एक्स्प्लोर

एकनाथ खडसेंच्या परतीचे दरवाजे बंद?

सरकारच्या न्यायाधीश झोटिंग समितीचा अहवाल निरर्थक असल्याचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट केलं आहे.

नागपूर : भोसरी एमआयडीसीतील जमीन खरेदी प्रकरणी माजी महसूल मंत्री एकनाथ खडसे यांच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता आहे. सरकारच्या न्यायाधीश झोटिंग समितीचा अहवाल निरर्थक असल्याचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट केलं आहे. त्यामुळे एकनाथ खडसे यांचं मंत्रिमंडळात परतण्याचे दरवाजे बंद झाले आहेत. याप्रकरणी न्यायालयाने गुन्हा दखल करण्याचे आदेश दिले असल्याची माहिती मुख्यमंत्र्यांनी दिली. माजी महसूल मंत्री एकनाथ खडसे यांच्यावर पुणे भोसरी येथील MIDC ची जमीन घेतल्याचा आरोप झाला. या आरोपामुळे त्यांना राजीनामा द्यावा लागला. या प्रकरणी मुख्यमंत्र्यांनी न्यायाधीश दिनकर झोटिंग यांची समिती नेमली. या समितीने यावर्षी जुलै महिन्यात मुख्यमंत्र्यांना अहवाल सादर केला. पण या अहवालात पुढे काय झालं, याची विचारणा एकनाथ खडसे यांच्यासह विरोध पक्षातील नेतेही करत होते. मुख्यमंत्र्यांनी अखेर झोटिंग समितीचा अहवाल निरर्थक असल्याचं विधानसभेत सांगितलं. कारण या जमिनीप्रकरणी मुंबई हायकोर्टाने आधीच गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिले आहेत. लाचलुचपत विभाग याप्रकरणी तपास करत असल्याची माहिती मुख्यमंत्र्यांनी दिली. त्यामुळेच झोटिंग समितीचा अहवाल निरर्थक असल्याचं सांगत, या अहवालामुळे स्वतःवर येणारी जबाबदारी झटकण्यात मुख्यमंत्री यशस्वी ठरले. खडसे यांच्यावर झोटिंग समितीच्या अहवालानुसार कारवाई करावी लागली असती तर एकनाथ खडसे यांचा अजून रोष मुख्यमंत्र्यांवर ओढवला असता. पण याप्रकरणी कोर्टानेच आदेश दिल्यामुळे पुढील कारवाई होत असल्याचं मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केलं. यामुळे यापुढे होणाऱ्या मंत्रिमंडळात तरी परत येण्याचे एकनाथ खडसे यांचे दरवाजे बंद झाले. झोटिंग समितीने जुलै महिन्यात अहवाल देऊनही या अहवालावर मुख्यमंत्र्यांनी मौन बाळगलं होतं. समितीने एकनाथ खडसे यांच्यावर ठपका ठेवून कारवाई करायला सांगितलं असेल तर ते मुख्यमंत्र्यांसाठी अडचणीचं ठरलं असतं. पण हायकोर्टानेच खडसेंवर गुन्हा दाखल करायला सांगितल्याने मुख्यमंत्र्यांची यातून सुटका झाली. लाचलुचपत विभाग त्यांच्या स्तरावर कारवाई करणार असल्यामुळे या प्रकरणातून एकनाथ खडसे यांची लवकर सुटका शक्य नाही. त्यामुळेच मंत्रिमंडळात त्यांचे परतीचे दरवाजे आता बंद झाले असेच म्हणावं लागेल. झोटिंग समिती नेमल्यानंतर कुठे तरी परतीची आस लावून बसलेल्या एकनाथ खडसे यांचं भविष्य आता लाचलुचपत विभाग या प्रकरणात पुढे काय कारवाई करते, यावरच अवलंबून असेल. भोसरी जमीन खरेदी प्रकरण काय आहे? भोसरी एमआयडीसीमधील सर्व्हे नंबर 52 मधील तीन एकर जागेचा हा वाद आहे. ही जमीन खडसेंच्या पत्नी मंदाकिनी खडसे आणि जावई गिरीष चौधरी यांनी अब्बास उकानी या व्यक्तीकडून तीन कोटी 75 लाख रुपयांना खरेदी केली. पुण्यातील उपनिबंधक कार्यालयात या व्यवहाराची नोंद करून स्टँप ड्युटी म्हणून एक कोटी 37 लाख रुपये देखील भरण्यात आले. पण ही जमीन एमआयडीसीच्या मालकीची असल्याचं उघड झालं. महसूलमंत्री असताना खडसेंनी भोसरीत केलेल्या खरेदीत गैरव्यवहार झाल्याचा आरोप करण्यात आले. त्यानंतर याप्रकरणाच्या चौकशीसाठी निवृत्त न्यायाधीश झोटिंग यांच्या एक सदस्यीय समितीची स्थापना करण्यात आली होती.

संबंधित बातम्या :

खडसेंच्या चौकशीसाठी नेमलेल्या झोटिंग समितीवर 45 लाख रुपये खर्च!

भोसरी जमीन खरेदी प्रकरण, खडसेंची झोटिंग समितीसमोर हजेरी

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

Pune Exit Poll: पुण्यात अजित पवारांना 'दे धक्का', महापालिकेत भाजपची सत्ता? प्राबच्या एक्झिट पोलनुसार कोणाला किती जागा?
पुण्यात अजित पवारांना 'दे धक्का', महापालिकेत भाजपची सत्ता? प्राबच्या एक्झिट पोलनुसार कोणाला किती जागा?
समुद्र सीमेवर भारताच्या हद्दीत पाकिस्तानची अल मदीना बोट, 9 जण ताब्यात; सुरक्षा यंत्रणा अलर्ट
समुद्र सीमेवर भारताच्या हद्दीत पाकिस्तानची अल मदीना बोट, 9 जण ताब्यात; सुरक्षा यंत्रणा अलर्ट
मतदान केंद्रावर कोब्रा सापाचा थरार; पोलीस धावला, मतदारांच्या भुवया उंचावल्या, गर्दीतून सुखरूप पकडला
मतदान केंद्रावर कोब्रा सापाचा थरार; पोलीस धावला, मतदारांच्या भुवया उंचावल्या, गर्दीतून सुखरूप पकडला
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 15 जानेवारी 2026 | गुरुवार 
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 15 जानेवारी 2026 | गुरुवार 

व्हिडीओ

BMC Election Exit Poll : मुंबईत भाजप आणि शिवसेनेला 138 जागा मिळणार- एक्झिट पोलचा अंदाज
Uddhav Thackeray Full PC : बाईचं नाव रविंद्र असतं का? लोकशाही पुसली जातेय; मतदानानंतर ठाकरेंचा घणाघात
Akola Voting : अकोल्यात बुरखाधारी महिलांची तपासणी न करता सोडलं जातंय
Election Commission PC :पाडू यंत्र हे 2004 पासून हे यंत्र आम्ही नवीन आणलेलं नाही, आयोगाचं स्पष्टीकरण
Geeta Gawali Mumbai : अरुण गवळीची लेक निवडणुकीच्या रिंगणात, गीता गवळींनी व्यक्त केला विजयाचा विश्वास

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Pune Exit Poll: पुण्यात अजित पवारांना 'दे धक्का', महापालिकेत भाजपची सत्ता? प्राबच्या एक्झिट पोलनुसार कोणाला किती जागा?
पुण्यात अजित पवारांना 'दे धक्का', महापालिकेत भाजपची सत्ता? प्राबच्या एक्झिट पोलनुसार कोणाला किती जागा?
समुद्र सीमेवर भारताच्या हद्दीत पाकिस्तानची अल मदीना बोट, 9 जण ताब्यात; सुरक्षा यंत्रणा अलर्ट
समुद्र सीमेवर भारताच्या हद्दीत पाकिस्तानची अल मदीना बोट, 9 जण ताब्यात; सुरक्षा यंत्रणा अलर्ट
मतदान केंद्रावर कोब्रा सापाचा थरार; पोलीस धावला, मतदारांच्या भुवया उंचावल्या, गर्दीतून सुखरूप पकडला
मतदान केंद्रावर कोब्रा सापाचा थरार; पोलीस धावला, मतदारांच्या भुवया उंचावल्या, गर्दीतून सुखरूप पकडला
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 15 जानेवारी 2026 | गुरुवार 
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 15 जानेवारी 2026 | गुरुवार 
BMC Election 2026: थेट निवडणूक अधिकाऱ्यांकडून मतदान केंद्रावर मतदारांची नावे शोधण्यासाठी चक्क भाजपच्या अॅपचा वापर! ठाकरे गटाच्या नेत्याचा व्हिडिओ बाॅम्ब
Video: थेट निवडणूक अधिकाऱ्यांकडून मतदान केंद्रावर मतदारांची नावे शोधण्यासाठी चक्क भाजपच्या अॅपचा वापर! ठाकरे गटाच्या नेत्याचा व्हिडिओ बाॅम्ब
मुंबईत 41 टक्के, कोल्हापुरी, मतदानात सर्वात भारी; राज्यातील 29 महापालिकांमध्ये कुठं, किती टक्के मतदान?
मुंबईत 41 टक्के, कोल्हापुरी, मतदानात सर्वात भारी; राज्यातील 29 महापालिकांमध्ये कुठं, किती टक्के मतदान?
Kolhapur Municipal Corporation Election: राज्यात दुपारी साडे तीनपर्यंत कोल्हापुरात उच्चांकी मतदान; 'या' दोन प्रभागात सर्वात चुरशीने मतदान!
राज्यात दुपारी साडे तीनपर्यंत कोल्हापुरात उच्चांकी मतदान; 'या' दोन प्रभागात सर्वात चुरशीने मतदान!
BMC Election : बोगस मतदानाची एक तक्रार, शाई पुसून व्हिडीओ केल्यास कारवाई करणार; निवडणूक आयोगाचा इशारा
बोगस मतदानाची एक तक्रार, शाई पुसून व्हिडीओ केल्यास कारवाई करणार; निवडणूक आयोगाचा इशारा
Embed widget