एक्स्प्लोर

Breaking News LIVE : महाराष्ट्रातल्या राज्यसभेच्या पोटनिवडणुकीत भाजपच्या 12 निलंबित आमदारांनाही मतदानाची परवानगी

Breaking News LIVE Updates, 20 September 2021: दिवसभरातील ताज्या घडामोडी, महत्त्वाचे अपडेट्स, देशभरासह राज्यातील कोरोना संबंधित, राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर अपडेट्स लाईव्ह ब्लॉगमध्ये.

LIVE

Key Events
Breaking News LIVE : महाराष्ट्रातल्या राज्यसभेच्या पोटनिवडणुकीत भाजपच्या 12 निलंबित आमदारांनाही मतदानाची परवानगी

Background

Punjab New CM : पंजाबच्या मुख्यमंत्रीपदी विराजमान होणार चरणजीत सिंह चन्नी, आज शपथविधी

Punjab New CM : कॅप्टन अमरिंदर सिंह यांच्या राजीनाम्यानंतर पंजाबचे मुख्यमंत्री म्हणून चरणजीत सिंह चन्नी यांच्या नावावर शिक्कामोर्तब करण्यात आला आहे. काँग्रेसच्या पक्षश्रेष्ठींनी चरणजीत सिंह चन्नी यांना जबाबदारी सोपवण्याचा निर्णय घेतला आहे. पुढच्या वर्षी फेब्रुवारी-मार्चमध्ये पंजाबमध्ये होणाऱ्या विधानसभा निवडणुकीपूर्वी दलित शीख चेहऱ्याकडे मुख्यमंत्री पदाची जबाबदारी सोपवण्यात येत आहे. चन्नी सोमवारी सकाळी 11 वाजता मुख्यमंत्री पदाची शपथ घेणार आहेत. चन्नी यांना काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी यांनीही शुभेच्छा दिल्या आहेत. 

चन्नी यांनी घेतली राज्यपालांची भेट, आज सकाळी 11 वाजता शपथविधी 

चरणजीत सिंह चन्नी यांच्या नावावर पक्षश्रेष्ठींकडून शिक्कामोर्तब झाल्यानंतर चंदिगढमधील राजभवनात जाऊन त्यांनी राज्यपालांची भेट घेतली. चन्नी यांच्यासोबत पंजाब काँग्रेसचे प्रमुख नवजोत सिंह सिद्धू आणि पंजाब कांग्रेस प्रभारी हरीश रावतही उपस्थित होते. राज्यपालांशी जवळपास अर्धा तासाच्या भेटीनंतर चरणजीत सिंह चन्नी यांनी राजभवना बाहेर माध्यमांशी संवाद साधला. यावेळी बोलताना त्यांनी आज होणाऱ्या शपथविधीबाबत माहिती दिली. त्यांनी सांगितलं की, आज सकाळी 11 वाजता ते मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. 

चरणजीत सिंह चन्नी अमरिंदर सिंग सरकारमध्ये तंत्रशिक्षण आणि पर्यटन मंत्री होते. ते चमकौर विधानसभा मतदारसंघातून आमदार आहेत. ते पंजाब विधानसभेत विरोधी पक्षनेते राहिले आहेत. चरणजीत सिंह चन्नी पंजाबचे नवे मुख्यमंत्री म्हणून घोषित झाल्यानंतर काँग्रेस नेते सुखजिंदर सिंह रंधावा म्हणाले की, "हा हायकमांडचा निर्णय आहे. मी त्याचे स्वागत करतो. चन्नी माझ्या लहान भावासारखे आहेत."

आयपीएलच्या दुसऱ्या टप्प्यात चेन्नईची विजयी सुरुवात 

आयपीएल 2021 च्या उत्तरार्धातील पहिल्या सामन्यात चेन्नई सुपर किंग्सने मुंबई इंडियन्सचा 20 धावांनी पराभव केला. चेन्नईने पहिल्यांदा फलंदाजी करत 20 षटकांत सहा गडी बाद 156 धावा केल्या होत्या. प्रत्युत्तरात मुंबई इंडियन्स संघ निर्धारित षटकांत केवळ 136 धावा करू शकला. आयपीएल 2021 मध्ये चेन्नईचा हा सहावा विजय आहे. आता त्यांचे आठ सामन्यात 12 गुण आहेत.

या विजयासह चेन्नईने आयपीएल 2021 च्या पूर्वार्धातील पराभवाचा बदलाही घेतला. खरे तर भारतात खेळल्या गेलेल्या पूर्वार्धात चेन्नईला मुंबईविरुद्ध 218 धावा करूनही सामना जिंकता आला नाही. त्या सामन्यात मुंबईने हारला विजयात बदललं होतं. मात्र, आज चेन्नईने त्या पराभवाचा बदला घेतला.

19:48 PM (IST)  •  21 Sep 2021

महाराष्ट्रातल्या राज्यसभेच्या पोटनिवडणुकीत भाजपच्या 12 निलंबित आमदारांनाही मतदानाची परवानगी

महाराष्ट्रातल्या राज्यसभेच्या पोटनिवडणुकीत भाजपच्या 12 निलंबित आमदारांनाही मतदानाची परवानगी. केंद्रीय निवडणूक आयोगाकडून राज्य सरकारला आदेश. निलंबित आमदारांना विधानभवनात यायची परवानगी नसते, तर त्यांच्यासाठी विधान भवनाच्या बाहेर मतदान व्यवस्था करण्याचे निर्देश.

19:06 PM (IST)  •  20 Sep 2021

पोर्नोग्राफी प्रकरणात राज कुंद्रा आणि रायन थॉर्प या दोघांना जामीन मंजूर 

पोर्नोग्राफी प्रकरणात राज कुंद्रा आणि रायन थॉर्प या दोघांना जामीन मंजूर 

मुख्य महानगर दंडाधिकारी कोर्टातुन जामीन मंजूर करण्यात आला

17:55 PM (IST)  •  20 Sep 2021

काँग्रेसकडून राज्यसभेसाठी रजनी पाटील यांचे नाव निश्चित, थोड्याच वेळात अधिकृत घोषणा

काँग्रेसकडून राज्यसभेसाठी रजनी पाटील यांचे नाव निश्चित झाले असून थोड्याच वेळात अधिकृत घोषणा करण्यात येणार आहे.  पाटील या माजी खासदार आणि सध्या जम्मू-काश्मीरच्या प्रभारी आहे. विधान परिषदेसाठी राज्यपाल नियुक्त आमदारांच्या यादीत नाव होतं. पण त्याऐवजी आता काँग्रेस राज्यसभेवर पाठवणार आहेत.सोनिया गांधी यांच्या अत्यंत विश्वासू वर्तुळातील.  याआधी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते विलासराव देशमुख यांच्या निधनानंतर रिक्त झालेल्या राज्यसभेवर त्यांना उमेदवारी मिळाली होती.

15:21 PM (IST)  •  20 Sep 2021

मनोहर भोसलेला करमाळा न्यायालयाकडून 27 सप्टेंबरपर्यंत पोलीस कोठडी

मनोहर भोसले याला करमाळा न्यायालयाने 27 सप्टेंबरपर्यंत दिली पोलीस कोठडी , मनोहर भोसले यांच्या वकिलांनी  दीड तास बाजू मांडली मात्र न्यायालयाने मनोहर भोसले यास 8 दिवसांची पोलीस कोठडी दिली

14:24 PM (IST)  •  20 Sep 2021

मुंबई गोवा महामार्गाच्या दुरावस्थेसंदर्भात याचिका

मुंबई गोवा महामार्गाच्या दुरावस्थे संदर्भात याचिका,

वडखळ ते इंदापूर या मार्गा दरम्यान एक अभयारण्य आणि तीन रेल्वेलाईन वरील पुल येत असल्यानं या कामाला उशिर,

26 पैकी 22 किमीच्याच मार्गावर काम करण्याची परवानगी मिळाली आहे,

वसिष्ठी पुलाच्या दुस-या टप्याचं काम 15 नोव्हेंबरपर्यंत पूर्ण होईल,

राज्य सरकारची हायकोर्टात माहिती,

डिसेंबरपर्यंत राज्य सरकारनं संपूर्ण चौपदरीकरणाच्या कामाचा अहवाल सादर करावा - हायकोर्ट,

या महामार्गावरील खड्ड्यांबाबत मात्र तीन आठवड्यांत उत्तर देण्याचे निर्देश,

Load More
New Update
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Baba Siddique Death Update| बाबा सिद्दीकांचा गोळीबारात मृत्यू, लिलावती रुग्णालयाबाहेर सुरक्षा वाढवली
Baba Siddique Death Update| बाबा सिद्दीकांचा गोळीबारात मृत्यू, लिलावती रुग्णालयाबाहेर सुरक्षा वाढवली
Baba Siddique Shot Dead in Mumbai: बाबा सिद्दिकींच्या हत्येनंतर देवेंद्र फडणवीस तातडीने लीलावती रुग्णालयात, सिद्दिकींच्या समर्थकांची घोषणाबाजी
बाबा सिद्दिकींच्या हत्येनंतर देवेंद्र फडणवीस तातडीने लीलावती रुग्णालयात, सिद्दिकींच्या समर्थकांची घोषणाबाजी
Baba Siddique Firing: बाबा सिद्दिकींना 15 दिवसांपूर्वी धमकी, वाय दर्जाची सुरक्षाही दिली, पण घात झालाच
बाबा सिद्दिकींना 15 दिवसांपूर्वी धमकी, वाय दर्जाची सुरक्षाही दिली, पण घात झालाच
Baba Siddique Firing: वांद्र्याच्या खेरवाडी सिग्नलवर काय घडलं, बाबा सिद्दिकींवर गोळीबार कसा झाला?
तीन गोळ्या, तीन आरोपी, बाबा सिद्दिकी यांच्यावर हल्ला, नेमकं काय घडलं?
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Eknath Shinde On Baba Siddique Dead | बाबा सिद्दीकींच्या आरोपींना कडक कारवाई होईल- एकनाथ शिंदेBaba Siddique Death Update| बाबा सिद्दीकांचा गोळीबारात मृत्यू, लिलावती रुग्णालयाबाहेर सुरक्षा वाढवलीBaba Siddique : मोठी बातमी! राष्ट्रवादीचे नेते बाबा सिद्दिकी यांचा गोळीबारात मृत्यूUddhav Thackeray Full Speech : मोदींची मिमिक्री, RSSला सवाल; उद्धव ठाकरे यांचं दमदार भाषण ABP MAJHA

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Baba Siddique Death Update| बाबा सिद्दीकांचा गोळीबारात मृत्यू, लिलावती रुग्णालयाबाहेर सुरक्षा वाढवली
Baba Siddique Death Update| बाबा सिद्दीकांचा गोळीबारात मृत्यू, लिलावती रुग्णालयाबाहेर सुरक्षा वाढवली
Baba Siddique Shot Dead in Mumbai: बाबा सिद्दिकींच्या हत्येनंतर देवेंद्र फडणवीस तातडीने लीलावती रुग्णालयात, सिद्दिकींच्या समर्थकांची घोषणाबाजी
बाबा सिद्दिकींच्या हत्येनंतर देवेंद्र फडणवीस तातडीने लीलावती रुग्णालयात, सिद्दिकींच्या समर्थकांची घोषणाबाजी
Baba Siddique Firing: बाबा सिद्दिकींना 15 दिवसांपूर्वी धमकी, वाय दर्जाची सुरक्षाही दिली, पण घात झालाच
बाबा सिद्दिकींना 15 दिवसांपूर्वी धमकी, वाय दर्जाची सुरक्षाही दिली, पण घात झालाच
Baba Siddique Firing: वांद्र्याच्या खेरवाडी सिग्नलवर काय घडलं, बाबा सिद्दिकींवर गोळीबार कसा झाला?
तीन गोळ्या, तीन आरोपी, बाबा सिद्दिकी यांच्यावर हल्ला, नेमकं काय घडलं?
Uddhav Thackeray Dasara Melava : चंद्रचूडसाहेब अजूनही वेळ गेलेली नाही, तारखांवर तारखा आणि भाषणे देऊ नका; उद्धव ठाकरेंचा 'सर्वोच्च' टोला!
चंद्रचूडसाहेब अजूनही वेळ गेलेली नाही, तारखांवर तारखा आणि भाषणे देऊ नका; उद्धव ठाकरेंचा 'सर्वोच्च' टोला!
Ind vs Ban: संजूचे 8, सूर्या 5, रियान-हार्दिकचे 4-4 अन् रिंकूचा 1 षटकार; भारताचे तुफानी 22 छक्के
Ind vs Ban: संजूचे 8, सूर्या 5, रियान-हार्दिकचे 4-4 अन् रिंकूचा 1 षटकार; भारताचे तुफानी 22 छक्के
Uddhav Thackeray Dussehra Rally : भाजपला राजकारणातील खांदा द्यायचा आहे, ही वृत्ती संपवावीच लागेल; उद्धव ठाकरेंचा घणाघात
भाजपला राजकारणातील खांदा द्यायचा आहे, ही वृत्ती संपवावीच लागेल; उद्धव ठाकरेंचा घणाघात
Uddhav Thackeray Dasara Melava : ... तर राज्यातील प्रत्येक जिल्ह्यात शिवाजी महाराजांचं मंदिर बांधणार; दसरा मेळाव्यातून उद्धव ठाकरेंचं वचन
... तर राज्यातील प्रत्येक जिल्ह्यात शिवाजी महाराजांचं मंदिर बांधणार; दसरा मेळाव्यातून उद्धव ठाकरेंचं वचन
Embed widget