एक्स्प्लोर
नागपुरात 1.87 कोटींची रोकड जप्त, हजार-पाचशेच्या जुन्या नोटा
नागपूर : नागपूर शहरात हिलटॉप परिसरात एका फ्लॅटमधून तब्बल 1 कोटी 87 लाख 50 हजारांची रोकड पोलिसांनी जप्त केली आहे. यामध्ये चलनातून बंद केलेल्या 500 आणि 1000 च्या नोटांचा समावेश आहे.
कारवाईत पोलिसांनी चार जणांना ताब्यात घेतलं आहे. यासंबंधी आयकर विभागाला पूर्णपणे माहिती दिली असून रकमेसंदर्भात आयकर विभाग तपास करत असल्याची माहिती पोलिसांकडून देण्यात आली आहे.
ताब्यात घेतलेल्या 4 जणांपैकी एक जण आपण चार्टर्ड अकाऊंटंट असल्याचं सांगत आहे. त्यामुळे आयकर विभाग सध्या पैशाचा स्रोत तपासून पाहत आहे.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
क्रिकेट
क्रिकेट
शेत-शिवार
राजकारण
Advertisement