एक्स्प्लोर

चंद्रकांत पाटील राजीनामा द्या: अजित पवार

चंद्रकांत पाटील हे महाराष्ट्रचे समन्वय मंत्री आहेत, असं असताना त्यांनी कर्नाटक गौरव गीत गाणं निषेधार्ह आहे, असं अजित पवार म्हणाले.

नांदेड: बेळगावमध्ये जाऊन कर्नाटकाचे गोडवे गाणाऱ्या महसूल मंत्री चंद्रकांत पाटील यांनी राजीनामा द्यावा, अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांनी केली. तसंच त्यांनी चंद्रकांत पाटलांच्या वक्तव्याचा निषेध व्यक्त केला. हल्लाबोल यात्रेदरम्यान अजित पवार माहूर येथे बोलत होते. चंद्रकांत पाटील हे महाराष्ट्रचे समन्वय मंत्री आहेत, असं असताना त्यांनी कर्नाटक गौरव गीत गाणं निषेधार्ह आहे, असं अजित पवार म्हणाले. आपल्या मंत्र्याने परराज्यात जरुर जावे, पण स्वतःच्या राज्याची अस्मिता पाळावी असं अजित पवार यांनी नमूद केलं. चंद्रकांत पाटील नेमकं काय म्हणाले? चंद्रकांत पाटील यांनी बेळगाव जिल्ह्यातील गोकाक तालुक्यातील तवग गावातील दुर्गादेवी मंदिराच्या उद्घाटनाला हजेरी लावली. मंदिराचं उद्घाटन केल्यानंतर, पाटील यांनी भाषणाची सुरुवात 'हुट्टीदरे कन्नड नाडू हुट्टू बेकू' (जन्माला यायचे तर कर्नाटकात जन्म घ्यावा) या कन्नड गाण्याने करून उपस्थितांना खुश केलं. उपस्थितांनीही टाळ्यांचा कडकडाट केला. चंद्रकांत पाटलांनी कन्नड गाण्याची ओळ म्हटल्यामुळे सीमाभागातील मराठी भाषिकात नाराजीचे वातावरण पसरलं आहे. कन्नड गाण्याची ओळ सीमाप्रश्नाचे समन्वयक मंत्री असलेल्या चंद्रकांत पाटलांनी म्हणून सीमाभागातील मराठी भाषिकांच्या जखमेवर मीठ चोळले आहे, अशी प्रतिक्रिया मराठी युवा मंचचे सुरज कणबरकर यांनी दिली. चंद्रकांत पाटलांची सीमाप्रश्नाच्या समन्वयक पदावरून हकालपट्टी करावी आणि त्या जागी मराठीचा स्वाभिमान असणारी व्यक्ती नियुक्त करावी, अशी मागणी मराठी भाषिक युवकांनी एका पत्रकाद्वारे केली आहे. मराठी माणसाच्या पाठीत खंजीर खुपसला: मुंडे दरम्यान, चंद्रकांत पाटील यांच्या या वक्तव्यावर विधानपरिषदेतील विरोधीपक्षनेते धनंजय मुंडे यांनी आक्रमक पवित्रा घेतला. चंद्रकांत पाटलांनी मराठी माणसाच्या पाठीत खंजीर खुपसला, असा हल्लाबोल धनंजय मुंडेंनी केला. “महाराष्ट्र भाजपाचे गुजराती प्रेम ज्ञात होते, आता कन्नड प्रेमही उघड झाले आहे. कर्नाटकात जाऊन कन्नड प्रेमाचे गोडवे गाणाऱ्या  चंद्रकांत पाटलांनी सीमावासीय आणि मराठी माणसांच्या पाठीत खंजीर खुपसला आहे. त्यांनी राज्यातील जनतेची माफी मागावी”, असं ट्विट धनंजय मुंडेंनी केलं. संबंधित बातमी चंद्रकांत पाटलांनी कन्नड गाणं गायल्याने मराठी भाषिकांमध्ये नाराजी 

महत्त्वाच्या बातम्या

धक्कादायक! शिवसेना शिंदे गटाच्या माजी नगरसेवकाकडून विमानतळावरच गोळीबार, दोन जण जखमी, नेमकं प्रकरण काय?
धक्कादायक! शिवसेना शिंदे गटाच्या माजी नगरसेवकाकडून विमानतळावरच गोळीबार, दोन जण जखमी, नेमकं प्रकरण काय?
Manoj Jarange Patil: 'मराठ्यांपुढे सत्तेचं शहाणपण जमत नाहीत, आता आमच्या बाया चपला काढतील'; मनोज जरांगेंचा इशारा
'मराठ्यांपुढे सत्तेचं शहाणपण जमत नाहीत, आता आमच्या बाया चपला काढतील'; मनोज जरांगेंचा इशारा
हायकोर्टाच्या लिपिक पदाच्या परीक्षेत गडबड, परीक्षा केंद्रावर उडाला गोंधळ; विद्यार्थ्यांचा ठिय्या, पोलीस घटनास्थळी
हायकोर्टाच्या लिपिक पदाच्या परीक्षेत गडबड, परीक्षा केंद्रावर उडाला गोंधळ; विद्यार्थ्यांचा ठिय्या, पोलीस घटनास्थळी
Video: तुला आर्ग्यू करायचं असेल तर मी निघतो; 'व्हेजिटेरियन हो तो आ जाओ' म्हणणाऱ्या भावेश कावरेवर संतापले अमित ठाकरे
Video: तुला आर्ग्यू करायचं असेल तर मी निघतो; 'व्हेजिटेरियन हो तो आ जाओ' म्हणणाऱ्या भावेश कावरेवर संतापले अमित ठाकरे

व्हिडीओ

Abhijeet Dipke Hingoli PC : नवीन पीएम हाऊस बांधण्यापेक्षा शाळा बांधा; अभिजीत दीपके आक्रमक!
Dhananjay Munde Speech : बहिणीचे आभार मानू कसे, पंकजा मुंडेंसाठी धनूभाऊंचे भाषण
Sunil Kendrekar Majha Katta : आएएस अधिकारी सुनील केंद्रेकर शेतीकडे कसे वळवले?
Special Report Gandhi Topi : उर्दू शाळेची शान, गांधी टोपीला मान, गणवेशात गांधी टोपी
Pm Modi Speech Highlites : मोदींच्या लाल किल्ल्यावरील भाषणातले टॉप 10 मुद्दे

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
अमित ठाकरेंच्या भेटीनंतर मुंबईतील फ्लॅट एजंट भावेश कावरेची माफी; म्हणाला, मला शब्दाला शब्द वाढवायचा नाही
अमित ठाकरेंच्या भेटीनंतर मुंबईतील फ्लॅट एजंट भावेश कावरेची माफी; म्हणाला, मला शब्दाला शब्द वाढवायचा नाही
Prithviraj Chavan : गोपीनाथ मुंडेंबाबत माझ्या मनात आदर, ते काँग्रेसमध्ये आलो असतो तर 2014 ची निवडणूक जिंकलो असतो : पृथ्वीराज चव्हाण
गोपीनाथ मुंडे काँग्रेसमध्ये आले असते तर 2014 हारलो नसतो, मुख्यमंत्रिपदासाठी त्यांचं नाव सुचवलं असतं: पृथ्वीराज चव्हाण
Revanth Reddy: काँग्रेस सरकारला बदनाम करण्यासाठी कर्नाटक आणि तामिळनाडूतील मंदिरांना भेट देत तंत्र-मंत्र विधी केल्याचा आरोप
काँग्रेस सरकारला बदनाम करण्यासाठी कर्नाटक आणि तामिळनाडूतील मंदिरांना भेट देत तंत्र-मंत्र विधी केल्याचा आरोप
Share Market : शेअर बाजारातील मंदीचा फटका, सेन्सेक्सवरील टॉप 10 पैकी 5 कंपन्यांचे 1 लाख कोटी बुडाले, टीसीएसला सर्वाधिक फटका
सेन्सेक्सवरील टॉप 10 पैकी 5 कंपन्यांचे 1 लाख कोटी बुडाले,टीसीएसला सर्वाधिक फटका
Manoj Jarange Patil: '29 ऑगस्टला जीव गेला तरी चालेल पण आंदोलनावर ठाम'; अभ्यासकांसोबतच्या अंतरवाली सराटीतील बैठकीत मनोज जरांगेंचा निर्धार
'29 ऑगस्टला जीव गेला तरी चालेल पण आंदोलनावर ठाम'; अभ्यासकांसोबतच्या अंतरवाली सराटीतील बैठकीत मनोज जरांगेंचा निर्धार
Video: तुला आर्ग्यू करायचं असेल तर मी निघतो; 'व्हेजिटेरियन हो तो आ जाओ' म्हणणाऱ्या भावेश कावरेवर संतापले अमित ठाकरे
Video: तुला आर्ग्यू करायचं असेल तर मी निघतो; 'व्हेजिटेरियन हो तो आ जाओ' म्हणणाऱ्या भावेश कावरेवर संतापले अमित ठाकरे
Jaykumar Gore and Sushma Andhare: जयकुमार गोरे, सुरुवात तुम्ही केलेय, आता शेवट आम्हाला करावाच लागेल; सुषमा अंधारेंचा इशारा
जयकुमार गोरे, सुरुवात तुम्ही केलेय, आता शेवट आम्हाला करावाच लागेल; सुषमा अंधारेंचा इशारा
पत्नीला मारहाण करताच बेशुद्ध पडली, घाबरून इंजिनिअर पतीनं सुद्धा आईला फोन करून गळ्याला दोरी लावली, कौटुंबिक वादात दोघांचाही हकनाक जीव गेला
पत्नीला मारहाण करताच बेशुद्ध पडली, घाबरून इंजिनिअर पतीनं सुद्धा आईला फोन करून गळ्याला दोरी लावली, कौटुंबिक वादात दोघांचाही हकनाक जीव गेला
Embed widget