मुख्यमंत्र्यांची बाजू मांडतांना जितेंद्र आव्हाडांनी माझा बाप काढला, चंद्रकांत पाटलांचा आरोप, आव्हाड म्हणाले...
जितेंद्र आव्हाड यांनी माझा बाप काढला असल्याचा आरोप भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी केला आहे. ही आपली संस्कृती नसल्याचे पाटील म्हणाले. मात्र, त्यांचा हा आरोप आव्हाडांनी फेटाळून लावला आहे.
मुंबई : मुख्यमंत्र्यांची बाजू मांडतांना जितेंद्र आव्हाड यांनी माझा बाप काढला असल्याचा आरोप भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी केला आहे. ही आपली संस्कृती नसल्याचे पाटील म्हणाले. मात्र, मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी चंद्रकांत पाटील यांचा आरोप फेटाळून लावला आहे. मी जर चंद्रकांत पाटील यांचा बाप काढला असेल तर त्यांचे पाय धरुन माफी मागण्यास तयार असल्याचे आव्हाड म्हणालेत.
मुख्यमंत्री अधिवेशनात उपस्थित राहणार का, याबाबत माहिती नाही. मी भविष्यकार नाही. आधी मी त्यांच्याजवळ होतो मात्र आता माहिती नाही. त्यांच्या हिताच्या दृष्टीने मी बोललो होतो की, त्यांनी मुख्यमंत्रीपदाचा चार्ज दुसऱ्याकडे द्यावा, असेही पाटील म्हणाले. मंत्री जितेंद्र आव्हाडांना सेनेच्या जवळ जाऊन फाईल क्लिअर करायची असेल अशी खोचक टीका पाटील यांनी केली. अध्यक्षपदाची निवडणूक होईल का याबाबत माहिती नाही ,परंतू जर झाली तर बघू कोणाला संधी द्यायची ते ठरवू असे पाटील यांनी सांगितले. उद्धव ठाकरे हे मुख्यमंत्री पदाचा चार्ज दुसऱ्याकडे देत नाहीत, कारण त्यांना भीती वाटते. जर राष्ट्रवादी काँग्रेसला केलं तर ते महाराष्ट्र विकून टाकतील, असा टोलाही पाटील यांनी लगावला.
आव्हाड नेमकं काय म्हणाले होते?
विरोधी पक्षाने मागण्या करणं, आंदोलन करणं, टीका करणं हे स्वाभाविक आहे. पण कोणाच्या तरी आजारपणावर टीका करणं हे राजकीय प्रगल्भता नसल्याचं उदाहरण असल्याचे आव्हाड म्हणाले होते. कालच्या मंत्रीमंडळाच्या बैठकीमध्ये मुख्यमंत्री अर्धा, पाऊण तास बोलत होते. असं सांगितलं. मुख्यमंत्र्यांवर कोणत्याही विभागाची जबाबदारी नाही. ते संपूर्ण मंत्रीमंडळाचे नेते आहेत. जेव्हा गरज लागेल तेव्हा मुख्यमंत्री विधानभवानामध्ये येणार आहेत. ते अधिवेशनाच्या दोन दिवस आधी विधानभवनात येऊन गेले होते. त्यामुळे त्यांच्या प्रकृतीसंदर्भात राज्यात संभ्रम निर्माण करणं किंवा चर्चा करणं चुकीचं आहे, असे देखील आव्हाड म्हणाले होते. आपला बाप आजारी असताना आपण आपल्या बापाबद्दल चर्चा करतो का? आपली ती संस्कृती आहे का? आजारपण हे नैसर्गिक आहे. तो काय स्वत:हून नाटक करत नसतो. त्यामुळे या आजारपणाची चर्चा करणं हेच मुळात विकृतपणाचं, बालिशपणाचं लक्षण आहे,” अशा शब्दांमध्ये आव्हाड यांनी आपली नाराजी व्यक्त केली होती.
महत्त्वाच्या बातम्या: