(Source: ECI/ABP News/ABP Majha)
सुप्रियाताई तुम्ही काळजी करू नका; मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री फिरतात आणि सरकारपण उत्तम चालवतात : चंद्रकांत पाटील
Chandrakant Patil : सध्याचे मुख्यमंत्री हे फिरतात पण आणि सरकार पण उत्तम चालवतात, असे चंद्रकांत पाटील म्हणाले.
कल्याण -डोंबिवली : राज्यााला सध्या दोन मुख्यमंत्र्यांची (CM) गरज असल्याच्या सुप्रिया सुळेंच्या टीकेला (Supriya Sule) चंद्रकांत पाटील (Chandrakant Pati) यांनी प्रत्युत्तर दिले आहे. सुप्रियाताई तुम्ही काळजी करू नका आणि सध्याचे मुख्यमंत्री हे फिरतात पण आणि सरकार पण उत्तम चालवतात असा टोमणा उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी सुप्रिया सुळे यांना लगावला आहे.
सध्या अतिशय उत्तमरीत्या प्रशासन सुरू आहे. आधीचे मुख्यमंत्री हे तर घराच्या बाहेर देखील पडत नव्हते. त्यामुळे सुप्रिया ताई तुम्ही काळजी करू नका, सध्याचे मुख्यमंत्री हे फिरतात पण आणि सरकार पण उत्तम चालवतात, असे चंद्रकांत पाटील म्हणाले. चंद्रकांत पाटील हे टिटवाळा येथील गोवेली महाविद्यालयात आयोजित कल्याण ग्रामीण परिसरातील कीर्तनकार महाराजांचा जाहीर सत्कार सोहळ्यासाठी आले होते, त्यावेळी ते बोलत होते.
दुर्गम भागात स्किल डेव्हलपमेंट वाढवा ,कौशल्य विकासाशिवाय महाराष्ट्रातल्या तरुण-तरुणींच्या हाताला रोजगार मिळणार नाही असे देखील उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यावेळी म्हणाले
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे गणेशोत्सवाच्या निमित्ताने गणेश दर्शन दर्शन करत अनेकांच्या भेटीगाठी घेतल्या. दहा दिवसात 1200 ते 1500 गणपतींचे दर्शन घेतले. मुख्यमंत्र्यांच्या गणेश दर्शनवार विरोधकांनी टीका केलीतरी मुख्यमंत्र्यांनी आपली दर्शन यात्रा कधी थांबवली नाही. याट मुद्दाला धरून सुप्रिया सुळे यांनी टीका केली होती. राज्याला दोन मुख्यमंत्र्यांची गरज आहे, एक मुख्यमंत्री जे मंत्रालयात बसून काम करू शकतील आणि दुसरे मुख्यमंत्री जे वेगवेगळ्या पद्धतीने फोटोसेशन आणि गणपती दर्शन करत बसतील, अशी टीका खासदार सुप्रिया सुळे (Supriya Sule) यांनी केली आहे. अनेक मंत्र्यांनी लोकसभा मतदारसंघातल्या कामांसाठी वेळ मागितली, पण ते वेळ देत नाहीत. याचा अर्थ प्रशासन गेल्या अडीच महिन्यापासून ठप्प आहे.