एक्स्प्लोर

Devendra Fadnavis on Manoj Jarange Patil : जी स्क्रिप्ट ठाकरे पवार बोलत होते तेच मनोज जरांगे का मांडत आहेत? देवेंद्र फडणवीसांची विचारणा

Devendra Fadnavis on Manoj Jarange Patil : काही अंदाज आम्हाला आहे. आम्ही योग्यवेळी बाहेर काढू. कायदा आणि सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी पोलीस प्रशासन लागेल ते सर्व करेल, असे फडणवीस म्हणाले. 

मुंबईसागर बंगला हा सरकारी आहे, कोणीही सरकारी कामाने सागर बंगल्यावर येऊ शकतं. कोणाचीही अडवणूक नाही. मात्र, कोणत्य निराशेतून ते बोलत आहेत, कोणती सहानुभूती हवे आहे ते माहीत नाही. ते जे बोलले ते बिनबुडाचे आहे, धादांत खोटं आहे हे त्यांना सुद्धा माहिती असल्याची टीका उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली. ते म्हणाले की,  मी मराठा समाजासाठी काय केलं? सारथी, अण्णासाहेब पाटील मंडळाची सुरुवात केली. मराठा आरक्षण हायकोर्टात आणि सर्वोच्च न्यायालयात सुध्दा टिकवलं. त्यामुळे कोणी बोलला म्हणून मराठा समाज विश्वास ठेवेल असं म्हणणारा मी नाही. जी स्क्रिप्ट आतापर्यंत उद्धव ठाकरे, पवार साहेब बोलत होते तीच स्क्रिप्ट ते जरांगे का बोलत आहेत? हा प्रश्न आहे. काही अंदाज आम्हाला आहे. आम्ही योग्यवेळी बाहेर काढू. कायदा आणि सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी पोलीस प्रशासन लागेल ते सर्व करेल, असे फडणवीस म्हणाले. 

आरक्षण देऊन मुख्यमंत्र्यांनी शब्द पाळला : देवेंद्र फडणवीस 

दरम्यान, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मराठा समाजाला 10 टक्के आरक्षण देऊन शब्द मुख्यमंत्र्यांनी पाळला असल्याची प्रतिक्रिया उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली. प्रत्येक ठिकाणी मदत करण्याचे धोरण सरकारने घेतलं आहे. राज्यात गुंतवणूक देखील येत असल्याचे ते म्हणाले. फडणवीस यांनी विरोधकांकडून पत्रकार परिषद घेतली गेली नसल्याने टीका केली.  

जरांगे यांनी वेळोवेळी मागण्या बदलल्या

दरम्यान, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले की, जरांगे पाटील  प्रामाणिक भावना मनात ठेवून या लढ्यात उतरले आहेत अशी आमची पूर्ण भावना होती. मग शिंदे कमिटी केली, त्यानंतर सरसकटची मागणी आली. यानंतर राज्यात व्याप्ती वाढवली. नंतर सगेसोयरे मागणी आली. आता ओबीसी मधून द्या म्हणाल्याने वेळोवेळी मागण्या बदलल्या. मी स्वतः मुख्यमंत्री म्हणून भेटायला गेलो. देवेंद्रजी मुख्यमंत्री होते तेव्हा 56 आंदोलन झाली. कोणालाही तेव्हा त्रास झाला नाही. यावेळी मात्र दगडफेक, आग लागली. गालबोट लावण्याचं काम कोण करत आहे, तरुणांनी सावध राहिलं पाहिजे. 

त्यांनी सांगितले की, जोपर्यंत मनोज जरांगे पाटील यांची लोकांसाठी भावना होती तेव्हा मी स्वतः त्यांच्या बरोबर होतो. आता मात्र त्यांची भाषा राजकीय वाटत आहे. त्याच्या बोलण्यातून राजकीय वास येत आहे. आज मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री यांच्याबद्दल असं बोलणं ही आपली संस्कृती नाही. हे त्यांना कोणी बोलायला लावतं का? हे पाहावं लागेल. महाराष्ट्र हे सहन करत नाही. 

इतर महत्वाच्या बातम्या 

गेल्या 7 वर्षांपासून एबीपी माझाशी नाळ बांधली आहे. रेल्वे आणि रस्ते वाहतुकीचे वार्तांकन करताना, ठाणे जिल्ह्याची जबाबदारी देखील सांभाळत आहेत. यासोबतच राजकीय बातम्या विशेषतः शिंदे गटाची जबाबदारी यांच्याकडे आहे. याआधी मी मराठी, जय महाराष्ट्र सारख्या वृत्त वाहिन्यात आणि वृत्तपत्रात कामाचा अनुभव आहे

Read More

महत्त्वाच्या बातम्या

कमी दाबाचा पट्टा उत्तरेकडे सरकला, हवामान विभागानं दिलेला अंदाज बदलला, ऑरेंज अलर्ट काढला यलो अलर्ट दिला 
कमी दाबाचा पट्टा उत्तरेकडे सरकला, हवामान विभागानं दिलेला अंदाज बदलला, ऑरेंज अलर्ट काढला यलो अलर्ट दिला 
Maharashtra Breaking LIVE: राज्यातील महत्त्वाच्या घडामोडींसह देश-विदेशातील महत्त्वाच्या बातम्यांचा आढावा फक्त एका क्लिकवर...
Maharashtra Breaking LIVE: राज्यातील महत्त्वाच्या घडामोडींसह देश-विदेशातील महत्त्वाच्या बातम्यांचा आढावा फक्त एका क्लिकवर...
Nitesh Rane: पुण्यातील गणेशोत्सव डीजे बंदीवरून वातावरण तापलं; नितेश राणे प्रतिक्रिया देताना म्हणाले, 'उत्सव आणि डीजेसंदर्भात फक्त हिंदू सणांच्यावेळी आक्षेप...'
पुण्यातील गणेशोत्सव डीजे बंदीवरून वातावरण तापलं; नितेश राणे प्रतिक्रिया देताना म्हणाले, 'उत्सव आणि डीजेसंदर्भात फक्त हिंदू सणांच्यावेळी आक्षेप...'
Vidyanand Bapat Marathi News: पुण्यात डीजेविरोधात आवाज उठवणाऱ्या विद्यानंद बापट यांना मारहाण; हल्ला होताच म्हणाले, घटं भिन्द्यात् पटं छिन्द्यात्!
पुण्यात डीजेविरोधात आवाज उठवणाऱ्या विद्यानंद बापट यांना मारहाण; हल्ला होताच म्हणाले, घटं भिन्द्यात् पटं छिन्द्यात्!

व्हिडीओ

Manoj Jarange Jalna : प्रसाद लाड यांच्याकडून पाणी प्यायले, पण मनोज जरांगे उपोषणावर ठाम
Sandeep Deshpande Mumbai : दुसऱ्यांना पप्पू म्हणता, आम्ही तुम्हाला फेकू म्हटलं तर राग येईल ना?
Ravindra Chavan News: अमित ठाकरेंच्या विरोधात भाजपने केलेल्या आंदोलनावर रवींद्र चव्हाणांची नापसंती
Manoj Jarange Patil: तुम्ही अभ्यास करून अधिकारी झालात, तुम्हाला बकरा बनवताय, पुन्हा येऊ नका; जिल्हाधिकाऱ्यांशी बोलताना मनोज जरांगेंना अश्रू अनावर
GDP Rate India : जीडीपाचा बोलबाला, पंतप्रधानांचा बचतीचा सल्ला Special Report

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Vidyanand Bapat Marathi News: पुण्यात डीजेविरोधात आवाज उठवणाऱ्या विद्यानंद बापट यांना मारहाण; हल्ला होताच म्हणाले, घटं भिन्द्यात् पटं छिन्द्यात्!
पुण्यात डीजेविरोधात आवाज उठवणाऱ्या विद्यानंद बापट यांना मारहाण; हल्ला होताच म्हणाले, घटं भिन्द्यात् पटं छिन्द्यात्!
Nitesh Rane: पुण्यातील गणेशोत्सव डीजे बंदीवरून वातावरण तापलं; नितेश राणे प्रतिक्रिया देताना म्हणाले, 'उत्सव आणि डीजेसंदर्भात फक्त हिंदू सणांच्यावेळी आक्षेप...'
पुण्यातील गणेशोत्सव डीजे बंदीवरून वातावरण तापलं; नितेश राणे प्रतिक्रिया देताना म्हणाले, 'उत्सव आणि डीजेसंदर्भात फक्त हिंदू सणांच्यावेळी आक्षेप...'
Nitesh Rane Majha Infra Vision : मुंबईत 2028 पर्यंत वॉटर मेट्रो, वॉटर टॅक्सीचे पहिले काही टप्पे सुरु करणार, प्रवासाचा वेळ आणखी वाचणार, नितेश राणे यांचा विश्वास
मुंबईत 2028 पर्यंत वॉटर मेट्रो, वॉटर टॅक्सीचे पहिले काही टप्पे सुरु करणार, प्रवासाचा वेळ आणखी वाचणार, मंत्री नितेश राणे यांचा विश्वास
Indapur Crime News: जमिनीच्या वादातून मुलांनी आई-वडीलांना लाकडी दांडक्याने बेदम मारलं, इंदापुरात भररस्त्यात धक्कादायक प्रकार
जमिनीच्या वादातून मुलांनी आई-वडीलांना लाकडी दांडक्याने बेदम मारलं, इंदापुरात भररस्त्यात धक्कादायक प्रकार
Manoj Jarange Protest : मराठा आरक्षणासाठी जरांगेंना साथ द्यायला अंतरवालीला गेले, रात्री शेतात झोपले पण सकाळी उठलेच नाहीत, मराठा आंदोलकाचा दुर्दैवी अंत
मराठा आरक्षणासाठी जरांगेंना साथ द्यायला अंतरवालीला गेले, रात्री शेतात झोपले पण सकाळी उठलेच नाहीत, मराठा आंदोलकाचा दुर्दैवी अंत
Vidyanand Bapat attack in Pune: मुलाखत सुरु असताना हल्ला झाला, पण विद्यानंद बापट स्थितप्रज्ञपणे उभे राहिले, दुसऱ्या क्षणी तेच जगप्रसिद्ध वाक्य उच्चारलं
मुलाखत सुरु असताना हल्ला झाला, पण विद्यानंद बापट स्थितप्रज्ञपणे उभे राहिले, दुसऱ्या क्षणी तेच जगप्रसिद्ध वाक्य उच्चारलं
Vidyanand Bapat Pune Ganesh Utsav DJ: विद्यानंद बापट हा अर्बन नक्सल, गणेशोत्सवाचा संबंध सतीप्रथेशी जोडतो; कुलकर्णी अन् महाजन आजोबा काय-काय म्हणाले?
विद्यानंद बापट हा अर्बन नक्सल, गणेशोत्सवाचा संबंध सतीप्रथेशी जोडतो; कुलकर्णी अन् महाजन आजोबा काय-काय म्हणाले?
Hindi Rajbhasha Sammelan 2026: नवी मुंबईत 'हिंदी' राजभाषा संमेलनाचे आयोजन, अमित शाहांची प्रमुख उपस्थिती; नव्या वादाला तोंड फुटण्याची शक्यता
नवी मुंबईत 'हिंदी' राजभाषा संमेलनाचे आयोजन, अमित शाहांची प्रमुख उपस्थिती; नव्या वादाला तोंड फुटण्याची शक्यता
Embed widget