Breaking News LIVE : ट्रक आणि जीप यांच्यात झालेल्या भीषण अपघातात आठजण ठार तर दहाहून अधिक जखमी
Breaking News LIVE Updates, 12 September 2021: दिवसभरातील ताज्या घडामोडी, महत्त्वाचे अपडेट्स, देशभरासह राज्यातील कोरोना संबंधित, राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर अपडेट्स लाईव्ह ब्लॉगमध्ये...
LIVE
Background
2022 मध्ये होणाऱ्या उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकांबाबत (UP Assembly Elections) उत्सुकता वाढणार आहे. AIMIM चे अध्यक्ष असदुद्दीन ओवैसी (Asaduddin Owaisi) यांनी उत्तर प्रदेश निवडणूक लढवण्याची घोषणा केल्यानंतर आता शिवसेनेनंही उत्तर प्रदेश (Uttar Pradesh) विधानसभा निवडणुक 2021 मध्ये निवडणुकीच्या रिंगणात उतरणार असल्याची घोषणा केली आहे. उत्तर प्रदेशातील सर्वच्या सर्व 403 जागांवर निवडणूक लढवण्याचा निर्णय शिवसेनेनं घेतला आहे. अद्याप या निवडणूकीत शिवसेना युती करणार का? आणि कोणासोबत युती करणार? हे मात्र स्पष्ट करण्यात आलेलं नाही.
पुढच्या वर्षाच्या सुरुवातीपासून होणाऱ्या निवडणुकांपूर्वी शिवसेनेनं स्पष्ट केलं आहे की, शिवसेना उत्तर प्रदेशातील सर्व 403 जागांवर निवडणूक लढवणार आहे. शिवसेनेचा हा निर्णय निवडणुकीत भाजपसाठी अडचणी वाढवू शकतो.
Gujarat Chief Minister : भाजपची आज महत्वाची बैठक, मुख्यमंत्रीपदासाठी 'हे' नाव आघाडीवर
विजय रुपाणी यांनी अचानक राजीनामा दिल्यानंतर गुजरातमध्ये राजकीय हालचालींना वेग आल्याचं दिसून येतंय. मुख्यमंत्रीपदाची माळ आपल्याच गळ्यात पडावी यासाठी अनेक नेत्यांनी लॉबिंग सुरु केली आहे. आज दुपारी दोन वाजता भाजपच्या निर्वाचित सदस्यांची एक महत्वाची बैठक आयोजित केली आहे. गुजरातच्या मुख्यमंत्रीपदासाठी नितीन पटेल यांचं नाव आघाडीवर असल्याचं समजतंय.
कोण आहेत नितीन पटेल?
नितीन पटेल हे भाजपचे राज्यातील महत्वाचे नेते असून 2016 साली त्यांना उपमुख्यमंत्रीपदाची संधी देण्यात आली होती. गुजरात सरकारमध्ये ते 2001 साली अर्थमंत्री होते. नितीन पटेल आतापर्यंत सहा वेळा विधानसभेवर निवडून आले आहेत. उत्तर गुजरातमधील असलेल्या नितीन पटेल हे 1990 साली पहिल्यांदा आमदार झाले होते.
केंद्रीय मंत्र्यांचेही लॉबिंग
गुजरातच्या मुख्यमंत्रीपदासाठी केंद्रीय मंत्री मनसूख भाई मांडविया यांचं नावही चर्चेत असल्याची माहिती आहे. त्यांनी दिल्लीतील नेत्यांमध्ये लॉबिंग सुरु केली असल्याच्या बातम्या आहेत. मनसूख मांडविया यांच्याकडे आता केंद्रीय आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयाचा चार्ज आहे. ते गुजरातमधून राज्यसभेवर निवडून गेले असून गेल्या दोन दशकांपासून ते राजकारणात सक्रिय आहेत.
गुजरातमध्ये पुढील वर्षी विधानसभेच्या निवडणुका होऊ घातल्या आहेत. निवडणुकांना जेमतेम वर्षभराचा अवधी शिल्लक असल्याने विजय रुपाणी यांचा राजीनामा अनेक राजकीय पंडितांना आश्चर्यचकित करणारा आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी चर्चा केल्याशिवाय विजय रुपाणी राजीनाम्याचा निर्णय घेऊ शकणार नाहीत, हे सूर्यप्रकाशाइतकं स्पष्ट आहे. 26 डिसेंबर 2017 रोजी रुपाणी यांनी दुसऱ्यांदा गुजरातचे मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली. भाजपाने गुजरातमध्ये बहुमत मिळवले होते. त्यामुळे आता नवे मुख्यमंत्री कोण याकडे सगळ्यांचे लक्ष असणार आहे.
बंगालच्या उपसागरात तयार झालेलं कमी दाबाचे क्षेत्र अधिक तीव्र; उत्तर कोकण, मध्य महाराष्ट्र आणि विदर्भात 12 ते 14 सप्टेंबर दरम्यान काही ठिकाणी अतिवृष्टीचा इशारा
बंगालच्या उपसागरात तयार झालेलं कमी दाबाचे क्षेत्र अधिक तीव्र, पुढील 48 तासात उत्तर उडीशा, उत्तर छत्तीसगड आणि मध्य प्रदेशातून प्रवास करत पुढे सरकेल. उत्तर कोकण, मध्य महाराष्ट्र आणि विदर्भात 12 ते 14 सप्टेंबर दरम्यान काही ठिकाणी अतिवृष्टीचा इशारा. घाट माथ्यांवर काही ठिकाणी 200 मिमीपेक्षा अधिक पावसाची शक्यता. भारतीय हवामान विभागाकडून इम्पॅक्ट वाॅर्निंग जारी. पूर येणे, सखल भागात पाणी साचणे, दरड कोसळणे, कच्च्या घरांची पडझड होणे, दृश्यमानता कमी होणे त्याचसोबत सखल भागात पाणी साचल्याने ट्रॅफिकला अडथळा देखील येण्याची शक्यता, जोरदार वाऱ्यामुळे पिकांना नुकसान होण्याचा अंदाज. पुढील 3-4 तास रत्नागिरी, रायगड, मुंबई, ठाणे, सातारा, आणि पुणे जिल्ह्यात काही ठिकाणी विजांसह मध्यम ते मुसळधार पावसाची शक्यता.
ट्रक आणि जीप यांच्यात झालेल्या भीषण अपघातात आठजण ठार तर दहाहून अधिक जण जखमी
ट्रक आणि जीप यांच्यात झालेल्या भीषण अपघातात आठजण ठार तर दहाहून अधिक जण जखमी. चिक्कबळापूर जिल्ह्यातील चिंतामणी तालुक्यातील मरिनायकनहळी गेटजवळ हा अपघात घडला.
अंबरनाथच्या पालेगाव भागात रिक्षा आणि चारचाकी वाहनाचा भीषण अपघात
अंबरनाथच्या पालेगाव भागात रिक्षा आणि चारचाकी वाहनाचा भीषण अपघात. अपघातात चार जणांचा जागीच मृत्यू. मृत आणि जखमी अशा सर्वांना उल्हासनगरच्या मध्यवर्ती जिल्हा शासकीय रुग्णालयात भरती करण्यात आलंय.
कोयना धरणाचे सहा वक्र दरवाजे उघडले, दरवाजे एक फुटावरून अडीच फुटांवर
कोयना धरणाचे सहा वक्र दरवाजे उघडले, दरवाजे एक फुटावरून अडीच फुटांवर, कोयना महाबळेश्वर परिसरात पावसाचा जोर वाढल्याने निर्णय, कोयना धरणातून 23 हजार 700 क्युसेस पाण्याचा विसर्ग सुरु, नदीपात्रालगत असलेल्या गावांना सतर्कतेचा इशारा, आज दुपारी दोन वाजता उघडण्यात आले होते एक फुटाने दरवाजे