एक्स्प्लोर
चंद्रपुरात घरी घुसलेल्या चोरावर चाकूचे वार, चोराचा मृत्यू, कुटुंब अटकेत
चोरीच्या हेतूने रितेश गुप्ता आणि पंकज ठाकूर हे दोघं रात्री दोन वाजता हलदर कुटुंबाच्या घरात घुसले. आवाजामुळे घरातील काही जण जागे झाले

चंद्रपूर : चंद्रपुरात चोरीच्या उद्देशाने घरात घुसलेल्या चोराचाच मृत्यू झाल्याची घटना समोर आली आहे. घरातील सदस्यांनी चोराला त्याच्याच चाकूने भोसकल्यामुळे त्याचा मृत्यू झाला. पोलिसांनी हलदर कुटुंबातील चौघांना हत्येप्रकरणी अटक केली आहे. चंद्रपुरातील शामनगर भागात चोरी आणि हत्येचा थरार घडला. चोरीच्या हेतूने रितेश गुप्ता आणि पंकज ठाकूर हे दोघं रात्री दोन वाजता हलदर कुटुंबाच्या घरात घुसले. आवाजामुळे घरातील काही जण जागे झाले आणि चोर घरात घुसल्याचं त्यांच्या लक्षात आलं. घरातील सदस्यांनी आरडाओरड करायला सुरुवात केल्यावर घाबरलेल्या चोराने त्यांच्यावर चाकू हल्ला केला. त्यावेळी झालेल्या झटापटीत घरातील सदस्यांनी चोराच्या हातातील चाकू घेत त्याचावरच वार केला. यामध्ये रितेश गुप्ता या चोराचा मृत्यू झाला, तर पंकज ठाकूर जखमी झाला आहे. रितेश हा मूळ बनारसचा रहिवासी आहे. पोलिसांनी सुब्रतो हलदर, सुजन हलदर, सुजित हलदर आणि अर्चना हलदर यांना अटक केली आहे.
आणखी वाचा























