एक्स्प्लोर

Breaking News LIVE : जमीन गैरव्यवहार प्रकरणात बडतर्फ उपजिल्हाधिकारी नरहरी शेळके यांना अटक

Breaking News LIVE Updates, 9 October 2021: दिवसभरातील ताज्या घडामोडी, महत्त्वाचे अपडेट्स, देशभरासह राज्यातील कोरोना संबंधित, राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर महत्वाचे अपडेट लाईव्ह ब्लॉगमध्ये.

LIVE

Key Events
Breaking News LIVE : जमीन गैरव्यवहार प्रकरणात बडतर्फ उपजिल्हाधिकारी नरहरी शेळके यांना अटक

Background

Sindhudurg : आज चिपी विमानतळाचं लोकार्पण, मुख्यमंत्री ठाकरे आणि नारायण राणे एकाच मंचावर
 महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते आज सिंधुदुर्गातील चिपी विमानतळाचा लोकार्पण सोहळा संपन्न होणार आहे. यावेळी केंद्रीय मंत्री नारायण राणे हे उपस्थित असणार आहेत. एकमेकांचे कट्टर विरोधक असलेले उद्धव ठाकरे आणि नारायण राणे आजच्या कार्यक्रमाच्या निमित्ताने एकाच मंचावर येणार असल्याने या कार्यक्रमाकडे सगळ्यांचं लक्ष लागलं आहे.  

केंद्रीय मंत्री आणि शिवसेना यांच्यातील वैर तर सगळ्या महाराष्ट्राला माहिती आहे. नारायण राणे यांनी मुख्यमंत्र्यांबद्दल केलेल्या वक्तव्यावर त्यांना थेट अटक करण्यात आली होती. त्यामुळे यांच्यातील वैर अधिकच वाढलं आहे. आता आज 20 वर्षांनंतर चिपी विमानतळाचे बांधकाम पूर्ण होऊन त्याचं लोकार्पण केलं जाणार आहे. या निमित्ताने मुख्ममंत्री उद्धव ठाकरे आणि केंद्रीय मंत्री नारायण राणे एकाच मंचावर येणार असल्याने ते  एकमेकांना भेटणार का, काय बोलणार यासारख्या अनेक प्रश्नांची उत्तर आज मिळणार आहेत.

IPL 2021 : ऑरेंज, पर्पल कॅप कुणाकडे? सर्वोत्तम फलंदाज, गोलंदाजीच्या यादीत भारतीय खेळाडूंचा दबदबा
आयपीएलच्या यंदाच्या हंगामात भारतीय खेळाडूंनी जबरदस्त कामगिरीचं प्रदर्शन केलं आहे. सर्वाधिक धावा करणाऱ्या खेळाडूंच्या यादीत पहिल्या पाचमध्ये तीन भारतीय खेळाडू असून गोलंदाजांच्या यादीत पहिले पाच भारतीय खेळाडूच आहेत. यंदाच्या आयपीएलमध्ये 626 धावा बनवून पंजाबचा कर्णधार केएल राहुलकडे ऑरेंज कॅप आहे. तर चेन्नईचा फाफ डू प्लेसिस 546 धावा करत दुसऱ्या क्रमांकावर आहे. 544 धावा करत दिल्लीचा शिखर धवन तिसऱ्या तर 533 धावा करत चेन्नईचा ऋतुराज गायकवाड चौथ्या क्रमांकावर आहे. 

Jammu Kashmir News: श्रीनगरमध्ये दहशतवाद्यांचा पोलीस पथकावर गोळीबार, प्रत्युत्तरात एक दहशतवादी ठार
जम्मू -काश्मीरच्या श्रीनगरमधील नातीपोरा भागात शुक्रवारी दहशतवाद्यांनी पोलिसांच्या पथकावर गोळीबार केला. यानंतर, प्रत्युत्तरादाखल, पोलीस दलाने एका दहशतवाद्याला ठार केले. मात्र, दुसरा घटनास्थळावरून पळून जाण्यात यशस्वी झाला. पोलिसांनी शस्त्रे आणि दारूगोळा जप्त केला आहे. जम्मू-काश्मीरमध्ये अलीकडच्या काळात दहशतवादी घटनांमध्ये वाढ झाली आहे.

गुरुवारीच दहशतवाद्यांनी श्रीनगरच्या सफाकदल भागात रात्री 8:40 वाजता सुरक्षा दलांवर ग्रेनेड फेकला. पण त्याच्या स्फोटात कोणीही मरण पावले नाही. एवढेच नाही तर दहशतवाद्यांनी एका सरकारी शाळेतील दोन शिक्षकांची गोळ्या घालून हत्या केली, ज्यात एका महिलेचाही समावेश होता. तत्पूर्वी मंगळवारी दहशतवाद्यांनी दीड तासात तीन वेगवेगळ्या ठिकाणी तीन जणांची गोळ्या घालून हत्या केली.

विदर्भात आज फक्त 18 रुग्ण, मराठवाड्यात 157.. आता उत्तर आणि पश्चिम महाराष्ट्रात रुग्णसंख्या जास्त
 राज्यात कोरोनाची दुसरी लाट आता ओसरताना दिसत आहे. सध्या शहरी भागत जास्त प्रमाणात रुग्ण आढळत असून ग्रामीण भागात रुग्णांची संख्या कमी झालेली पहायला मिळत आहे. विदर्भात काही जिल्ह्यात तर एकही रुग्णांची नोंद आज झाली नाही. मराठवाड्यातही रुग्णसंख्या कमी झाली आहे. सध्या उत्तर महाराष्ट्रातील अहमदनगर, पश्चिम महाराष्ट्रातील काही जिल्हे आणि पुणे, मुंबई आणि उपनगरांत जास्त रुग्ण आढळत आहेत.

कोरोनाबाधितांच्या दैनंदिन रुग्णसंख्येत घट पाहायला मिळत आहे. राज्यात आज 2 हजार 620 नवीन कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली आहे. तर 2 हजार 943 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहे. राज्यात आतापर्यंत 63 लाख 97 हजार 018 रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. त्यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 97.32 टक्के आहे. दरम्यान, राज्यात आज 59 कोरोना संक्रमित रुग्णांचा मृत्यू झाला. सध्या राज्यातील मृत्यूदर 2.12 टक्के एवढा झाला आहे. राज्यात सध्या कोरोनाचे 33 हजार 11 सक्रीय रुग्ण आहेत. 

23:21 PM (IST)  •  09 Oct 2021

केंद्रीय गृहराज्यमंत्री अजय मिश्रा यांच्या मुलाला अखेर अटक

केंद्रीय गृहराज्यमंत्री अजय मिश्रा यांच्या मुलाला अखेर अटक. लखीमपूर हिंसाचार प्रकरणात यूपी पोलिसांची अखेर कारवाई. 3 तारखेला हिंसाचाराची घटना घडली त्यानंतर सहा दिवसांनी अखेर अटक.

22:35 PM (IST)  •  09 Oct 2021

जमीन गैरव्यवहार प्रकरणात बडतर्फ उपजिल्हाधिकारी नरहरी शेळके यांना अटक

आष्टी तालुक्यातील विविध धार्मिक स्थळांच्या जमिन गैरव्यवहार प्रकरणात आष्टी तालुक्यातील चिंचपूर येथिल जमिन गैरव्यवहार प्रकरणात बडतर्फ झालेले उपजिल्हाधिकारी नरहरी शेळके व प्रकाश आघाव पाटील यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात यावा यासाठी विविध संघटनांनी आंदोलने व न्यायालयीन लढा लढत होते. आज त्यांच्या लढ्याला यश आले असेच म्हणावे लागेल. आष्टी तालुक्यातील चिंचपुर देवस्थान जमीन गैरव्यवहार प्रकरणात बडतर्फ उपजिल्हाधिकारी नरहरी शेळके यांना औरंगाबाद येथुन अटक करण्यात आली असून उपजिल्हाधिकारी प्रकाश आघाव पाटील यांनी अटकपूर्व जामीन मिळविला आहे.

21:11 PM (IST)  •  09 Oct 2021

पुण्यातील पूर्व भागात सायंकाळी 5 पासून मुसळधार पाऊस सुरू

पुण्यातील पूर्व भागात सायंकाळी 5 पासून मुसळधार पाऊस सुरू. अनेक ठिकाणी पाणी घरांमध्ये शिरल्याच्या घटना घडल्या. पुण्यातील धानोरी भागात काही सोसायट्यांमध्ये आणि घरांमध्ये पाणी शिरले. 

12:56 PM (IST)  •  09 Oct 2021

नागपूरच्या सीए रोड वरील चितार ओळ परिसरातील घरात मोठा स्फोट 

नागपूरच्या सीए रोड वरील चितार ओळ परिसरात एका घरात आज पहाटे मोठा स्फोट घडला..या घटनेत तिघे जण जखमी झाले असून त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे... घरातील गॅस सिलेंडर किंवा विजेच्या शॉर्ट सर्किटमुळे ब्लास्ट होण्याची प्राथमिक शक्यता असली तरी नेमकं कारण अद्याप स्पष्ट झालेलं नाही... गजानन बिंड आणि त्यांची काही कुटुंबीय पहाटे साडे पाच च्या सुमारास तीन मजली घरी तळ मजल्यावर झोपलेले असताना.. हा स्फोट झाला.. या स्फोटात गजानन बिंड, उर्मिला बिंड आणि आरती बिंड हे तिघे जखमी झाले.. पोटाची तीव्रता एवढी जास्त होती की त्यामध्ये तळमजल्यावरील स्वयंपाक घर तसेच हॉल हॉल मध्ये मोठे नुकसान झाले... तसेच बिंड यांच्या घराची एका बाजूची भिंत ही पडली आहे.. स्फोटाच्या धक्क्याने भिंतीत काँक्रीट मध्ये बसवलेल्या लोखंडी ग्रील्स ही तुटून बाहेर आल्या.. तळ मजल्यावर सर्व दार, खिडक्या तुटल्या तसेच समोरच्या घराचे दार ही तुटले आहे... घटनेनंतर लगेचच कोतवाली पोलिस स्टेशन चे पथक आणि अग्निशमन दलाचे पथक घटनास्थळी पोहोचले... त्यांनी प्राथमिक तपास सुरू केला असला तरी स्फोटाचा नेमकं कारण स्पष्ट झालेला नाही... दरम्यान स्फोटाचा सखोल तपास करण्यासाठी पोलिसांनी बॉम्बशोधक पथकाला ही पाचारण केले आहे...

11:04 AM (IST)  •  09 Oct 2021

जालन्यात 15 जणांना भगर खाल्ल्याने विषबाधा

जालना जिल्ह्यातील वडीगोद्री येथे आणखी 15 जणांना उपवासात भगर खाल्ल्यामुळे विषबाधा झाली आहे. या सर्व बाधित रुग्णांवर दोन खाजगी हॉस्पिटल मध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आलंय, दोन तीन दिवसातली ही दुसरी घटना असून यापूर्वी एकाच कुटुंबातील 6 जणांना ही विषबाधा झाली होती. दरम्यान रुग्णांच्या माहिती वरून अन्न औषध प्रशासनाने अंबड येथील एका दुकानातून 38 किलो भगर जप्त केली असून तिचे नमुने तपासणीसाठी प्रयोगशाळेत पाठवले आहेत.

Load More
New Update
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Jalgaon Train Accident : जळगावमध्ये मोठी रेल्वे दुर्घटना, आगीच्या भीतीने प्रवाशांनी उड्या मारल्या, दुसऱ्या ट्रेनने सात ते आठ लोकांना चिरडले
जळगावमध्ये मोठी रेल्वे दुर्घटना, आगीच्या भीतीने प्रवाशांनी उड्या मारल्या, दुसऱ्या ट्रेनने सात ते आठ लोकांना चिरडले
बांगलादेशी घुसखोरांविरोधात केंद्रीय गृहमंत्रालयाकडून दखल; मुख्य सचिव, पोलीस महासंचालकांना कारवाईचे निर्देश
बांगलादेशी घुसखोरांविरोधात केंद्रीय गृहमंत्रालयाकडून मोठा निर्णय; मुख्य सचिव, पोलीस महासंचालकांना लेखी निर्देश
Jalgaon train Accident आग लागली, आग लागली असा आवाज अन्..; जळगावमधील रेल्वे अपघाताचा थरार; प्रत्यक्षदर्शींनी सांगितलं काय घडलं
आग लागली, आग लागली असा आवाज अन्..; जळगावमधील रेल्वे अपघाताचा थरार; प्रत्यक्षदर्शींनी सांगितलं काय घडलं
महापालिका निवडणुकीनंतर अपात्र लाडक्या बहिणींची यादी वाढेल, खात्यातून पैसे परत घेतील अन् योजना बंद करुन टाकतील : आदित्य ठाकरे
महापालिका निवडणुकीनंतर अपात्र लाडक्या बहिणींची यादी वाढेल, खात्यातून पैसे परत घेत योजना बंद होईल; आदित्य ठाकरेंचा घणाघात 
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Jalgaon Train Accident | पुष्पक एक्सप्रेसला आग, उड्या मारल्या, बंगळुरू एक्सप्रेसने अनेकांना चिरडलंJalgaon Train Accidentआग लागल्याच्या भीतीने चालत्या गाडीतून उड्या मारल्या,बंगळुरु एक्प्रेसने चिरडलेGulabRao Patil on Jalgaon Train Accident|जळगावमध्ये मोठा रेल्वे अपघात, गुलाबराव पाटलांची प्रतिक्रियाJalgaon Train Accident | बंगळुरू एक्सप्रेसची प्रवाशांना धडक,  जळगावात रेल्वेची मोठी दुर्घटना

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Jalgaon Train Accident : जळगावमध्ये मोठी रेल्वे दुर्घटना, आगीच्या भीतीने प्रवाशांनी उड्या मारल्या, दुसऱ्या ट्रेनने सात ते आठ लोकांना चिरडले
जळगावमध्ये मोठी रेल्वे दुर्घटना, आगीच्या भीतीने प्रवाशांनी उड्या मारल्या, दुसऱ्या ट्रेनने सात ते आठ लोकांना चिरडले
बांगलादेशी घुसखोरांविरोधात केंद्रीय गृहमंत्रालयाकडून दखल; मुख्य सचिव, पोलीस महासंचालकांना कारवाईचे निर्देश
बांगलादेशी घुसखोरांविरोधात केंद्रीय गृहमंत्रालयाकडून मोठा निर्णय; मुख्य सचिव, पोलीस महासंचालकांना लेखी निर्देश
Jalgaon train Accident आग लागली, आग लागली असा आवाज अन्..; जळगावमधील रेल्वे अपघाताचा थरार; प्रत्यक्षदर्शींनी सांगितलं काय घडलं
आग लागली, आग लागली असा आवाज अन्..; जळगावमधील रेल्वे अपघाताचा थरार; प्रत्यक्षदर्शींनी सांगितलं काय घडलं
महापालिका निवडणुकीनंतर अपात्र लाडक्या बहिणींची यादी वाढेल, खात्यातून पैसे परत घेतील अन् योजना बंद करुन टाकतील : आदित्य ठाकरे
महापालिका निवडणुकीनंतर अपात्र लाडक्या बहिणींची यादी वाढेल, खात्यातून पैसे परत घेत योजना बंद होईल; आदित्य ठाकरेंचा घणाघात 
Eknath Shinde: एकनाथ शिंदे 20 वर्षात 9 वेळा नाराज, पोहोचले दरेगावात; 2005 मध्ये पहिल्यांदा मनधरणी
एकनाथ शिंदे 20 वर्षात 9 वेळा नाराज, पोहोचले दरेगावात; शिवसेनेत 2005 मध्ये पहिल्यांदा मनधरणी
बीडमधील सामाजिक ऐक्य व जातीय सलोखा अबाधित राहावा; धनंजय मुंडेंची गहिनीनाथ गडावर प्रार्थना
बीडमधील सामाजिक ऐक्य व जातीय सलोखा अबाधित राहावा; धनंजय मुंडेंची गहिनीनाथ गडावर प्रार्थना
UPSC CSE Exam 2025 : यूपीएससी परीक्षेची जाहिरात आली, IAS, IPS आणि IFS परीक्षेसाठी 'असा' अर्ज करा
यूपीएससी परीक्षेची जाहिरात आली, IAS, IPS आणि IFS परीक्षेसाठी 'असा' अर्ज करा
Sharad Pawar: पुण्यात दूर्मीळ GBS रोगाचे संकट;  शरद पवारांकडून राज्य सरकारला सूचना, दाहकता लक्षात घ्या
पुण्यात दूर्मीळ GBS रोगाचे संकट; शरद पवारांकडून राज्य सरकारला सूचना, दाहकता लक्षात घ्या
Embed widget