एक्स्प्लोर
बुलडाण्यात मुख्यमंत्र्यांच्या सभेआधी गोंधळ, खुर्च्याही फेकल्या
बुलडाण्यात नांदुरा येथे मुख्यमंत्र्यांच्या सभेआधी दोन गटांमध्ये वाद झाला. त्यामुळे सभेसाठी लावलेल्या खुर्च्यांची फेकाफेकी सुरु झाली. पोलिसांनी वेळीच हस्तक्षेप केल्यानं मोठा गोंधळ टळला आहे. मात्र हा वाद नेमका कशामुळे झाला याचं कारण अस्पष्ट आहे.
बुलडाणा : बुलडाण्यात नांदुरा येथे मुख्यमंत्र्यांच्या सभेआधी दोन गटांमध्ये वाद झाला. त्यामुळे सभेसाठी लावलेल्या खुर्च्यांची फेकाफेकी सुरु झाली. पोलिसांनी वेळीच हस्तक्षेप केल्यानं मोठा गोंधळ टळला आहे. मात्र हा वाद नेमका कशामुळे झाला याचं कारण अस्पष्ट आहे.
आज दुपारी बुलडाणा जिल्ह्यातील नांदुऱ्यात मुख्यमंत्र्यांची सभा होणार होती. मात्र सभा सुरु होण्यापूर्वी दोन गटांमध्ये काही कारणाने वाद झाला. याच वादात उपस्थित नागरिकांनी खुर्च्या उचलून एकमेकांवर फेकण्यास सुरुवात केली. मात्र पोलिसांनी प्रसंगावधान राखत हस्तक्षेप केला आणि तणाव काहीसा निवळला.
दरम्यान या दोन गटांमध्ये झालेल्या वादाचं कारण अद्याप अस्पष्ट आहे. काहीवेळापूर्वीच सभास्थळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि केंद्रीय मंत्री नितीन गडकरी दाखल झाले असून सभा सुरु झाली आहे.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
पुणे
विश्व
छत्रपती संभाजी नगर
महाराष्ट्र
Advertisement