एक्स्प्लोर

जेथून आंदोलनाची सुरुवात झाली 'त्या' आंतरवाली सराटीसह राज्यभरात मराठ्यांचा जल्लोष

Maratha Reservation Decision Celebration : मनोज जरांगे यांनी आंदोलन सुरु केलेल्या आंतरवाली सराटी आणि त्यांच्या जन्मगाव मातोरीसह राज्यभरात गावागावात असाच जल्लोष पाहायला मिळत आहे.

जालना: मनोज जरांगे (Manoj Jarange) यांनी ज्या ठिकाणाहून मराठा आरक्षणाचा (Maratha Reservation) लढा उभा केला, त्या आंतरवाली सराटी (Antarwali Sarathi) गावांमध्ये देखील आंदोलन करणाऱ्या गावकऱ्यांनी जल्लोष सुरु केला आहे. फटाके फोडून, पेढे भरवत, गुलाल लावून आंदोलकांनी एकमेकांना शुभेच्छा दिल्या. गावांमध्ये आनंदाच आणि उत्साहाचे वातावरण पाहायला मिळत आहे. यावेळी समस्त गावकऱ्यांनी 'एबीपी माझा'चे आभार देखील मानले आहे. विशेष म्हणजे मनोज जरांगे यांचे जन्मगाव मातोरीसह राज्यभरात गावागावात असाच जल्लोष पाहायला मिळत आहे. 

मातोरीत गावकऱ्यांचा जल्लोष...

मनोज जरांगे पाटील यांनी मराठा आरक्षण घेऊनच परत येणार अशी घोषणा केली होती. आज अखेर ही घोषणा खरी ठरली आहे. त्यामुळे मनोज जरांगे पाटील यांच्या जन्मगावी मातोरीत डीजेच्या तालामध्ये भव्य अशी मिरवणूक काढण्यात आली आहे. गुलाल उधळला जातोय, पेढे वाटले जात आहेत आणि यामध्ये अख्खा गाव नाचतांना पाहायला मिळत आहे. विशेष म्हणजे गावातील महिला  सुद्धा या आनंद उत्सवामध्ये सहभागी झाल्या आहेत. 

नाशिकमध्ये विजय उत्सव साजरा...

मराठा समाजाच्या आरक्षणाचा अध्यादेश निघाल्यानंतर नाशिकमध्ये मराठा समाजाच्या वतीने विजय उत्सव साजरा करण्यात येत आहे. सकल मराठा समाजाच्यावतीने नाशिक रोड येथील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याला अभिवादन करून जल्लोष साजरा करण्यात आला. घोषणाबाजी, आतषबाजी, आणि गुलालाची उधळण करत विजय उत्सव साजरा करण्यात आला. 

सोलापुरातही जल्लोष...

मराठा समाजाच्या मागण्या मान्य झाल्यानंतर राज्यभरात याचा आनंद साजरा केला जात आहे. दरम्यान, सोलापुरात देखील जल्लोष साजरा केला जात आहे. मराठा समाज बांधवासह मुस्लिम बांधव देखील जल्लोषात सहभागी झाल्याचे पाहायला मिळाले. गुलाल उधळत, डान्स करीत, फटाका्यांच्या आतिषबाजीत हा आनंद उत्सव साजरा करण्यात आला. गेली अनेक दशक जे स्वप्न पाहिलेलं होते, ते स्वप्न आज पूर्ण झाल्याचा हा आनंद असल्याच्या मराठा समाजाच्या भावना आहे. 

लोणावळ्यात गुलालाची उधळण

मनोज जरांगेंनी उभारलेल्या मराठा आरक्षणाच्या आंदोलनाला मोठं यश मिळालं आहे. याचा आनंद आता गावागावात साजरा व्हायला लागलाय. पुण्यातील लोणावळ्यात जिथं मुंबईत दाखल होण्यापूर्वी विराट सभा झाली होती, तिथंही मराठा बांधवांनी मोठा जल्लोष सुरू केलाय. गुलालाची उधळण करत, डीजेच्या तालावर जरांगे समर्थकांनी ठेका धरल्याचे पाहायला मिळाले. 

बीड शहरात जल्लोष...

मराठा आरक्षणाचा निर्णय सरकारने घेतल्याबद्दल बीड शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौकामध्ये आनंद व्यक्त करण्यात आला. यावेळी मराठा समाजबांधव यांनी एकत्र येऊन जल्लोष साजरा केला. यावेळी फटाक्यांची जोरदार आतिषबाजी देखील करण्यात आली. सोबतच जोरदार घोषणाबाजी देखील पाहायला मिळाल्या. 

परभणीत गावागावात जोरदार आनंदोत्सव...

मनोज जरांगे पाटील आणि मराठा समाजाचा आरक्षणाचा लढा यशस्वी झाला आहे. यानंतर गावागावांमध्ये जोरदार जल्लोष साजरा केला जात आहे. परभणीच्या कातनेश्वर गावामध्ये महिलांनी घरांसमोर वेगवेगळ्या रांगोळ्या काढल्यात, साखर वाटली जातेय, डीजे लावून गावांमध्ये मराठा समाजाकडून आनंदोत्सव सुरू आहे. तसेच फटाके फोडत, जोरदार गुलाल उधळून मराठा समाजाकडून आरक्षण मिळाल्याचा आनंद साजरा केला जात आहे.

ठाण्यात मराठ्यांचा जल्लोष...

मराठा आरक्षणाच्या आंदोलनाला यश मिळाले असल्याने सर्वत्र मराठा समजा आनंद साजरा करत आहे. ठाण्यातील शासकीय विश्रामगृह येथे सकल मराठा समाजाकडून ढोल ताशाच्या गजरात एकमेकांना पेढे भरून जल्लोष साजरा करण्यात आला. यावेळी जोरदारपणे घोषणाबाजी देखील देण्यात आल्या. 

अहमदनगर जिल्ह्यात मराठ्यांचा जल्लोष 

अहमदनगर शहरातील माळीवाडा परिसरातील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याला पुष्पहार घालून, फटाके फोडून, एकमेकांना पेढे भरवत मराठा बांधवांकडून जल्लोष साजरा केला जातोय. यावेळी डीजेच्या तालावर मराठा बांधवानी ठेका धरलाय. विशेष म्हणजे मराठा समाजातील महिलांचाही यात मोठ्या संख्येने सहभाग पाहायला मिळत आहे.

पंढरपुरात गुलाल उधळला...

सोलापूर जिल्ह्यातील पंढरपूर येथे छत्रपती शिवाजी महाराज चौक येथे हजारो मराठा कार्यकर्त्यांनी अभूतपूर्व जल्लोष सुरू केला आहे. शहरात दिवाळीसारखा फटाके फोडून जल्लोष केला जात आहे. मनोज जरांगे यांच्या लढ्याला यश मिळाल्याने मराठा समाजात सर्वत्र आनंद पाहायला मिळत आहे. 

मराठा समाजाला आरक्षण मिळाल्यानंतर हिंगोलीत उत्साह

मागील सात महिन्यापासून सुरू असलेल्या मराठा आरक्षणाच्या लढ्याला अखेर आज यश मिळाला आहे. मराठा समाजाला आरक्षण देण्याचा निर्णय राज्य सरकारच्या वतीने घेण्यात आला आहे. या निर्णयाचा आनंद हिंगोली जिल्ह्यात देखील साजरा करण्यात आला आहे. सकाळीच शहरांमध्ये दूध विक्रीसाठी घेऊन आलेल्या शेतकऱ्यांनी हे दूध मोफत वाटप करून, मराठा आरक्षण मिळाल्याचा आनंद साजरा केला आहे. गांधी चौकामध्ये फटाके फोडत मराठा समाज बांधवांच्या वतीने हा आनंद साजरा करण्यात आला आहे. एकंदरीत पाहायला गेलं तर मराठा समाजाला आरक्षण मिळाल्यानंतर मराठा समाज बांधवांच्या वतीने आनंद जल्लोष साजरा केला जात आहे. 

नांदेडमध्ये आरक्षणाच्या निर्णयाचे स्वागत

मनोज जरांगे यांच्या मागण्या मान्य करत सरकराने मराठा आरक्षणाचा मुद्दा मार्गे लावला असल्याचा दावा केला आहे. त्यानंतर राज्यभरात मराठा समाजात आनंदाचे वातावरण पाहायला मिळत आहे. नांदेड जिल्ह्यात देखील असेच आनंदाचे वातावरण दिसून येत आहे. नांदेडच्या नायगाव तालुक्यात सकल मराठा समाज बांधवांतर्फे फटाक्यांची आतिषबाजी करत जल्लोष करण्यात आला आहे. 

नाशिकच्या येवल्यात जल्लोष...

मराठा आरक्षणासाठी संघर्ष करणारे मनोज जरांगे यांनी राज्य सरकारपुढे ठेवलेल्या सर्व मागण्या मान्य केल्याने नाशिकच्या येवल्यातील विंचूर चौफुली येथे सकल मराठा समाजाच्या वतीने जल्लोष करण्यात आला. हातात भगवे ध्वज घेवून छत्रपती शिवाजी महाराज की जय,  एक मराठा लाख मराठा आदी जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. अनेक सरकार, मुख्यमंत्री झाले मात्र मराठ्यांचा आरक्षणाचा प्रश्न सोडवू शकले नाही. तो प्रश्न मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सोडवला अशी प्रतिक्रिया देत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचेही आभारही यावेळी मानण्यात आले.

लातूर जिल्ह्यात सर्वत्र जल्लोष...

मागील अनेक दिवसापासून सुरू असलेला मराठा आरक्षणाचा लढा अखेर यशस्वी झाला आहे. यानंतर लातूर जिल्ह्यातील गावागावात जल्लोष साजरा करण्यात आला. लातूर शहरात छत्रपती शिवाजी महाराज चौक, महात्मा गांधी चौक, राजीव गांधी चौक, आणि महात्मा बसवेश्वर चौकात मराठा कार्यकर्त्यांनी फटाके फोडत गुलाल उधळत जल्लोष साजरा केला आहे. गुलाबाचे फुलं उधळण करत एकमेकाला पेढे भरवत आनंद साजरा करण्यात आला. ढोल ताशाच्या तालावर तरुणाई थिरकत असल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. 

मुख्यमंत्री शिंदेंच्या नावाचा एकच जयघोष 

मराठा समाजासाठी प्राणांची बाजी लावून आंदोलन करणाऱ्या मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनाची यशस्वी सांगता झाल्यानंतर मराठा बांधवांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नावाचा एकच जयघोष केला. जरांगे पाटील यांनी केलेल्या सर्व मागण्या मान्य करत मुख्यमंत्री शिंदे यांनी आपण केवळ मतासाठी नव्हे तर समाजाच्या हितासाठी काम करत असल्याचे दाखवून दिले. त्यामुळे मराठा समाजाच्या बांधवांनी मुख्यमंत्र्यांच्या नावाचा एकच जयघोष करत त्यांचे स्वागत केले. मुख्यमंत्र्यांनीही गाडीतून बाहेर येत समाज बांधवांनी दाखवलेल्या या प्रेमाचा विनम्रपणे स्वीकार केला.

इतर महत्वाच्या बातम्या: 

ओबीसींनो घाबरून जाऊ नका, आम्ही मुंबईकडे कूच...; मराठा आरक्षणावर बबनराव तायवाडेंची प्रतिक्रिया

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

मोठी बातमी! मोदी सरकारकडून कामगारांना मिळालं मोठं गिफ्ट, किमान वेतन दरात केली वाढ 
मोठी बातमी! मोदी सरकारकडून कामगारांना मिळालं मोठं गिफ्ट, किमान वेतन दरात केली वाढ 
पुढचा आमदार मीच, सुडाचे राजकारण करणाऱ्यांना सोडणार नाही, रोहित पवारांचा राम शिंदेंवर हल्लाबोल   
पुढचा आमदार मीच, सुडाचे राजकारण करणाऱ्यांना सोडणार नाही, रोहित पवारांचा राम शिंदेंवर हल्लाबोल   
Pandharpur News : विठ्ठल भक्तांना खुशखबर , अखेर विठ्ठल-रुक्मिणीमातेच्या पूजेची 1 ऑक्टोबरपासून होणार ऑनलाईन नोंदणी 
विठ्ठल भक्तांना खुशखबर , अखेर विठ्ठल-रुक्मिणीमातेच्या पूजेची 1 ऑक्टोबरपासून होणार ऑनलाईन नोंदणी 
Devendra Fadnavis: अजित पवारांच्या मुख्यमंत्रीपदाच्या वक्तव्यावर फडणवीसांना प्रश्न, उत्तर देताना म्हणाले, 'ज्याचा एक आमदार आहे त्यालाही...'
अजित पवारांच्या मुख्यमंत्रीपदाच्या वक्तव्यावर फडणवीसांना प्रश्न, उत्तर देताना म्हणाले, 'ज्याचा एक आमदार आहे त्यालाही...'
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Zero Hour Sanjay Raut : 'तो' आरोप राऊतांना महाग पडला? दुसरी जेलवारी थोडक्यात टळली?ABP Majha Headlines : 11 PM: 26 Sept 2024 : Maharashtra News :  एबीपी माझा हेडलाईन्सDubai Sheikh Wife Bikini Special Report : पत्नीला बिकिनीत पाहण्यासाठी केला 400 कोटींचा चुराडाPune Metro Inauguration Special Report :दौरा रद्द झाला, मेट्रोचं लोकार्पण रखडलं; पुणकरांना जाम खटकलं

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
मोठी बातमी! मोदी सरकारकडून कामगारांना मिळालं मोठं गिफ्ट, किमान वेतन दरात केली वाढ 
मोठी बातमी! मोदी सरकारकडून कामगारांना मिळालं मोठं गिफ्ट, किमान वेतन दरात केली वाढ 
पुढचा आमदार मीच, सुडाचे राजकारण करणाऱ्यांना सोडणार नाही, रोहित पवारांचा राम शिंदेंवर हल्लाबोल   
पुढचा आमदार मीच, सुडाचे राजकारण करणाऱ्यांना सोडणार नाही, रोहित पवारांचा राम शिंदेंवर हल्लाबोल   
Pandharpur News : विठ्ठल भक्तांना खुशखबर , अखेर विठ्ठल-रुक्मिणीमातेच्या पूजेची 1 ऑक्टोबरपासून होणार ऑनलाईन नोंदणी 
विठ्ठल भक्तांना खुशखबर , अखेर विठ्ठल-रुक्मिणीमातेच्या पूजेची 1 ऑक्टोबरपासून होणार ऑनलाईन नोंदणी 
Devendra Fadnavis: अजित पवारांच्या मुख्यमंत्रीपदाच्या वक्तव्यावर फडणवीसांना प्रश्न, उत्तर देताना म्हणाले, 'ज्याचा एक आमदार आहे त्यालाही...'
अजित पवारांच्या मुख्यमंत्रीपदाच्या वक्तव्यावर फडणवीसांना प्रश्न, उत्तर देताना म्हणाले, 'ज्याचा एक आमदार आहे त्यालाही...'
Beed: गोदावरी नदीत पाण्याचा विसर्ग वाढला, बीडच्या राक्षसभवनात पाणी शिरले, सर्व मंदिरे पाण्याखाली
गोदावरी नदीत पाण्याचा विसर्ग वाढला, बीडच्या राक्षसभवनात पाणी शिरले, सर्व मंदिरे पाण्याखाली
Harshvardhan Patil: हर्षवर्धन पाटील तुतारी फुंकणार? सोशल मीडियात पोस्टर व्हायरल, पाटलांनी दिली सूचक प्रतिक्रिया म्हणाले, 'पितृपक्ष पंधरवडा झाल्यानंतर...'
हर्षवर्धन पाटील तुतारी फुंकणार? सोशल मीडियात पोस्टर व्हायरल, पाटलांनी दिली सूचक प्रतिक्रिया म्हणाले, 'पितृपक्ष पंधरवडा झाल्यानंतर...'
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 26 सप्टेंबर 2024 | गुरुवार 
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 26 सप्टेंबर 2024 | गुरुवार 
मनोज जरांगेंच्या उपोषणासाठी लातूरमधील जोडप्याचे टोकाचे पाऊल, विष पित आत्महत्येचा प्रयत्न
मनोज जरांगेंच्या उपोषणासाठी लातूरमधील जोडप्याचे टोकाचे पाऊल, विष पित आत्महत्येचा प्रयत्न
Embed widget