Breaking News LIVE : महाराष्ट्रात आजपर्यंत 116 टक्के पाऊस, सरासरीच्या 1454.37 मिमी पाऊस
Breaking News LIVE Updates, 21 September 2021: दिवसभरातील ताज्या घडामोडी, महत्त्वाचे अपडेट्स, देशभरासह राज्यातील कोरोना संबंधित, राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर अपडेट्स या लाईव्ह ब्लॉगमध्ये.
LIVE
Background
Mumbai Vaccination : आज मुंबईत 316 पैकी 73 सरकारी आणि सार्वजनिक लसीकरण केंद्र सुरु राहणार, पुरेशा लससाठ्याअभावी निर्णय
देशासह राज्यातही कोरोनाच्या तिसऱ्या लाटेचा इशारा देण्यात आला आहे. अशातच तिसऱ्या लाटेच्या पार्श्वभूमीवर अनेक उपाययोजनाही केल्या जात आहेत. सध्या तरी कोरोनासारख्या जीवघेण्या व्हायरसपासून बचाव करण्यासाठी लस हेच प्रमुख अस्त्र असल्याचं बोललं जात आहे. देशभरात सध्या लसीकरण मोहीम सुरु आहे. परंतु, वारंवार लसीकरण मोहिमेत पुरेशा लसीसाठ्याअभावी वारंवार अडथळे येत आहेत. आज म्हणजेच, 21 सप्टेंबर रोजी मुंबईतील सरकारी आणि सार्वजनिक लसीकरण केंद्रांवर मर्यादीत लससाठा उपलब्ध असल्यामुळं मर्यादीत लससाठा उपलब्ध असल्यानं मर्यादित लसीकरण केंद्रांवर लसीकरण केलं जाईल.
KKR vs RCB, Match Highlights : कोलकाताचा बंगळुरुवर नऊ विकेट्सने विजय
KKR vs RCB, Match Highlights : आयपीएलच्या दुसऱ्या टप्प्यातील दुसरा सामना आज शेख झायेद स्टेडियमवर खेळवण्यात आला. विराट कोहलीच्या बंगळुरुची दुसऱ्या टप्प्यातील सुरुवात निराशाजनक झाली. मॉर्गनच्या कोलकाता संघाने धुव्वा उडवला. कोलकाताने बंगळुरुवर नऊ विकेटनी मात केली. कोलकाताने 10 षटक राखून बंगळुरुचे आव्हान पूर्ण केले. कोलकाताने 10 षटकात 93 धावाचे लक्ष्य सहज मिळवले. शुभमन गिलने 48 आणि व्यंकटेश अय्यर नाबाद 41 धावा केल्या. बंगळुरकडून यजुवेंद्र चहलने एक विकेट घेतले. शुभमनने 6 चौकार आणि एका षटकारासह 48 धावा केल्या.
Vaccine Maitri Program : पुढील महिन्यापासून भारत पुन्हा इतर देशांना लसी पुरवणार, आरोग्यमंत्री मांडविया यांची माहिती
पुढील महिन्यापासून भारत पुन्हा इतर देशांना कोरोना लसीचे डोस पुरवण्यास सुरुवात करेल केंद्रीय आरोग्य मंत्री मनसुख मांडविया (Mansukh Mandaviya) यांनी ही माहिती दिली आहे. देशात करोनाच्या दुसऱ्या लाटेने बिकट परिस्थिती निर्माण झाली असताना भारताने 5 मे पासून कोरोनावरील लसींच्या निर्यातीवर बंदी घातली होती. केंद्रीय आरोग्य मंत्री मनसुख मांडविया म्हणाले, वॅक्सिन मैत्री अंतर्गत ऑक्टोबरपासून पुन्हा पुरवठा सुरू केला जाईल. COVAX कार्यक्रमांतर्गत लसींचा पुरवठा करून भारत वसुधैव कुटुम्बकमचे ध्येय पूर्ण करेल . यामुळे जगाला कोरोनाविरोधात एकत्र लढण्यास मदत होईल.
कंगनाला कोर्टावर भरवसा नाय... अंधेरी दंडाधिकारी कोर्टातील मानहानीचा खटला दुसरीकडे वर्ग करण्याची मागणी
लेखक आणि गीतकार जावेद अख्तर यांनी दाखल केलेल्या अब्रुनुकसानी प्रकरणी अखेर अभिनेत्री कंगना रनौत सोमवारी अंधेरी दंडाधिकारी न्यायालयात हजर झाली. कंगनाच्यावतीनं तिच्याविरोधात तक्रार दाखल करणा-या जावेद अख्तर यांच्याविरोधात खंडणीची तक्रार कोर्टाला दिली गेली. मात्र या कोर्टावर आता आपला भरवसा नाही, असं स्पष्ट करत ही सारी प्रकरणं दुस-या कोर्टापुढे वर्ग करण्यात यावी अशी मागणी करणारा अर्ज कोर्टापुढे सादर केला. आपली बाजू न ऐकता बेकायदेशीरपणे आपल्याविरोधात अटक वॉरंट जारी केला जाईल, अशी धमकी देण्यात येते, असा आरोप कंगनानं या अर्जातून केला आहे. कोर्टानं या अर्जाचा स्वीकार केला असून जोपर्यंत मुख्य दंडाधिकारी न्यायाधीश यावर निकाल देत नाहीत तोपर्यंत या प्रकरणाला स्थगिती देत सुनावणी 15 नोव्हेंबरपर्यंत तहकूब केली. मुख्य दंडाधिकारी यावर 1 ऑक्टोबर रोजी सुनावणी घेण्याची शक्यता आहे.
महाराष्ट्रात आजपर्यंत 116 टक्के पाऊस, सरासरीच्या 1454.37 मिमी पाऊस
मराठवाड्यात 1 जूनपासून आजपर्यंत 800 मिमी पावसाची नोंद, सरासरीच्या तब्बल 29 टक्के अधिकचा पाऊस. कोकण व गोव्यात सरासरीच्या 21 टक्के अधिकच्या पावसाची नोंद, आतापर्यंत 3350 मिमी पावसाची नोंद. मध्य महाराष्ट्रात 776.6 मिमी पाऊस, सरासरीच्या 11 टक्के अधिकचा पाऊस.
विदर्भात 98 टक्के पाऊस, विदर्भात 21 सप्टेंबरपर्यंत 910.7 मिमी पावसाची नोंद होत असते. मात्र, 1 जूनपासून आजपर्यंत 890.2 मिमी पावसाची नोंद झाली आहे. देशात आतापर्यंत 97 टक्के पाऊस, सरासरीच्या 810.6 मिमी पाऊस.
सकाळी 8 ते दुपारी 5 वाजेपर्यंत घाट परिसरात किती पाऊस?
अंबोणी - 54 मिमी
लोणावळा ऑफीस - 51 मिमी
डोंगरवाडी - 48 मिमी
वाळवण - 42 मिमी
दावरी - 40 मिमी
लोणावळा टी - 36 मिमी
भिवपुरी - 32 मिमी
शिरोटा - 32 मिमी
मुळशी कॅम्प - 28 मिमी
मुळशी बंगलो - 26 मिमी
खांडी - 20 मिमी
पिंपरी चिंचवड शहरातील जलतरण तलाव खुली
पिंपरी चिंचवड शहरातील जलतरण तलाव खुली होणार. मात्र केवळ जलतरण स्पर्धेत सहभागी होणाऱ्या खेळाडूंनाच मुभा असेल. जलतरण प्रशिक्षकांचे लसीचे दोन्ही डोस असणं बंधनकारक आहे. सर्व उपाययोजना नुसार हे आदेश उद्यापासून लागू होतील. तसं परिपत्रक पालिका आयुक्त राजेश पाटील यांनी काढलं आहे.
परभणीच्या येलदरी धरणाचे सर्व 10 दरवाजे उघडले
कालपासून सुरू असलेल्या पावसामुळे परभणी जिल्ह्यातील मोठ्या प्रकल्पाबरोबर छोटे ही प्रकल्प तुडूंब भरले आहेत. सकाळी सेलूच्या लोअर दुधना प्रकल्पाचे 14 दरवाजे उघडण्यात आले होते. या पाठोपाठ जिंतुर तालुक्यातील येलदरी प्रकल्पाचेही 10 पैकी 10 दरवाजे उघडण्यात आले आहेत. येलदरीच्या 10 दरवाज्यातून 23798 क्यूसेक वेगाने पाण्याचा विसर्ग हा पुर्णा नदीपात्रात सोडण्यात आलाय. ज्यामुळे दुधना नदी पाठोपाठ पुर्णा नदीलाही पुर आलाय. ज्यामुळे दोन्ही नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.
कल्याण डोंबिवलीत सकाळपासून पावसाची रिपरिप
कल्याण डोंबिवली शहरात कालपासून पावसाने हजेरी लावली आहे. आज सकाळपासुन कल्याण डोंबीवलीमध्ये पावसाची रिपरिप सुरू असून काही कालावधीसाठी विश्रांती घेत अधून मधून जोरदार पावसाच्या सरी कोसळत आहे. अधून मधून कोसळणाऱ्या सरीमुळे नागरिकांची मात्र तारांबळ उडाली आहे.