Beed: दर्गावरती शांततेचे प्रतीक असलेल्या पांढऱ्या रंगाचा ध्व्ज उभा करून केला पाडवा साजरा
Gudi Padwa 2022: गुडी पाडव्याचा गोडवा राज्यात मोठ्या उत्साहात साजरा होताना दिसत आहे. बीडमध्ये तर आजच्या दिवशी दर्गावरती शांततेचे प्रतीक असलेल्या पांढऱ्या रंगाचा ध्वज उभा करून पाडवा साजरा केला जातो.
Gudi Padwa 2022: गुडी पाडव्याचा गोडवा राज्यात मोठ्या उत्साहात साजरा होताना दिसत आहे. बीडमध्ये तर आजच्या दिवशी दर्गावरती शांततेचे प्रतीक असलेल्या पांढऱ्या रंगाचा ध्वज उभा करून पाडवा साजरा केला जातो. विशेष म्हणजे आजच्या दिवशी पंचांग पठण करून येणारे नवीन वर्ष कसे असेल याचे भाकीत वर्तवले जाते
पाडव्याला केज तालुक्यातील कळंबआंबा येथे केशर शहावली दर्गा इथे गावातील सर्व लोक एकत्र जमतात. या गावात सगळ्यांच्याच घरी अगदी आनंदात गुढी उभारली जाते. विशेष म्हणजे या गावाला पढव्या दिवशी यात्रेचच स्वरूप आलेलं असतं. कारण पाडवा सन तीन दिवस साजरा केला जातो व रात्री संदल मिरवणूक काढली जाते. यामध्ये सर्व लोक मोट्या संख्येने सहभाग घेतात. ततेच प्रतीक असलेल्या पांढऱ्या रंगाचा ध्वजाची मिरवणूक अगदी वाजत गाजत गावातून काढली जाते. मिरवणुकींनतर हा ध्वज दर्ग्यात आणला जातो व सर्व धर्माचे लोक हा ध्वज या दर्गयावर चढवतात.
एरव्ही दिवाळी सारख्या सना ला पण जे लोक आपल्या गावी येत नाहीत, ते लोक आजच्या दिवशी मात्र गावी येतातच. प्रत्येक जण आपल्या घरून मालिदयाचा प्रसाद घेऊन येतो आणि मोठया श्रद्धेने हा मलिदा मंदिरात आणि मशिदीत येऊन एकात्मतेची गोडी कायम टिकून राहावी यासाठी एकमेकांना वाटला गेला.
सगळ्यात मोठे आकर्षण असते ते म्हणजे या दर्ग्यात बसून भटजी बुवा पंचांग पठन करतात आणि हे पंचांग हिंदू आणि मुस्लिम बांधवासमोर वाचले जाते. येणारे वर्ष कसे जाणार याचे भविष्य पंचांगाच्या आधारे सांगितले जाते. या वर्षी पठण केलेल्या पंचांगानुसार या वर्षी पाऊस भरपूर पडेल. खरिपा पेक्ष्या रब्बी हंगामात चांगला पाऊस या वर्षी चांगला पाऊस असल्याचे ब्राम्हणांनी सांगितले.
इतर महत्वाच्या बातम्या:
Pandharpur : वारकऱ्यांसाठी आनंदाची बातमी! गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर विठुरायाच्या चरणावर माथा; थेट दर्शन आजपासून सुरु