Maha Budget 2021 : बसस्थानकांचे आधुनिकीकरण होणार, विमानतळांच्या विकासासाठीही मोठ्या घोषणा
Budget 2021 : आज महाविकास आघाडी सरकारचा दुसरा अर्थसंकल्प राज्याचे अर्थमंत्री अजित पवार यांनी मांडला. यात भरीव निधी आणि योजनांची घोषणा अर्थमंत्री अजित पवार यांनी केली आहे. यात त्यांनी परिवहन सेवांसाठी देखील काही महत्वाच्या घोषणा केल्या.
Budget 2021 : आज महाविकास आघाडी सरकारचा दुसरा अर्थसंकल्प राज्याचे अर्थमंत्री अजित पवार यांनी मांडला. यात भरीव निधी आणि योजनांची घोषणा अर्थमंत्री अजित पवार यांनी केली आहे. यात त्यांनी परिवहन सेवांसाठी देखील काही महत्वाच्या घोषणा केल्या. परिवहन विभागास एकूण 2 हजार 570 कोटी रुपयांची तरतूद केली आहे. तर काही विमानतळांच्या विकासासाठी देखील महत्वाच्या घोषणा केल्या आहेत.
एसटी महामंडळासाठी काय राज्य परिवहन महामंडळाच्या डिझेलवर चालणाऱ्या जुन्या बसेसचे पर्यावरणपूरक सीएनजी व विद्युत बसेसमध्ये रूपांतर करण्याचे शासनाने ठरविले आहे. शिवाय बसस्थानकांचे आधुनिकीकरणाचे कामही हाती घेण्यात येत आहे. त्यासाठी 1 हजार 400 कोटी रुपयांचा नियतव्यय उपलब्ध करुन देण्याचे प्रस्तावित आहे.सन 2021-22 या वर्षासाठी कार्यक्रम खर्चाकरिता परिवहन विभागास एकूण 2 हजार 570 कोटी रुपये नियतव्यय प्रस्तावित आहे.
ग्रामीण तालुक्यातील विद्यार्थिनींना बसने मोफत प्रवास राज्यव्यापी योजना, क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले नावाने योजना, 1500 हायब्रीड बस उपलब्ध करून देणार, मोठ्या शहरात तेजस्विनी योजनेत अधिक बस उपलब्ध करून देणार असल्याचं अजित पवार म्हणाले.
पुणे नाशिक रेल्वे प्रकल्प- पुणे-नाशिक या मध्यम अतिजलद रेल्वे मार्गाचे काम हाती घेण्यास महाविकास आघाडी शासनाने नुकतीच मान्यता दिली. या रेल्वेमार्गाची प्रस्तावित लांबी 235 किलोमीटर असून मार्गावर पुणे, अहमदनगर व नाशिक जिल्ह्यात एकूण 24 स्थानके प्रस्तावित आहेत. या मध्यम अतिजलद रेल्वेची गती 200 किलोमीटर प्रतितास एवढी असणार आहे. प्रकल्पाचा अपेक्षित खर्च 16 हजार 39 कोटी रुपये इतका राहील.
राज्यातील मेट्रो प्रकल्प नागपूर शहर, वर्धा, रामटेक, भंडारा रोड व नरखेड ही शहरे नागपूर मेट्रो मार्गाला जोडण्यासाठी वातानुकुलित ब्रॉडगेज मेट्रो ट्रेन हा 269 किलोमीटर लांबीचा प्रकल्प, नाशिक शहरामध्ये 33 किलोमीटर लांबीचा 2 हजार 100 कोटी रुपये किंमतीचा “नाशिक मेट्रो निओ प्रकल्प”, ठाणे शहरांतर्गत मेट्रोलाईट प्रणालीवर आधारीत 7 हजार165 कोटी खर्चाचा वर्तुळाकार मेट्रो प्रकल्प तसेच पिंपरी चिंचवड ते निगडी कॉरीडॉर क्रमांक 1 हा 946 कोटी 73 लाख रुपये किंमतीचा प्रकल्प, हे मेट्रो प्रकल्प हाती घेण्यात आले आहेत. याशिवाय राज्यात अहमदनगर-बीड-परळी, वर्धा-यवतमाळ-नांदेड व नागपूर येथील इतवारी ते नागभीड या रेल्वे मार्गांची कामे वेगाने सुरू आहेत.
Maharashtra Budget 2021 : रडगाणं न गाता सर्व घटकांना दिलासा देणारा अर्थसंकल्प : मुख्यमंत्री
विमान वाहतूक क्षेत्र- शिर्डी विमानतळावरील नवीन हवाई वाहतूक नियंत्रण मनोरा, रात्रीच्या उड्डाणाची सुविधा तसेच प्रवासी सेवांची कामे सुरू आहेत.
- अमरावती जिल्ह्यातील बेलोरा येथील विमानतळाच्या धावपट्टीचा विस्तार, नवीन टर्मिनल बिल्डींग तसेच रात्रीच्या विमानवाहतूकीची सुविधा उपलब्ध करुन देण्याची कामे प्रगतीपथावर आहेत.
- सोलापूर शहराजवळ बोरामणी येथे ग्रिनफिल्ड विमानतळ विकसित करण्यास आम्ही कटीबध्द आहोत. या विमानतळासाठी भूसंपादनाची प्रक्रिया अंतिम टप्प्यात आहे.
- सिंधुदुर्ग जिल्ह्यातील चिपी विमानतळावर विमानसेवा सुरु करण्याची बाब अखेरच्या टप्प्यात आहे.
- पुणे येथील नवीन आंतरराष्ट्रीय विमानतळ उभारण्यास शासनाने प्रशासकीय व वित्तीय मान्यता दिली आहे. या कामाचा तांत्रिक व आर्थिक सुसाध्यता अहवाल तयार करण्याचे काम प्रगतीपथावर आहे.
- शिवणी,अकोला येथे मोठया विमानांच्या उड्डाणासाठी धावपट्टी वाढविणे व इतर कामांसाठी भूसंपादनाची कार्यवाही सुरू आहे.
- उजळाईवाडी, कोल्हापूर येथील विमानतळाच्या धावपट्टी विस्तारीकरणाचे तसेच रात्रीच्या उड्डाणासाठीची कामेही प्रगतीपथावर आहेत.
महत्त्वाच्या इतर बातम्या :
- Maharashtra Budget 2021 LIVE: अर्थसंकल्पात कोरोना संकटात आरोग्य विभागासाठी मोठी तरतूद
- Maha Budget 2021, Health: आरोग्य सेवांसाठी 7 हजार 500 कोटी रुपयांची तरतूद : अजित पवार
- Maha Budget 2021 Agriculture | तीन लाखांपर्यंतच्या कर्जाची वेळेत परतफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना नवीन कर्ज शून्य टक्क्याने, अर्थसंकल्पात घोषणा