एक्स्प्लोर

Breaking News LIVE : राष्ट्रपतींना मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर भेटायला गेलेल्या शिष्टमंडळात एकीचा बेबनाव

Breaking News LIVE Updates, 2 September 2021: दिवसभरातील ताज्या घडामोडी, महत्त्वाचे अपडेट्स, देशभरासह राज्यातील कोरोना संबंधित, राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा आणि इतर अपडेट्स लाईव्ह ब्लॉगमध्ये.

LIVE

Key Events
Breaking News LIVE : राष्ट्रपतींना मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर भेटायला गेलेल्या शिष्टमंडळात एकीचा बेबनाव

Background

गणेशोत्सवासाठी मुंबई पोलीस सज्ज; मास्क न घालणाऱ्यांवर कारवाई तर गणपती मंडळांसाठीसुद्धा नियम
गणपतीच्या आगमनाला फक्त काही दिवस शिल्लक आहेत. या दरम्यान मुंबईतील सर्व पोलीस ठाण्यांना सतर्क राहण्याचे आदेश देण्यात आले आहेत. जेणेकरून लोकांमध्ये कोरोनाच्या नियमांचा काटेकोरपणे पालन करण्यात येईल.  गुरुवारपासून मुंबई पोलीस मास्क न घालता रस्त्यावर फिरणाऱ्या लोकांवर कारवाई करणार आहेत. बुधवारी सह आयुक्त कायदा आणि सुव्यवस्था विश्वास नांगरे पाटील यांनी सर्व पोलीस ठाण्यांना सूचना दिल्या आहेत, प्रत्येक पोलीस स्टेशनच्या हद्दीत मास्क न घालणाऱ्या नागरिकांवर कारवाई करण्यास सांगितलं आहे.

यासह, मुंबई पोलिसांनी गणेशोत्सवाचं आयोजन करणाऱ्यांना भक्तांसाठी ऑनलाईन दर्शनाची सुविधा उपलब्ध करून देण्याचं आवाहन गणेशोत्सव मंडळांना केलं आहे. याशिवाय जर भक्तांना मंडळाला भेट द्यायची असेल आणि गणपतीचं दर्शन घ्यायचं असेल तर त्यांच्यासाठी टोकन यंत्रणेची व्यवस्था करा जेणेकरून जास्त गर्दी होणार नाही, असंही मुंबई पोलिसांच्या वतीनं आवाहन करण्यात आलं आहे. 

अनिल देशमुख यांचे जावई गौरव चतुर्वेदी सीबीआयच्या ताब्यात, 20 मिनिटांच्या चौकशीनंतर सुटका
राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांचे जावई गौरव चतुर्वेदी यांना सीबीआयने ताब्यात घेतलं होतं. सीबीआयने 20 मिनिटे त्यांची चौकशी केली आणि त्यांची सुटका केली. मात्र त्यांचे वकील आनंद डागा यांना सीबीआयने अटक केली आहे. सीबीआयचा प्राथमिक चौकशी अहवाल देशमुख यांनीच लीक केल्याचा सीबीआयला संशय आहे. या प्रकरणात गौरव चतुर्वेदी आणि आनंद डागा यांचं नाव समोर आल्याचं बोललं जात आहे. काही अधिकाऱ्यांचाही यात हात असल्याचीही शक्यता आहे.

गौरव चतुर्वेदी यांचे वकील आनंद डागा यांना सीबीआयने अटक केली आहे. आनंद डागा यांच्यावर संशय आहे की सरकारी अधिकाऱ्यांचा वापर करुन त्यांनी हा चौकशी अहवाल लीक केला आहे. म्हणूनच त्यांची सीबीआयकडून चौकशी सुरु आहे. तसेच राज्य सरकारच्या काही अधिकाऱ्यांचीही नावंही समोर आल्याची माहिती सूत्रांकडून मिळत आहे. त्यांची चौकशी सीबीआयकडून होण्याची शक्यता आहे.

काश्मीरमधील फुटिरतावादी हुर्रियत नेते सय्यद अली गिलानी यांचे 92व्या वर्षी निधन
हुर्रियत कॉन्फरन्स (जी) चे माजी अध्यक्ष आणि फुटीरतावादी नेते सय्यद अली शाह गिलानी यांचं वयाच्या 92 व्या वर्षी निधन झालं. बुधवारी श्रीनगरमध्ये आपल्या राहत्या घरी त्यांनी अखरेचा श्वास घेतला. त्यांच्या छातीत दुखत असून त्यांना श्वास घेण्यास त्रास होत होता. जम्मू -काश्मीरच्या माजी मुख्यमंत्री आणि पीडीपीच्या अध्यक्षा मेहबूबा मुफ्ती यांनी ट्वीट करून दुःख व्यक्त केले असून कुटुंबियांप्रति संवेदना व्यक्त केल्या. 

मेहबूबा मुफ्ती यांनी म्हटलं की, "गिलानी साहेबांच्या निधनाच्या वृत्तानं दुःखी झालेय. आम्ही बर्‍याच गोष्टींवर सहमत होऊ शकलो नाही, पण मी ठामपणे आणि दृढ विश्वासानं आपल्या भूमिकांवर ठाम राहिल्याबद्दल त्यांच्या आदर करते. अल्लाह त्यानां जन्नत देवो आणि त्यांच्या कुटुंबियांना आणि हितचिंतकांना संवेदना."

सप्टेंबर अखेरपर्यंत कोविड रुग्णसंख्या वाढली तर निर्बंध कडक होणार : अस्लम शेख
कोरोना व्हायरसच्या तिसऱ्या लाटेच्या शक्यतेच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने खबरदारीचा उपाय म्हणून उपाययोजना सुरु केल्या आहेत. आज मंत्रिमंडळाच्या बैठकीत कोविडच्या सद्यस्थितीचा आढावा घेण्यात आला. सप्टेंबर अखेरपर्यंत कोविड रुग्णसंख्या वाढली तर निर्बंध कडक होणार असल्याची माहिती मुंबईचे पालकमंत्री अस्लम शेख यांनी दिली आहे. कोरोना रुग्णसंख्येत वाढ होत असताना नाईट कर्फ्यू, संचारबंदी जमाव बंदी लागू केली जाऊ शकते, अशी शक्यता वर्तवली जात होती. मात्र तूर्तास नाईट कर्फ्यु, संचारबंदी,जमावबंदीची गरज नाही, असं अस्लम शेख यांनी सांगितलं. टास्क फोर्सने सांगितल्यानुसार सप्टेंबर अखेरपर्यंत कोरोना रुग्णसंख्या वाढण्याची शक्यता आहे. रुग्णसंख्या वाढली तर निर्बंध कडक करण्याची गरज आहे, असंही त्यांनी म्हटलं. 

20:53 PM (IST)  •  02 Sep 2021

परभणी - शिवसेनेचे खासदार संजय जाधव, आमदार डॉ. राहुल पाटील, काँग्रेस आमदार सुरेश वरपूडकर यांच्यासह 7 जणांवर गुन्हा दाखल

परभणी - शिवसेनेचे खासदार संजय जाधव, आमदार डॉ. राहुल पाटील, काँग्रेस आमदार सुरेश वरपूडकर यांच्यासह 7 जणांवर गुन्हा दाखल , जिल्हाधिकाऱ्यांच्या प्रतिबंधात्मक आदेशाचे केले उल्लंघन, शासकीय वैद्यकीय महाविद्यालयासाठी काल केले होते धरणे आंदोलन, धरणे आंदोलनाचे संयोजक म्हणुन गुन्हा दाखल,  शहरातील नवा मोंढा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल

20:35 PM (IST)  •  02 Sep 2021

जुन्या पुणे मुंबई महामार्गावरील बोरघाटात चारचाकी गाडी दरीत कोसळली

जुन्या पुणे मुंबई महामार्गावरील बोरघाटात चारचाकी गाडी दरीत गेली. तर एक टेम्पो वरतीच पलटी झालाय. दरीत गेलेल्या गाडीचे चालक सुखरूप असून त्याला वरती घेण्यासाठी बचावकार्य सुरू आहे. काहीवेळापूर्वी बोरघाटातील खिंडीत ही घटना घडली. टेम्पोची धडक लागल्याने कार दरीत गेली असण्याचा महामार्ग वाहतूक पोलिसांचा अंदाज आहे. दोन्ही वाहन पुण्याहून मुंबईला जात होती. चालकाला वरती घेतल्यानंतरच नेमकं काय घडलं हे समोर येईल.

18:45 PM (IST)  •  02 Sep 2021

राष्ट्रपतींना मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर भेटायला गेलेल्या शिष्टमंडळात एकीचा बेबनाव

राष्ट्रपतींना मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर भेटायला गेलेल्या शिष्टमंडळात एकीचा बेबनाव केला आहे. भाजपचे खासदार राष्ट्रपतींना भेटायला तर गेले, निवेदनावर सही करायला मात्र टाळाटाळ केली. राष्ट्रपतींना निवेदन सादर होईपर्यंत भाजप खासदारांची सही नाही. निवेदन सादर झाल्यावर राष्ट्रपतींनीही विचारलं यावर तुमची सही का नाही? त्यानंतर भाजप खासदारांनी  निवेदनावर सही केली. 

18:16 PM (IST)  •  02 Sep 2021

महाराष्ट्र राज्य सहकारी बँकेशी संबंधित ईडीच्या अनेक ठिकाणी धाडी


ईडीच्या अनेक ठिकाणी धाडी टाकल्या आहे.  महाराष्ट्र राज्य सहकारी बँकेशी संबंधित  ठिकाणी सात ठिकाणी  धाडी टाकण्यात आल्या.  मुंबई आणि इतर ठिकाणी देखील धाडी टाकल्या.

18:12 PM (IST)  •  02 Sep 2021

मराठा आरक्षणाचे प्रश्न राष्ट्रपतींसमोर मांडलेत : संभाजीराजे

आरक्षणाची आजवरची सर्व स्थिती राष्ट्रपतींना नमूद केली. सर्व पार्श्वभूमीवर त्यांनी सविस्तर पणे ऐकून घेतली. राजर्षी शाहू आरक्षणाचे जनक असेही उद्गार राष्ट्रपतींनी काढले.  मी तुमचं म्हणणं शांतपणे ऐकून घेतले आहे, मला थोडासा वेळ द्या असं राष्ट्रपती म्हणाले, ही माहिती खासदार संभाजीराजे छत्रपतींनी दिली. 

Load More
New Update
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Baba Siddique Death Update| बाबा सिद्दीकांचा गोळीबारात मृत्यू, लिलावती रुग्णालयाबाहेर सुरक्षा वाढवली
Baba Siddique Death Update| बाबा सिद्दीकांचा गोळीबारात मृत्यू, लिलावती रुग्णालयाबाहेर सुरक्षा वाढवली
Baba Siddique Shot Dead: देवीच्या मिरवणुकीतील फटाक्यांच्या आवाजात बाबा सिद्दिकींवर फायरिंग, गोळी कारच्या बुलेटफ्रुफ काचेत घुसली
देवीच्या मिरवणुकीतील फटाक्यांच्या आवाजात बाबा सिद्दिकींवर फायरिंग, गोळी कारच्या बुलेटफ्रुफ काचेत घुसली
Baba Siddique Shot Dead in Mumbai: बाबा सिद्दिकींच्या हत्येनंतर देवेंद्र फडणवीस तातडीने लीलावती रुग्णालयात, सिद्दिकींच्या समर्थकांची घोषणाबाजी
बाबा सिद्दिकींच्या हत्येनंतर देवेंद्र फडणवीस तातडीने लीलावती रुग्णालयात, सिद्दिकींच्या समर्थकांची घोषणाबाजी
Baba Siddique Firing: बाबा सिद्दिकींना 15 दिवसांपूर्वी धमकी, वाय दर्जाची सुरक्षाही दिली, पण घात झालाच
बाबा सिद्दिकींना 15 दिवसांपूर्वी धमकी, वाय दर्जाची सुरक्षाही दिली, पण घात झालाच
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Devendra Fadnavis on Baba Siddque | बाबा सिद्दीकींचा गोळीबारात मृत्यू, फडणवीस थेट लीलावती रुग्णालयातBaba Siddique Dead Update | बाबा सिद्दीकींच्या हत्या प्रकरणात बिश्नाई गँगच्या अॅगलने पोलिसांचा तपास सुरुEknath Shinde On Baba Siddique Dead | बाबा सिद्दीकींच्या आरोपींना कडक कारवाई होईल- एकनाथ शिंदेBaba Siddique Death Update| बाबा सिद्दीकांचा गोळीबारात मृत्यू, लिलावती रुग्णालयाबाहेर सुरक्षा वाढवली

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Baba Siddique Death Update| बाबा सिद्दीकांचा गोळीबारात मृत्यू, लिलावती रुग्णालयाबाहेर सुरक्षा वाढवली
Baba Siddique Death Update| बाबा सिद्दीकांचा गोळीबारात मृत्यू, लिलावती रुग्णालयाबाहेर सुरक्षा वाढवली
Baba Siddique Shot Dead: देवीच्या मिरवणुकीतील फटाक्यांच्या आवाजात बाबा सिद्दिकींवर फायरिंग, गोळी कारच्या बुलेटफ्रुफ काचेत घुसली
देवीच्या मिरवणुकीतील फटाक्यांच्या आवाजात बाबा सिद्दिकींवर फायरिंग, गोळी कारच्या बुलेटफ्रुफ काचेत घुसली
Baba Siddique Shot Dead in Mumbai: बाबा सिद्दिकींच्या हत्येनंतर देवेंद्र फडणवीस तातडीने लीलावती रुग्णालयात, सिद्दिकींच्या समर्थकांची घोषणाबाजी
बाबा सिद्दिकींच्या हत्येनंतर देवेंद्र फडणवीस तातडीने लीलावती रुग्णालयात, सिद्दिकींच्या समर्थकांची घोषणाबाजी
Baba Siddique Firing: बाबा सिद्दिकींना 15 दिवसांपूर्वी धमकी, वाय दर्जाची सुरक्षाही दिली, पण घात झालाच
बाबा सिद्दिकींना 15 दिवसांपूर्वी धमकी, वाय दर्जाची सुरक्षाही दिली, पण घात झालाच
Baba Siddique Firing: वांद्र्याच्या खेरवाडी सिग्नलवर काय घडलं, बाबा सिद्दिकींवर गोळीबार कसा झाला?
तीन गोळ्या, तीन आरोपी, बाबा सिद्दिकी यांच्यावर हल्ला, नेमकं काय घडलं?
Uddhav Thackeray Dasara Melava : चंद्रचूडसाहेब अजूनही वेळ गेलेली नाही, तारखांवर तारखा आणि भाषणे देऊ नका; उद्धव ठाकरेंचा 'सर्वोच्च' टोला!
चंद्रचूडसाहेब अजूनही वेळ गेलेली नाही, तारखांवर तारखा आणि भाषणे देऊ नका; उद्धव ठाकरेंचा 'सर्वोच्च' टोला!
Ind vs Ban: संजूचे 8, सूर्या 5, रियान-हार्दिकचे 4-4 अन् रिंकूचा 1 षटकार; भारताचे तुफानी 22 छक्के
Ind vs Ban: संजूचे 8, सूर्या 5, रियान-हार्दिकचे 4-4 अन् रिंकूचा 1 षटकार; भारताचे तुफानी 22 छक्के
Uddhav Thackeray Dussehra Rally : भाजपला राजकारणातील खांदा द्यायचा आहे, ही वृत्ती संपवावीच लागेल; उद्धव ठाकरेंचा घणाघात
भाजपला राजकारणातील खांदा द्यायचा आहे, ही वृत्ती संपवावीच लागेल; उद्धव ठाकरेंचा घणाघात
Embed widget