Tanaji Sawant : शेतकरी कुटुंबात जन्म, दुसऱ्यांदा मंत्रीपदी वर्णी, तानाजी सावंतांचा राजकीय प्रवास
शेतकरी कुटुंबात जन्मलेले तानाजी सावंत (Tanaji Sawant) यांची मंत्रीमंडळात वर्णी लागली आहे. शिक्षण क्षेत्रासह साखर कारखानदारी क्षेत्रातील तानाजी सावंत हे एक मोठं नाव आहे.
Tanaji Sawant : सोलापूर जिल्ह्यातील माढा तालुक्यातील वाकाव येथील शेतकरी कुटुंबात जन्मलेले तानाजी सावंत (Tanaji Sawant) यांची मंत्रीमंडळात वर्णी लागली आहे. शिक्षण क्षेत्रासह साखर कारखानदारी क्षेत्रातील तानाजी सावंत हे एक मोठं नाव आहे. ते आज दुसऱ्यांदा मंत्रीपदाची शपथ घेणार आहेत. फडणवीस सरकारच्या काळात त्यांनी मंत्रीपदाची संधी देण्यात आली होती. त्यानंतर आता दुसऱ्यांदा ते मंत्री होत आहेत. तानाजी सावंत हे सध्या उस्मानाबाद जिल्ह्यातील भूम परांडा वाशी या विधानसभा मतदारसंघाचे आमदार आहेत. आज शिंदे सरकारचा शपथविधी सोहळा संपन्न होत आहे.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांच्या नेतृत्त्वाखालील राज्य सरकारचा आज मंत्रिमंडळ विस्तार (Cabinet Expansion) होणार आहे. थोड्याच वेळात 18 जण मंत्रीपदाची शपथ घेणार आहेत. यामध्य शिंदे गटाचे 9 तर भाजपचे 9 जणांनी संधी देण्यात आली आहे. यामध्ये शिंदे गटाकडून तानाजी सावंत यांना मंत्रीपदाची संधी देण्यात आली आहे. शिंदे गटाचे समर्थक आमदार त्यांच्या मतदारसंघांमधून मुंबईत दाखल झाले आहेत. तर भाजपचे संभाव्य मंत्रीही मुंबईत दाखल झाले आहेत. भाजप आणि शिंदे गटाचे मिळून एकूण 18 मंत्री आज शपथ घेणार आहेत. शिंदे गटाच्या 9 तर भाजपच्या 9 मंत्र्यांचा शपथविधी होणार आहे. यात एक महिला असणार आहे. त्या पार्श्वभूमीवर मुंबईसह राज्यभरात हालचालीही वाढल्या आहेत. राजभवनातील दरबार हॉल हा राखीव ठेवण्यात आला आहे.
कोण आहेत तानाजी सावंत
तानाजी सावंत हे सध्या भूम परांडा वाशी या विधासभा मतदार संघाचे आमदार आहेत.
दुसऱ्यांदा ते आमदार झाले आहेत.
पहिल्या टर्मला म्हणजे फडणवीस सरकारच्या काळात त्यांना मंत्रीपदाची संधी मिळाली होती.
मात्र, महाविकास आघाडी सरकारच्या काळात त्यांना मंत्रीपदाची संधी देण्यात आली नव्हती.
2015 मध्ये राष्ट्रवादीला सोडचिठ्ठी देत त्यांनी शिवसेनेत प्रवेश केला होता.
2016 साली शिवसेना उपनेते म्हणून नियुक्त करण्यात आले
2016 साली सावंत विधान परिषदेवर आमदार म्हणून निवडून आले होते
2017 साली उस्मानाबाद आणि सोलापूर जिल्हा शिवसेना संपर्क प्रमुख नियुक्त
तानाजी सावंत हे 2014 सालच्या सेना भाजप सरकारमध्ये जलसंधारण मंत्री झाले होते.
2019 च्या निवडणुकीत उस्मानाबाद येथील भूम परांडा मतदार संघातून विधानसभेवर निवडून आले
महाविकास आघाडीत मंत्रिपद न मिळाल्याने तानाजी सावंत हे नाराज होते
पुणे आणि सोलापुरातल्या बार्शीत तानाजी सावंत यांच्या शिक्षणसंस्था
तानाजी सावंत यांचे मूळ गाव हे सोलापूर जिल्ह्यातील माढा तालुक्यातील वाकाव हे गाव आहे.
साखर कारखानदारी क्षेत्रातील मोठं नाव म्हणून तानाजी सावंत यांच्याकडे बघितलं जातं.
शिक्षण क्षेत्रातही तानाजी सावंत यांचे नाव घेतलं जातं. पुणे जिल्ह्यात त्यांच्या जेएसपीए नावानं शिक्षणसंस्था आहे.
तानाजी सावंत हे सोलापूर जिल्ह्यातील माढा तालुक्यातील वाकाव येथील आहेत. शेतकरी कुटुंबात जन्मलेल्या सावंत यांनी शिक्षण क्षेत्रासह, राजकारण आणि कारखानदारीत आपली कारकीर्द सिद्ध केली आहे. कार्यक्षेत्र म्हणून पुण्याची निवड करत जयवंत शिक्षण प्रसारक मंडळाची स्थापना केली. उस्मानाबाद जिल्ह्यातील परांडा तालुक्यात सोनारी येथे भैरवनाथ शुगर या खासगी साखर कारखान्याची उभारणी करीत त्यांनी साखर उद्योगात पाऊल ठेवले. सध्या भैरवनाथ शुगर कारखान्याचे सोलापूर व उस्मानाबाद जिल्ह्यात पाच युनिट कार्यान्वित आहेत.
महत्त्वाच्या बातम्या: