एक्स्प्लोर
डॉ. दाभोलकर हत्या प्रकरण : दिवसभरात औरंगाबादमध्ये काय-काय घडलं?
औरंगाबादमध्ये छापेमारी केली असता तीन जणांना ताब्यात घेण्यात आलं. त्यांच्याकडून एक पिस्तूल, तीन जिवंत काडतुसे, एक तलवार, एक कट्यार असा शस्त्रसाठा जप्त करण्यात आला.
औरंगाबाद : डॉ. नरेंद्र दाभोलकर हत्येप्रकरणी सीबीआय आणि महाराष्ट्र दहशतवादविरोधी पथकाने (एटीएस) काल मध्यरात्री औरंगाबाद शहरात पुन्हा छापेमारी केली. त्यात तीन जणांना ताब्यात घेण्यात आलं असून त्यांच्याकडून एक पिस्तूल, तीन जिवंत काडतुसे, एक तलवार, एक कट्यार असा शस्त्रसाठा जप्त करण्यात आला.
पकडण्यात आलेले शुभम सूर्यकांत सुरळे (22), अजिंक्य शशिकांत सुरळे (24) हे शहरातील औरंगपुरा भागात राहतात. हे दोघे दाभोलकर हत्या प्रकरणातील शूटर सचिन अंदुरेचे मेहुणे आहेत. तर तिसरा आरोपी रोहित रेगे (रा. धावणी मोहल्ला) हा त्याचा मित्र आहे.
डॉ. दाभोलकर हत्येप्रकरणी सुरू असलेल्या चौकशीत एटीएसला औरंगाबादेतील आणखी तिघांबाबत माहिती मिळाली होती. त्यानुसार सीबीआय आणि एटीएसचं पथक सोमवारी रात्री औरंगाबादेत दाखल झालं. या पथकाने औरंगाबाद एटीएस आणि स्थानिक पोलिसांच्या मदतीने सातारा परिसरातील देवळाई रोडवरील मंजित प्राईड या अपार्टमेंटमधील एका फ्लॅटवर छापा मारला.
हा फ्लॅट नागमोडे यांच्या नावाने असून तेथे नचिकेत इंगळे नावाचा तरुण दोन वर्षांपासून राहत होता. त्याच्या फ्लॅटवर दडून बसलेले शुभम सुरळे, अजिंक्य सुरळे आणि रोहित रेगे हे तिघे एटीएसच्या हाती लागले.
शुभम सुरळे आणि अजिंक्य सुरळे या दोघांनीही आपला मेहुणा सचिन अंदुरेकडे असलेली शस्त्र धावणी मोहल्ल्यामध्ये राहणाऱ्या रोहित रेगेच्या घरात ठेवली होती. एटीएसच्या तपासात हे स्पष्ट झालं आहे. त्यामुळे एटीएसने शुभम सुरळे अजिंक्य सुरळे आणि रोहित रेगे यांच्याविरोधात सिटी चौक पोलीस ठाण्यात अवैधरित्या शस्त्र बाळगल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे आणि यांच्याकडे मिळून आलेले शस्त्र तपासणीसाठी सीबीआयने हस्तगत केली आहेत.
या आरोपींकडे आढळून आलेली शस्त्र दाभोलकरांच्या हत्येसाठी वापरण्यात आली का, याची शहानिशा सीबीआयकडून करण्यात येणार आहे. मात्र सध्या तरी हे तीनही आरोपी सिटी चौक पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहेत. नचिकेत इंगळे या तरुणाला एटीएसने तपासाअंती सोडून दिलं.
झाडाझडतीत काय मिळालं?
घर झाडाझडतीत मोठा शस्त्रसाठा एटीएसच्या हाती लागल्याची माहिती सूत्रांनी दिली. यात एक पिस्तूल, तीन जिवंत काडतुसे, एक तलवार, कट्यार यांचा समावेश असल्याची माहिती आहे. छापेमारी आणि झाडाझडती ही कारवाई मंगळवारी पहाटेपर्यंत सुरू होती. चौकशी पूर्ण झाल्यानंतर शुभम, अजिंक्य आणि रोहित या तिघांना औरंगाबाद एटीएसच्या कार्यालयात आणण्यात आलं. तेथेही त्यांची दिवसभर कसून चौकशी करण्यात आली.
संबंधित बातम्या :
दाभोलकर हत्या : अंदुरेच्या नातेवाईक-मित्राच्या घरातून शस्त्रसाठा जप्त
गौरी लंकेश हत्या प्रकरणातील आरोपीच्या डायरीत आणखी सहा नावं : सूत्र
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
महाराष्ट्र
बीड
महाराष्ट्र
राजकारण
Advertisement