एक्स्प्लोर

Buldhana Accident : ड्रायव्हरला झोप आल्याने बुलढाणा बस अपघात? रोड हिप्नॉसिस म्हणजे नेमकं काय?

Buldhana Bus Accident : बुलढाण्यातील भीषण बस अपघात ड्रायव्हरला थकवा किंवा झोप आल्यामुळे झाल्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे. याचं नेमकं कारण काय?

Road Hypnosis : बुलढाण्यामध्ये झालेल्या भीषण अपघातानंतर सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे. समृद्धी महामार्गावरील (Samruddhi Mahamarg) बुलढाणा येथे बसचा अपघात होऊन 25 प्रवाशांचा होरपळून मृत्यू झाला आहे. नागपूरहून (Nagpur News) पुण्याला (Pune News) जाणाऱ्या खासगी बसचा मध्यरात्री अपघात घडला. हा अपघात नेमका कसा झाला, याबाबत सध्या तपास सुरु आहे. बस अपघाताच्या कारणाबाबत वेगवेगळ्या शक्यता समोर येत आहे. टायर फुटल्यामुळे बस अपघात झाल्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे. तसेच, बसचा अपघात ड्रायव्हरला झोप आल्यामुळे झाला असल्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे.  

बुलढाणा बस अपघाताचं नेमकं कारण काय?

बुलढाणा बस अपघात ड्रायव्हरच्या चुकीमुळे किंवा ड्रायव्हरला झोप लागल्यामुळे झाला असण्याचाही एक शक्यता वर्तवली जात आहे. हा अपघात ड्रायव्हरचा गाडीवरचा ताबा सुटल्याने झाला की ड्रायव्हरला आलेल्या मानसिक आणि शारीरिक थकव्यामुळे झाला हे अद्याप स्पष्ट झालेलं नाही. पण या घटनेनंतर रोड हिप्नॉसिसची (Road Hypnosis) चर्चा सुरू झाली आहे. रोड हिप्नॉसिस म्हणजे नेमकं काय जाणून घ्या.

रोड हिप्नॉसिस म्हणजे काय?

  • रोड हिप्नॉसिस म्हणजेच रस्ता संमोहन. रोड हिप्नॉसिस ही एक शारीरिक स्थिती आहे, यावेळी बहुतेक ड्रायव्हर्सना लक्षात येत नाही किंवा त्यांना माहिती नसते की, आपल्यासोबत काय घडतंय.
  • रोड हिप्नोसिस रस्त्यावर उतरल्यानंतर सुमारे अडीच तासांनी सुरू होते, संमोहित चालकाचे डोळे उघडे असतात. संमोहनाच्या स्थिती असल्यामुळे डोळ्यांनी जे पाहतो त्याचं मेंदू विश्लेषण करु शकत नाही.
  • रोड हिप्नोसिस हे अनेक वेळा अपघात होण्यामागचं पहिलं कारण मानलं जातं.
  • रोड हिप्नोसिस असलेल्या ड्रायव्हरला टक्कर होईपर्यंत शेवटच्या 15 मिनिटांत काहीही आठवत नाही. आपण किती किमी वेगाने जात आहोत किंवा आपल्या समोरच्या वाहनाचा वेग हे ड्रायव्हरच्या लक्षात येत नाही. अशा स्थितीत सहसा लांबच्या प्रवासादरम्यान घडतात.
  • ड्रायव्हर यामागचं कारण सांगू किंवा घटनेचं विश्लेषण करू शकत नाही.
  • रोड हिप्नॉसिसचं हे लांब प्रवासादरम्यान मोकळ्या रस्त्यांवर घडते. वळण नसलेला रस्ता आणि वाहनांची वर्दळ नसलेल्या रस्त्यावर ही शक्यता जास्त असते. 
  • रोड हिप्नोसिसपासून स्वतःला वाचवण्यासाठी, वाहन चालवताना दर दोन ते तीन तासांनी थांबणे, चालणे, चहा किंवा कॉफी पिणे आवश्यक आहे. यामुळे तुमचं मन फ्रेश राहील.
  • लांब रस्त्यावर रोड संमोहनपूर्वी काही काळ चलचित्र बघितल्यासारखं वाटतं आणि चालक फक्त समोर पाहत राहतो. त्याला आपल्या समोर काय घडतंय, हे चालकाला कळत नाही.
  • वाहन चालवताना काही ठिकाणे आणि इतर वाहनांवर लक्षात ठेवणे आवश्यक आहे.
  • जर तुम्हाला शेवटच्या 15 मिनिटांत काहीही आठवत नसेल, तर याचा अर्थ तुम्ही स्वत:ला आणि प्रवाशांना मृत्यूकडे नेत आहात. अशा वेळी गाडी थांबवा.
  • रोड हिप्नोसिस म्हणजेच रोड संमोहन रात्रीच्या वेळी जास्त घडते. यावेळी इतर प्रवासी देखील झोपलेले असल्यास, त्यामुळे परिस्थिती खूप गंभीर होते.
  • अशा वेळी चालकाने थांबावे, विश्रांती घ्यावी, दर 2.5 तासांनी 5-6 मिनिटे चालावे.
  • जर तुम्ही गाडी चालवताना मधेच ब्ल्ँक होत असाल तर तुमचा प्रवास लगेचच थांबवा. क्षणभर गाडी बाजूला घेऊन दीर्घ श्वास घ्या आणि फ्रेश होऊन नंतर पुन्हा उत्साहात प्रवास सुरू करा.

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Election Voting: राज्यात सर्वाधिक मतदान कोल्हापूर जिल्ह्यातील 'या' मतदारसंघात, तर सर्वात कमी कुठे?
राज्यात सर्वाधिक मतदान कोल्हापूर जिल्ह्यातील 'या' मतदारसंघात, तर सर्वात कमी कुठे?
Cyber Crime Awareness : सावधान... अनोळखी क्रमांकावरुन लग्नपत्रिका आल्यास आर्थिक नुकसान होऊ शकतं, तज्त्रांनी दिला सतर्कतेचा इशारा
अनोळखी क्रमांकावरुन लग्नपत्रिका आल्यास आर्थिक नुकसान होऊ शकतं, तज्त्रांनी दिला सतर्कतेचा इशारा
BJP Exit Poll: भाजपच्या बुथ एक्झिट पोलमध्ये अजित पवारांना सर्वात कमी जागा, काँग्रेसला किती?; काय सांगते आकडेवारी
भाजपच्या बुथ एक्झिट पोलमध्ये अजित पवारांना सर्वात कमी जागा, काँग्रेसला किती?; काय सांगते आकडेवारी
Maharashtra Election Exit Poll 2024:  कोण होणार महाराष्ट्राचा मुख्यमंत्री? Axis My India च्या एक्झिट पोलमधून जनतेचा कौल समोर
कोण होणार महाराष्ट्राचा मुख्यमंत्री? Axis My India च्या एक्झिट पोलमधून जनतेचा कौल समोर
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Rajkiya Sholay : एक्झिट पोल आऊट, मुख्यमंत्रिपदावरुन रस्सीखेच? जनतेची पसंती नेत्यांची कुस्तीSpecial Report Maharashtra Politics : मुख्यमंत्रीपदावरुन रस्सीखेच, मविआत वादाची ठिणगीSpecial Report Gautam Adani : अदानींच्या शेअर्समध्ये 20 टक्क्यांची घसरण, वाद काय?Maharashtra Assembly Election Poll : मतदानाचा टक्का वाढला, कोणाचा विजय पक्का

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Election Voting: राज्यात सर्वाधिक मतदान कोल्हापूर जिल्ह्यातील 'या' मतदारसंघात, तर सर्वात कमी कुठे?
राज्यात सर्वाधिक मतदान कोल्हापूर जिल्ह्यातील 'या' मतदारसंघात, तर सर्वात कमी कुठे?
Cyber Crime Awareness : सावधान... अनोळखी क्रमांकावरुन लग्नपत्रिका आल्यास आर्थिक नुकसान होऊ शकतं, तज्त्रांनी दिला सतर्कतेचा इशारा
अनोळखी क्रमांकावरुन लग्नपत्रिका आल्यास आर्थिक नुकसान होऊ शकतं, तज्त्रांनी दिला सतर्कतेचा इशारा
BJP Exit Poll: भाजपच्या बुथ एक्झिट पोलमध्ये अजित पवारांना सर्वात कमी जागा, काँग्रेसला किती?; काय सांगते आकडेवारी
भाजपच्या बुथ एक्झिट पोलमध्ये अजित पवारांना सर्वात कमी जागा, काँग्रेसला किती?; काय सांगते आकडेवारी
Maharashtra Election Exit Poll 2024:  कोण होणार महाराष्ट्राचा मुख्यमंत्री? Axis My India च्या एक्झिट पोलमधून जनतेचा कौल समोर
कोण होणार महाराष्ट्राचा मुख्यमंत्री? Axis My India च्या एक्झिट पोलमधून जनतेचा कौल समोर
Vidhansabha Exit Poll Result : एक्सिस माय इंडियाचा एक्झिट पोल समोर, मुख्यमंत्रीपदासाठी एकनाथ शिंदेंना पसंती, फडणवीसांचा कितवा नंबर?
एक्सिस माय इंडियाचा एक्झिट पोल समोर, मुख्यमंत्रीपदासाठी एकनाथ शिंदेंना पसंती, फडणवीसांचा कितवा नंबर?
Rajesh Kshirsagar : माझ्यावर दोन वेळा जीवघेणा हल्ल्याचा प्रयत्न झाला,क्षीरसागरांचा मोठा आरोप
Rajesh Kshirsagar : माझ्यावर दोन वेळा जीवघेणा हल्ल्याचा प्रयत्न झाला,क्षीरसागरांचा मोठा आरोप
अपक्षांचं मार्केट वाढलं! माढा, करमाळा आणि सांगोल्यावर विशेष लक्ष, निकालाआधीच महायुतीसह महाविकास आघाडीच्या नेत्यांचे फोन
अपक्षांचं मार्केट वाढलं! माढा, करमाळा आणि सांगोल्यावर विशेष लक्ष, निकालाआधीच महायुतीसह महाविकास आघाडीच्या नेत्यांचे फोन
मुंबई मराठी पत्रकार संघाकडून अटीतटीचा अंदाज, महायुतीला 140 जागा, अपक्षांची कामगिरीच मुख्यमंत्री ठरवणार
मुंबई मराठी पत्रकार संघाकडून अटीतटीचा अंदाज, महायुतीला 140 जागा, अपक्षांची कामगिरीच मुख्यमंत्री ठरवणार
Embed widget