एक्स्प्लोर

निवडणूक निकाल २०२४

(Source: ECI/ABP News/ABP Majha)

Waqf board: काळजीवाहू सरकारला धोरणात्मक निर्णय घ्यायचा अधिकार नसतो, वक्फ बोर्डाला 10 कोटीचा निधी दिल्यामुळे भाजप आक्रमक

Waqf board: वक्फ बोर्डाला तातडीने 10 कोटींचा निधी जाहीर करण्यात आला आहे, अल्पसंख्यांक विभागाने याबाबतचा निर्णय घेतला आहे, त्यानंतर आता चर्चा सुरू झाल्या आहेत.

मंबई: वक्फ बोर्डाला (Waqf board) तातडीने 10 कोटींचा निधी जाहीर करण्यात आला आहे, अल्पसंख्यांक विभागाने याबाबतचा निर्णय घेतला आहे. वक्फ बोर्डाला पायाभूत सुविधांसाठी तसंच बळकटीकरणासाठी 10 कोटींचा निधी देण्याचा निर्णय निवडणुकांपुर्वी राज्य सरकारने घेतला होता. काल 28 नोव्हेंबर रोजी जीआर काढण्यात आला आहे. राज्य सरकारने राज्य वक्फ बोर्डाला (Waqf board) वेगवेगळ्या पायाभूत सुविधांसाठी 10 कोटी रुपये निधी जाहीर केला आहे. अल्पसंख्यांक विभागाने याबाबतचा शासन निर्णय (GR) जारी केला आहे. त्यानंतर आता भाजप (BJP) आक्रमक झाल्याचं दिसून येत आहे. 

शासन निर्णयामध्ये दिलेल्या माहितीनुसार 2024-25 वर्षात अर्थसंकल्पीय अंदाज आणि पुरवणी मागणीद्वारे एकूण 20 कोटी एवढी तरतूद करण्यात आलेली आहे. त्यामधून 2 कोटी अनुदान वक्फ बोर्डाला वितरित करण्यात आले आहे. तर आता 10 कोटी रुपये अदा करण्यात येणार आहेत. वक्फ बोर्डाच्या बळकटीकरणासाठी हा निधी देण्यात येणार आहे. त्यानंतर आता भाजप प्रवक्ते केशव उपाध्य यांनी सोशल मिडियावर पोस्ट केली आहे. 

काय म्हटलं आहे पोस्टमध्ये?

आपल्या सोशल मिडिया पोस्टमध्ये भाजप प्रवक्ते केशव उपाध्य यांनी, 'वफ्क बोर्डाला निधी दिल्याची बातमी सध्या सुरू आहे. सध्या महाराष्ट्रात काळजीवाहू सरकार आहे व या सरकारला धोरणात्मक निर्णय घेण्याचा अधिकार नसतो. फक्त तातडीने काही आपत्कालीन निर्णय करावे लागले तरच करता येतात. निधी बाबतचा निर्णय प्रशासकीय पातळीवरून घेतला गेला असे दिसते त्यामुळं प्रशासन आपल्या निर्णयात दुरुस्ती करेल अशी आशा आहे', असं म्हटलं आहे. 

मुख्य सचिव सुजिता सौनिकांकडून जीआर मागे घेतल्याची माहिती

वक्फ बोर्डला निधी दिल्याचा एक जीआर काढण्यात आला आहे, ही प्रशासकीय पातळीवरील चूक असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. राज्यात काळजीवाहू सरकार असताना अधिकाऱ्यांना असा परस्पर आदेश काढता येत नसल्याची सूत्रांची माहिती आहे.  यावेळी कोणताही धोरणात्मक निर्णय घेता येत नाही. असे असतानाही हा आदेश प्रशासकीय पातळीवर निघाला आहे अशा चर्चा आहेत. त्यामुळे ती चूक तत्काळ दुरुस्त करण्याच्या सूचना राज्याच्या मुख्य सचिवांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिल्याची सूत्रांची माहिती आहे. वक्फ बोर्डाला निधी दिल्याचा जीआर ही प्रशासकीय चूक असल्याची माहिती आता समोर आली आहे. मुख्य सचिव सुजिता सौनिकांकडून जीआर मागे घेतल्याची एबीपी माझाला माहिती देण्यात आली आहे. राज्यात काळजीवाहू सरकार असताना अधिकाऱ्यांना असा परस्पर आदेश काढता येत नसल्याची सूत्रांची माहिती आहे. 

काळजीवाहू मुख्यमंत्री म्हणजे काय?

एका वृत्तपत्राने दिलेल्या माहितीनुसार, राज्यघटनेमध्ये ‘काळजीवाहू मुख्यमंत्री’ अशी कोणतीही तरतूद करण्यात आलेली नाही. याबाबतची कायदेशीर बाब म्हणून काळजीवाहू मुख्यमंत्री हे नियमित मुख्यमंत्री म्हणूनच काम करतात. पंरतू त्यांना कोणतेही मोठे धोरणात्मक निर्णय घेता येत नाहीत. मात्र, कोणते मोठे धोरणात्मक किंवा नियमित निर्णय आहेत? याबाबतीत कोणती निश्चित अशी लिखित कायदेशीर तरतूद नाही.

 

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Maharashtra CM : नव्या मुख्यमंत्र्यांचा शपथविधी कधी होणार? शिंदे गटाच्या नेत्याने सांगितला मुहूर्त, म्हणाले...
नव्या मुख्यमंत्र्यांचा शपथविधी कधी होणार? शिंदे गटाच्या नेत्याने सांगितला मुहूर्त, म्हणाले...
Waqf Board Grant : Waqf Board Grant : वक्फ बोर्डाला तातडीने 10 कोटींचा निधी मंजूर, अल्पसंख्याक विभागाचा मोठा निर्णय
Waqf Board Grant : वक्फ बोर्डाला तातडीने 10 कोटींचा निधी मंजूर, अल्पसंख्याक विभागाचा मोठा निर्णय
Vijay Wadettiwar : मित्र अन् राजकीय शत्रू या दोन्ही बाजूने आवडणारा नेता म्हणजे देवेंद्र फडणवीस! विजय वडेट्टीवारांकडून तोंडभरून कौतुक
मित्र अन् राजकीय शत्रू या दोन्ही बाजूने आवडणारा नेता म्हणजे देवेंद्र फडणवीस! विजय वडेट्टीवारांकडून तोंडभरून कौतुक
Sushant Singh Rajput : 'या' 9 चित्रपटांमध्ये फर्स्ट चाॅईस फक्त सुशात सिंह राजपूत होता, पण नंतर नकार हाती आला! ज्यांना संधी मिळाली त्यांचं नशीब फळफळलं!
'या' 9 चित्रपटांमध्ये फर्स्ट चाॅईस फक्त सुशात सिंह राजपूत होता, पण नंतर नकार हाती आला! ज्यांना संधी मिळाली त्यांचं नशीब फळफळलं!
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

ABP Majha Marathi News Headlines 12PM TOP Headlines 12 PM 29 November 2024 दुपारी १२ च्या हेडलाईन्स-Shilpa Shetty ED Raid : अभिनेत्री शिल्पा शेट्टींच्या घरावर ईडीचा छापा #abpमाझाABP Majha Marathi News Headlines 11AM TOP Headlines 11 AM 29 November 2024 सकाळी ११ च्या हेडलाईन्स-Sanjay Raut On Mahayuti : दिल्लीने डोळे वटारले की त्यांना शांत बसावं लागेल, राऊतांचा शिंदेंना टोला

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Maharashtra CM : नव्या मुख्यमंत्र्यांचा शपथविधी कधी होणार? शिंदे गटाच्या नेत्याने सांगितला मुहूर्त, म्हणाले...
नव्या मुख्यमंत्र्यांचा शपथविधी कधी होणार? शिंदे गटाच्या नेत्याने सांगितला मुहूर्त, म्हणाले...
Waqf Board Grant : Waqf Board Grant : वक्फ बोर्डाला तातडीने 10 कोटींचा निधी मंजूर, अल्पसंख्याक विभागाचा मोठा निर्णय
Waqf Board Grant : वक्फ बोर्डाला तातडीने 10 कोटींचा निधी मंजूर, अल्पसंख्याक विभागाचा मोठा निर्णय
Vijay Wadettiwar : मित्र अन् राजकीय शत्रू या दोन्ही बाजूने आवडणारा नेता म्हणजे देवेंद्र फडणवीस! विजय वडेट्टीवारांकडून तोंडभरून कौतुक
मित्र अन् राजकीय शत्रू या दोन्ही बाजूने आवडणारा नेता म्हणजे देवेंद्र फडणवीस! विजय वडेट्टीवारांकडून तोंडभरून कौतुक
Sushant Singh Rajput : 'या' 9 चित्रपटांमध्ये फर्स्ट चाॅईस फक्त सुशात सिंह राजपूत होता, पण नंतर नकार हाती आला! ज्यांना संधी मिळाली त्यांचं नशीब फळफळलं!
'या' 9 चित्रपटांमध्ये फर्स्ट चाॅईस फक्त सुशात सिंह राजपूत होता, पण नंतर नकार हाती आला! ज्यांना संधी मिळाली त्यांचं नशीब फळफळलं!
Sanjay Raut : एकनाथ शिंदेंकडे आता पर्याय उरलेला नाही; मावळत्या सूर्यापेक्षा उगवत्या सूर्याचं तेज अधिक असतं: संजय राऊत
एकनाथ शिंदेंकडे आता पर्याय उरलेला नाही; मावळत्या सूर्यापेक्षा उगवत्या सूर्याचं तेज अधिक असतं: संजय राऊत
Bollywood Celebrities Hair Transplants : बीग बी ते अक्षय कुमारपर्यंत! हेअर ट्रान्सप्लांट करताच या 5 बॉलिवूड सेलिब्रिटींचं आयुष्य बदलून गेलं
बीग बी ते अक्षय कुमारपर्यंत! हेअर ट्रान्सप्लांट करताच या 5 बॉलिवूड सेलिब्रिटींचं आयुष्य बदलून गेलं
Mahayuti: आधी लाडक्या बहिणींना पैशांची ओवाळणी दिली, आता सत्तेत वाटा देणार, नव्या सरकारमध्ये 4 महिला आमदारांना मंत्रिपदाची लॉटरी लागणार?
आधी लाडक्या बहिणींना पैशांची ओवाळणी दिली, आता सत्तेत वाटा देणार, नव्या सरकारमध्ये 4 महिला आमदारांना मंत्रिपदाची लॉटरी लागणार?
"असंख्य आठवणी, अंगणातली तुळस घेऊन बाहेर पडलोय..."; समृद्धी बंगला पडताना पाहून मिलिंद गवळींच्या भावना दाटल्या
Embed widget