एक्स्प्लोर
बुलडाण्यात वर्गात घुसून विद्यार्थ्याच्या पालकांची शिक्षकाला मारहाण
आपल्या मुलाला कडक शब्दात समज दिल्याच्या रागातून विद्यार्थ्याच्या पालकांनी शिक्षकाला मारहाण केल्याचा आरोप आहे.

बुलडाणा : शाळेच्या वर्गात घुसून विद्यार्थ्याच्या पालकांनी शिक्षकाला लाथा-बुक्क्यांनी मारहाण केल्याचा प्रकार समोर आला आहे. बुलडाण्यातील चिखलीमधल्या तक्षशीला विद्यालयात ही घटना घडली. आपल्या मुलाला कडक शब्दात समज दिल्याच्या रागातून पालकांनी मारहाण केल्याचा आरोप आहे. विद्यार्थ्याचे आरोपी वडील आणि एका साथीदाराला पोलिसांनी अटक केली आहे.
जेवणाचे सुटीमध्ये दहावीच्या वर्गातील विद्यार्थ्याचं सातवीतील विद्यार्थ्याशी भांडण झालं. याचा राग मनात ठेवून सातवीच्या विद्यार्थ्याने शाळेबाहेरील चार ते पाच मुलं आणली दहावीतील विद्यार्थ्याला लाथाबुक्क्यांनी मारहाण केली.
याची तक्रार पीडित विद्यार्थ्याने स्टाफ रुममध्ये जाऊन वळसे यांच्याकडे केली. तेव्हा शिक्षकांनी सातवीतील विद्यार्थ्याला बोलावून घेतलं आणि त्यास कडक शब्दात समज दिली. पुन्हा असं न करण्याबाबतही वळसेंनी बजावलं.
शिक्षकाने ओरडल्याचा राग मनात धरुन विद्यार्थ्याने आपल्या वडिलांना ही गोष्ट सांगितली. शिक्षकाने आपल्यावर हात उगारल्याचं खोटंही त्याने सांगितलं.
दुपारी सुनील वळसे दहावीच्या वर्गामध्ये इंग्रजी विषयाचा तास घेत असताना संबंधित विद्यार्थ्याचे वडील चार ते पाच जणांना घेऊन शाळेत शिरले. वर्गात जाऊन सुनील वळसे यांना 'हमारे बच्चे को क्यू मारा?' असा जाब विचारत त्यांनी लाथा-बुक्यांनी मारहाण करायला सुरुवात केली.
वर्गातील गोंधळ एकूण शेजारील वर्गातील शिक्षक भांडण सोडवायला आले. त्यावेळी आरोपींनी सर्वांना जीवे मारण्याची धमकी दिली. हा संपूर्ण प्रकार अचानक सुरु असताना वर्गातील विद्यार्थीही घाबरुन सैरावैरा वर्गाबाहेर पळाले. ही संपूर्ण घटना वर्गातील सीसीटीव्हीमध्ये कैद झाली आहे.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
करमणूक
महाराष्ट्र
करमणूक
व्यापार-उद्योग
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
