Chandrashekhar Bawankule : अश्लील शब्दात टीका केली, फडणवीस आमचं नेतृत्व त्यांचा अपमान सहन करणार नाही; चंद्रशेखर बावनकुळेंचा मनोज जरांगेंवर हल्लाबोल
मराठा समाजाला देखील अशा प्रकारे जे वक्तव्य केलं जात आहे ते मान्य नाही आणि महाराष्ट्रातील जनतेला देखील मान्य नाही. फडणवीस आमचं नेतृत्व असून त्यांचा अपमान सहन करणार नाही, असा इशारा त्यांनी दिला.
नागपूर : मराठा आंदोलनकर्ते मनोज जरांगे पाटील यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर अत्यंत गंभीर आरोप शेलक्या शब्दात टीका केल्यानंतर भाजप नेत्यांचा संताप अनावर झाला आहे. भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी जरांगे पाटील यांना इशारा दिला आहे. बावनकुळे म्हणाले की, देवेंद्र फडणवीस हे सुशिक्षित आणि सुसंस्कृत नेते आहेत. त्यांनी जाती पातीचे राजकारण केलं नाही, पण त्यांच्या जातीवरून अश्लील शब्दात त्यांनी टीका केली. 2014 ते 2019 मद्ये त्यांनी रात्र रात्र जागून आरक्षण दिलं, पण ते ज्यांनी टिकवलं नाही त्यांच्याबद्दल का बोललं जातं नाही. त्यांना सागर बंगला आणि फडणवीस का दिसत आहेत? अशी विचारणा त्यांनी केली.
फडणवीस यांच्या बंगल्यावर का जात आहेत?
ते पुढे म्हणाले की, अशा प्रकारे त्यांच्यावर या टीका ते का करत आहेत? फडणवीस यांनी जरांगे यांचे आतापर्यंत संपूर्ण संरक्षण केलं आहे. फडणवीस यांच्या बंगल्यावर का जात आहेत? ज्यांनी आरक्षण टिकवल नाही त्यांचा बंगल्यावर का जात नाही? जरांगे यांचा जीव कसा वाचेल यासाठी फडणवीस यांनी प्रयत्न केले आहेत, पण असे आरोप करणे चुकीचे आहे. मराठा समाजाला देखील फडणवीसांवर अशा प्रकारे जे वक्तव्य केलं जात आहे ते मान्य नाही आणि महाराष्ट्रातील जनतेला देखील मान्य नाही. फडणवीस आमचं नेतृत्व असून त्यांचा अपमान सहन करणार नाही, असा इशारा त्यांनी दिला.
दरम्यान, जरांगे पाटील यांनी केलेल्या आरोपानंतर फडणवीस यांनी स्पष्टीकरण दिले. ते म्हणाले की, जी स्क्रिप्ट आतापर्यंत उद्धव ठाकरे, पवार साहेब बोलत होते तीच स्क्रिप्ट ते जरांगे का बोलत आहेत? हा प्रश्न आहे. काही अंदाज आम्हाला आहे. आम्ही योग्यवेळी बाहेर काढू असे फडणवीस म्हणाले. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले की, जोपर्यंत मनोज जरांगे पाटील यांची लोकांसाठी भावना होती तेव्हा मी स्वतः त्यांच्या बरोबर होतो. आता मात्र त्यांची भाषा राजकीय वाटत आहे. त्याच्या बोलण्यातून राजकीय वास येत आहे. हे त्यांना कोणी बोलायला लावतं का? हे पाहावं लागेल. महाराष्ट्र हे सहन करत नाही असे ते म्हणाले.
इतर महत्वाच्या बातम्या