायुतीची रणनीती काय? Special ReportZero Hour Shinde Fadnavis on Hindu Votes : हिंदू मतांच्या एकत्रीकरणासाठी शिंदे-फडणवीसांच्या भेटीगाठीZero Hour MVA And Mahayuti : महायुती आणि महाविकास आघाडीच्या नेत्यांमध्ये जागावाटपासाठी खलबतं

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Israel Vs Iran : इस्त्रायल-लेबननच्या संघर्षात इराणची एण्ट्री, इस्त्रायलवर केला 200 मिसाईल्सचा भडीमार
इस्त्रायल-लेबननच्या संघर्षात इराणची एण्ट्री, इस्त्रायलवर केला 200 मिसाईल्सचा भडीमार
'ती' घटना अत्यंत दुर्मिळ; कोल्हापुरातील हत्याप्रकरणात हायकोर्टाकडून आरोपीला फाशीची शिक्षा कायम
'ती' घटना अत्यंत दुर्मिळ; कोल्हापुरातील हत्याप्रकरणात हायकोर्टाकडून आरोपीला फाशीची शिक्षा कायम
बसमधील सुंदरीला आधी छत्री द्यावी लागेल;  आव्हाड म्हणाले, आधी भरत गोगावलेंचे पाय धरा
बसमधील सुंदरीला आधी छत्री द्यावी लागेल; आव्हाड म्हणाले, आधी भरत गोगावलेंचे पाय धरा
Pitru Paksha 2024 : उद्या सर्वपित्री अमावस्या आणि ग्रहण एकाच दिवशी; पित्र करावे की नाही?
सर्वपित्री अमावस्या आणि ग्रहण एकाच दिवशी; पित्र करावे की नाही?
Video : हक्क मागतोय महाराष्ट्, शरद पवारांच्या राष्ट्रवादीचं प्रचारगीत लाँच; अमित शाहांना मिश्कील टोला
Video : हक्क मागतोय महाराष्ट्, शरद पवारांच्या राष्ट्रवादीचं प्रचारगीत लाँच; अमित शाहांना मिश्कील टोला
Pitru Paksha 2024 : पितृ पक्ष संपताच वाढणार 'या' 3 राशींच्या अडचणी; नोकरीत विरोधक देणार त्रास, आर्थिक संकटही बळावणार
पितृ पक्ष संपताच वाढणार 'या' 3 राशींच्या अडचणी; नोकरीत विरोधक देणार त्रास, आर्थिक संकटही बळावणार
पुण्यात 21 एकरवरील ऐतिहासिक शिवसृष्टी; मुख्यमंत्री डॉ. मोहन यादव यांच्याहस्ते लोकार्पण
पुण्यात 21 एकरवरील ऐतिहासिक शिवसृष्टी; मुख्यमंत्री डॉ. मोहन यादव यांच्याहस्ते लोकार्पण
भाजपमध्ये पहिला राजीनामा पडला, माजी मंत्र्‍यानी ठोकला रामराम ; दोन ओळीतच दिलं स्पष्टीकरण
भाजपमध्ये पहिला राजीनामा पडला, माजी मंत्र्‍यानी ठोकला रामराम ; दोन ओळीतच दिलं स्पष्टीकरण
Embed widget