एक्स्प्लोर
कोल्हापुरात मोहरमच्या मिरवणुकीत बस घुसली, ब्रेक फेल झाल्याने अपघात
केएमटीच्या म्हणजेच कोल्हापूर महापालिकेच्या बसचा ब्रेक निकामी झाल्यानं ही दुर्घटना घडली.

कोल्हापूर : मोहरमच्या मिरवणुकीत कोल्हापूर महानगर पालिकेच्या वाहतूक सेवेची बस घुसल्यानं दोन जणांचा मृत्यू झाला, तर 8 जण जखमी झाले आहेत. केएमटीच्या म्हणजेच कोल्हापूर महापालिकेच्या बसचा ब्रेक निकामी झाल्यानं ही दुर्घटना घडली. या दुर्घटनेनंतर तणाव निर्माण झाला असून संतप्त जमावानं 3 बसेसची तोडफोड केली. काही जणांनी बस पेटवण्याचा देखील प्रयत्न केला. पापाची तिकटी परिसरात ही घटना घडली असून सध्या पोलीस घटनास्थळी दाखल झाले आहेत.
आणखी वाचा























