Exclusive : जगप्रसिद्ध लोणार सरोवराच्या पाणी पातळीत वाढ, प्राचीन मंदिरांसह जैव विविधता धोक्यात
Buldhana Lonar Lake : नैसर्गिक उल्कापातामुळे निर्माण झालेल्या आशिया खंडातील सर्वात मोठ्या अशा खाऱ्या पाण्याचे सरोवर असलेल्या लोणार सरोवराची (Buldhana Lonar Lake) पाण्याची पातळी 2.69 मीटरने वाढली आहे.
Buldhana Lonar Lake : नैसर्गिक उल्कापातामुळे निर्माण झालेल्या आशिया खंडातील सर्वात मोठ्या अशा खाऱ्या पाण्याचे सरोवर असलेल्या लोणार सरोवराची (Buldhana Lonar Lake) पाण्याची पातळी 2.69 मीटरने वाढली आहे. त्यामुळे लोणार सरोवरात असलेल्या प्राचीन मंदिर आणि जैवविविधतेला धोका निर्माण झाला आहे. अचानक गेल्या तीन ते चार वर्षात सातत्याने पाण्याच्या पातळीत वाढ होत असल्याने लोणार सरोवराच्या अभ्यासकांनाही चिंतेत टाकलं आहे.
उल्कापातामुळे निर्माण झालेल्या लोणार सरोवराच्या जल पातळीत गेल्या दोन वर्षात2.69 मीटरने वाढ झाली आहे. त्यामुळे लोनार सरोवर काठावरील असलेल्या दहाव्या आणि बाराव्या शतकातील बगीच्या महादेव मंदिर, अंबरखाना महादेव मंदिर, मोर महादेव मंदिर पाण्याखाली गेली आहेत. तर कमळजा मातेचे असलेले प्रसिद्ध मंदिर तिन्ही बाजूने पाण्याने वेढलं गेलं आहे. यापूर्वी सरोवराच्या जल पातळीत वाढ कमी होती. वर्तमान स्थिती ती कमी न होता वाढत असल्याने सरोवरात असलेली जैवविविधता ही धोक्यात आली आहे आणि त्यामुळे हा संशोधनाचा व चिंतेचा विषय झाला आहे.
लोणार सरोवरातील जैवविविधता धोक्यात -
लोणार सरोवर परिसरात अनेक विकास कामे झाली तर रस्त्याची ही बांधकामे मोठ्या प्रमाणात झाली. तसेच लोणार तालुक्यात जलसंधारणाची कामे झाली आणि त्यामुळे पाणी हे साठवून लोणार सरोवरातील झरे हे प्रभावीत झाले त्यामुळे लोणार सरोवराच्या पाणी पातळीत वाढ होत आहे. तर लोणार सरोवराचे पाणी हे अल्कधर्मी असल्याने आता पाण्याच्या गुणधर्मातही बदल होत असल्याने लोणार सरोवरातील जैवविविधता ही धोक्यात आली असल्याचं लोणार सरोवराचे अभ्यासक सचिन कापुरे यांनी सांगितलं आहे.
स्थानिकांची चिंता वाढली -
लोणार सरोवराच्या पाण्याच्या पातळीत वाढ होत असल्याने या सरोवराच्या काठावर असलेल्या अनेक मंदिरात पाणी घुसल आहे तर अनेक मंदिरे हे पाण्याखाली गेली आहे त्यामुळे या प्राचीन मंदिरे व त्यांचा अस्तित्व धोक्यात आलं असल्याचंही स्थानिकांचे म्हणणे आहे.उल्कापातामुळे निर्माण झालेलं लोणार सरोवर हे आशिया खंडातील सर्वात मोठे सरोवर आहे तर जगातील दोन नंबरचा खाऱ्या पाण्याचे सरोवर आहे. या सरोवर परिसरात अनेक विकास कामे झाली तर जलसंधारणाची ही कामे झाली आहेत. त्यामुळे या सरोवरातील झरे प्रवाहित झाले आणि त्यामुळे पाण्याची पातळी वाढत असल्यामुळे लोणार सरोवराची जैवविविधता ही मोठ्या प्रमाणात धोक्यात आली आहे. त्यामुळे आता अभ्यासकांनाही चिंता वाटू लागली आहे.