एक्स्प्लोर
Advertisement
(Source: ECI/ABP News/ABP Majha)
उदयनराजेंची 'ही' इच्छा पूर्ण होईल, शेवटी ते राजे आहेत : चंद्रकांत पाटील
1 सप्टेंबरला सोलापुरात अमित शाहांच्या उपस्थितीत काँग्रेस आणि राष्ट्रवादीतील तीन मोठ्या नेत्यांचा भाजप प्रवेश होणार आहे.
पुणे : ‘पंतप्रधानांच्या उपस्थितीत प्रवेश व्हावा अशी उदयनराजेंची इच्छा असेल ती देखील पूर्ण होईल शेवटी ते राजे आहेत’, अशा शब्दात भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी उदयनराजे यांच्या भाजप प्रवेशाच्या चर्चेवर वक्तव्य केले आहे. चंद्रकांत पाटलांच्या या वक्तव्यानंतर सगळ्यांच्याच भूवया उंचावल्या आहेत.
जो जो पक्षात येईल त्या सगळ्याचं स्वागतच आहे. फक्त त्यांच्यावर कुठले गंभीर गु्न्हे दाखल नसावेत, कोणतेही आरोप नसावेत, त्यांना कुठला शब्द दिला जाणार नाही असही चंद्रकांत पाटील म्हणाले. तसेचं ज्यांची चर्चा आहे ते सगळे एक सप्टेबरला मोदींच्या उपस्थितील भाजपात प्रवेश करणार आहे.
भाजपमध्ये येणारे येतच राहतील. गेल्या पाच वर्षात मोठ्या प्रमाणात भाजप-शिवसेने बाबत विश्वास लोकांमध्ये निर्माण झाला आहे. आपल्या मतदारसंघात विकास व्हावा आपले अजेंडे पूर्ण व्हावे या अपेक्षेने लोक भाजपमध्ये येत असल्याचेही पाटील म्हणाले. त्यांचं स्वागत आहे असून त्यांचे राजीनामे वगैरे अशा तांत्रिक बाबी लक्षात घेऊन त्यांचे प्रवेश होतील असं पाटील यांनी स्पष्ट केलं.
Udayanraje Bhosle | राजकारणातून अलिप्त व्हावसं वाटतंय : उदयनराजे | ABP Majha
तसेच, 1 सप्टेंबरला सोलापुरात अमित शाहांच्या उपस्थितीत काँग्रेस आणि राष्ट्रवादीतील तीन मोठ्या नेत्यांचा भाजप प्रवेश होणार आहे. त्यात मानचे आमदार जयकुमार गोरे, कोल्हापुरचे माजी खासदार धनंजय महाडिक आणि उस्मानाबाद-कळंब विधानसभा मतदारसंघाचे आमदार राणाजगजितसिंह पाटील यांचा समावेश आहे.
दरम्यान नारायण राणे यांच्या संदर्भात बोलताना राणेंचा विषय इतका मोठा आहे, की तो माझ्या ताकदीच्या बाहेरचा विषय आहे. त्याबाबतचा निर्णय घ्यायला राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा समर्थ आहेत असा टोला चंद्रकांत पाटील यानी लगावला.
VIDEO | भाजप अध्यक्ष अमित शाह यांच्या सोलापूर दोऱ्यात तीन बड्या नेत्यांचा भाजपमध्ये प्रवेश होणार | ABP Majha
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
भविष्य
निवडणूक
निवडणूक
राजकारण
Advertisement